@gbd886655
@gbd886655

काहि हि बर 998877

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

मार्मिक

*लव्ह ईज गाॅड की, लव्ह ईज फ्राॅड!* *लेखक* - *निलेश(बाळा)राऊत* *चिंचणी* वॅल्हेन्टाईन हा त्याच्या काळात अविवाहित अशा लग्न करू ईच्छिणा-या जोडप्यांची तो गुपचूप लग्न लावून देत असे. त्याचं कार्य हे केवळ लग्न करू ईच्छीणा-या व अशांचे लग्न लावून देण्याईतपतच मर्यादित होतं. अशी लग्न लावून देण्याची प्रथा तर आपले भटजी-ब्राह्मण आपल्याकडे पुर्वापार काळापासून पार पाडत आले आहेत. त्यामुळे वॅल्हेन्टाईन म्हणजे प्रेमाचे खुप मोठे प्रतिक वगैरे आहे. असे मानण्याचे कारण बिलकुल नाही. मुळात या वॅल्हेन्टाईनन*लव्ह ईज गाॅड की, लव्ह ईज फ्राॅड!* *लेखक* - *निलेश(बाळा)राऊत* *चिंचणी* वॅल्हेन्टाईन हा त्याच्या काळात अविवाहित अशा लग्न करू ईच्छिणा-या जोडप्यांची तो गुपचूप लग्न लावून देत असे. त्याचं कार्य हे केवळ लग्न करू ईच्छीणा-या व अशांचे लग्न लावून देण्याईतपतच मर्यादित होतं. अशी लग्न लावून देण्याची प्रथा तर आपले भटजी-ब्राह्मण आपल्याकडे पुर्वापार काळापासून पार पाडत आले आहेत. त्यामुळे वॅल्हेन्टाईन म्हणजे प्रेमाचे खुप मोठे प्रतिक वगैरे आहे. असे मानण्याचे कारण बिलकुल नाही. मुळात या वॅल्हेन्टाईनने आपल्याच भारतीय विवाह संस्थेचा थोडाफार अभ्यास केला होता. व असे विवाह आपल्या देशातसुद्धा राबवायला हवेत. या विचाराने तो पुरता झपाटला होता. परंतु या कार्यात तो अपयशी ठरला. आपल्याकडे मात्र पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यातच धन्यता मानणारे इंग्रजाळलेले बहुतांशी लोक हा दिवस भेट वस्तूंच्या देवाणघेवाणीत व लाखोंची उलाढाल करीत साजरा करताहेत. विशेष हास्यास्पद बाब म्हणजे आपल्याकडची काही महाभाग जोडपी तर 14 फेब्रुवारी.वॅल्हेन्टाईन डे चे औचित्य साधून आपल्या लग्नाची गाठ याच दिवशी बांधू ईच्छीत असतात. परंतु अशा अनेक जोडप्यांचे विवाह हे अल्पकाळच टिकले आहेत आणि घटस्फ़ोटापर्य॔त जाऊन पोहचले आहेत. आज आपल्या देशात प्रेमाचे जे काही बाजारीकरण आणि विकृतीकरण वाढू पाहते आहे कि. या वाढू पाहणा-या प्रेमातील विकृतीच्या दुष्परिणामाचे पडसाद मात्र आपल्याच भारतीय समाज मनावर कुठेतरी ऊमटताना दिसताहेत. अगदी कालपरवाची ताजी घटना आहे. हिगंणघाट येथील एकतर्फी प्रेमातुन एका विवाहित पुरुषाने एका शिक्षिका असलेल्या स्त्रीला भर रस्त्यात पेट्रोल ओतून पेटवून दिले. काही वर्षांपूर्वी उल्हासनगरची रिंकू पाटील, पुण्यातील जान्हवी तुपे, सपना जगताप, सांगलीची अमृता देशपांडे अशा या तरूणी तथाकथित प्रेमातुन निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या बळी ठरल्या होत्या. यातुनच आज आपल्याकडे प्रेमाच्या नावाखाली वासनेचा व स्वैराचाराचा जो काही नंगानाच सुरू आहे. त्याची बहुतांशी पाळेमुळे ही भारतीय संस्कृतीच्या अध:पतनात आणि आपल्याकडे दिवसेंदिवस बोकाळत चाललेल्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या चंगळवादात व भोगवादात दडलेली आहेत. मुळात पाश्चिमात्य संस्कृती ही पशुतुल्य अशा कुत्र्या - मांजराची संस्कृती असल्याने तेथे मुक्त स्वैराचारातून निर्माण होणा-या मुक्त लैंगिक (free sex) संबंधाला कोणत्याही प्रकारे निर्बंधांची चौकट नसल्याने तेथे विवाहबाह्य संबंध व घटस्फ़ोटांची संख्याही अधिक आहे. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे आपली भारतीय विवाहसंस्था व कुटुंबसंस्था आज पाश्चिमात्य दिशेने दिवसेंदिवस अधोगतीकडे वाटचाल करीत आज भारतीय समाजातही घटस्फ़ोट व विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण अधिकाधिक वाढू पाहते आहे. "भारतीय स्त्रीने लग्नापूर्वी आपले कौमार्य जपलं पाहिजे." हा भारतीय विचार आता केव्हाच ईतिहास जमा झालाय. त्याजागी आता "लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवण्यात गैर काहीच नाही." असे बेताल वक्तव्य करणा-या काही इंग्रजाळलेल्या सैराट तरुणींची संख्या आज वाढताना दिसतेय. एका सर्वेक्षणानुसार तर केवळ महाराष्ट्रातील अनेक नामवंत कॉलेजेसमधील जवळपास अनेक तरुण-तरूणींनी *Penetrative sex* म्हणजे प्रत्यक्ष शरीरसंबंधाचा अनुभव घेतला होता. शिवाय दुर्दैवाने यात शाळेत जाणा-या टिनएजर्स मुलींनीसुद्धा बाजी मारली आहे. एका पाहणीनुसार तर केवळ मुंबईतील शाळेत जाणा-या जवळपास 35 टक्के शाळकरी मुलींनी आपला गर्भपात करून घेतला होता. अशा गोष्टी या बहुदा वाढत्या ग्रोथ हार्मोन्स व निव्वळ शारीरिक आकर्षणावर आधारलेले तकलादू प्रेम व खरं प्रेम यातील फरक बहुदा कळेनासा होतो. व तथाकथित प्रेमावर आधारलेले चित्रपट व मालिका व त्यातील शृगांरीक व उत्तान लैंगिक दृष्य असणारे असे चित्रपट मालिका जेव्हा पाहिल्या जातात, तेव्हा त्यातील परिणामाचे पडसाद हे कुठेतरी तरुण-तरुणींच्या जीवनात उमटताना दिसत असतात. एका कॉलेजच्या वर्गात तर मॅडम शिकवित असताना मागच्या बाकावर बसून एक मुलगा व मुलगी शारिरीक चाळे करण्यात गुंग झाली होती. ते बघून मॅडमचा पारा चढला आणि त्या म्हणाल्या *Get out of the class* ते दोघेही ऊठले. मात्र तो तरुण वर्गातून बाहेर पडताना मॅडमच्या नजरेला नजर भिडवत निर्लज्यपणे म्हणाला, *We are in love. what is your problem* असा प्रसंग जेव्हा आपण पाहतो-वाचतो तेव्हा एक गंभीर यक्ष प्रश्न निर्माण होतो की, या सैराट झालेल्या संस्कारशुन्य अशा प्रेमीयुगुलांना आता आवर कोण घालणार? कारण जिथे मुलांमुलींचे पालक, शिक्षक व प्राध्यापकच जर चंगळवादाचे व भोगवादाचे बळी ठरू पाहाताहेत. तिथे केवळ पुस्तकी शिक्षणाचे डोस पाजून सुसंस्कृत असा सभ्य समाज निर्माण करता येईल काय? अर्थात कदापि नाही. अशावेळी स्वामी विवेकानंदानी भारतीय समाजाला धोक्याचा इशारा देत म्हटले होते की, "तुम्ही भारतीय आचार, विचार व वैदिक संस्कृती सोडून जर पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे धावाल तर येणा-या तीन पिढ्यातच तुम्ही नष्ट व्हाल." तेव्हा अनेक स्त्री-पुरूषांच्या जीवनातील "एक छोटीसी लव्ह स्टोरी" मधील *Love is God* हे वाक्य वाचायला व ऐकायला खुपच सोपे वाटत असले तरी आचरायला तितकेच अवघड आहे. अनेक स्त्रीया असे म्हणत असतात की, "माझ्या पतीवर माझे खुपच प्रेम आहे." परंतु जेव्हा हे पती महाशय तरूणपणीच अचानक वारतात. तेव्हा या स्त्रीया आधी बँकेतील ठेव तपासतात आणि आता पुढिल जीवनाचा उपभोग कसा घेता येईल याचा विचार करू लागतात. काही चतुर व चाणाक्ष स्त्रीया तर आपल्या सौंदर्याच्या बळावर आपल्या मादक नजरेच्या नेत्र कटाक्षातुन धनाड्य पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि आपल्या अपूर्ण राहिलेल्या सर्व ईच्छा-आकांक्षा अशा श्रीमंत पुरुषांकडून पुर्ण करून घेतात. काही पुरुष तर आपल्या गैर व भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशातून ते आपल्या बायकोला खुश करण्यासाठी नानाविध प्रकारचे सोन्याचे दागिने, महागड्या साड्या व चैनीच्या वस्तू आणून देत असतात. "आपल्या पतीचे आपल्यावर खुपच प्रेम आहे." अशा या खोट्या भ्रमात राहून व अशा खोट्या समजुतीतून या मूर्ख स्त्रीया आपल्या पतीवर भलत्याच खुश असतात, आणि या मूर्ख स्त्रीया वटपौर्णिमेला "आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळु दे." अशी हास्यास्पद प्रार्थना करीत असतात. केवळ अशा भौतिक सुखासाठी हपापलेल्या या मूर्ख स्त्रीया आपल्या पतीमध्ये असणारे अनेक प्रकारचे दुर्गुण त्या अगदी सहज पचवताना दिसतात. तसेच अनेक पुरुषही असे म्हणत असतात की, "माझ्या पत्नीवर माझे खुपच प्रेम आहे". परंतु जेव्हा त्यांची पत्नी एखाद्या दुर्धर आजाराने ग्रासली जाते व तिचे सौंदर्य नष्ट होते, व ती बेडभ दिसू लागते. तेव्हा या पुरूषांचे आपल्या पत्नीविषयी असणारं आकर्षण नष्ट होते, व असे आकर्षण जेव्हा संपुष्टात येते, तेव्हा असे अनेक पुरुष हे वासूगीरी व सैराटगीरी करून दुस-या एखाद स्त्रीला गटवण्याच्या प्रयत्नात असतात. मानवी जीवनातील निरपेक्ष प्रेम, सात्त्विक प्रेम, नि:स्वार्थ प्रेम आणि आध्यात्मिक प्रेम. अशा उच्चतम प्रेमाच्या पातळीवर पोहचण्याची वाट ही खूपच निसरडी व खडतड वाट आहे. समाजातील खुपच नगण्य असेच स्त्री-पुरुष या वाटेवरती चालत असतात. ज्या स्त्री-पुरुषांना या वाटेवरती चालता येत नाही. असे अनेक स्त्री-पुरुष हे केवळ अगदीच सहजसोपी अशी जवळची वाट धरतात आणि ती वाट म्हणजे प्रेमातील ढोंगीपणा, स्वार्थीपणा, बनावटपणा, बेगडीपणा व दिखाऊपणा म्हणजेच *Love is frod* ची वाट ते धरीत असतात. या वाटेवरती चालणारे अनेक स्त्री-पुरूष हे केवळ जीवनभर भरकटतच राहतात. आणि म्हणून असे अनेक स्त्री-पुरुष हे उच्चतम अशा *Love is god* च्या स्थानकापर्य॔त कधीच पोहचत नाही. कारण त्यांची एकच वाट ठरलेली असते. आणि ती वाट म्हणजेच *Love is frod.* ✍ लेखन- *निलेश (बाळा) राऊत*- *चिंचणी,* *राजा शिवछत्रपती परिवार,* *मुंबई विभाग, महाराष्ट्र* *भ्रमणध्वनी* *9673907323* लेख आवडल्यास शेअर करून वाचनाची आवल प्रत्येकामध्ये रुजविण्याचा कामाच्या गोष्टी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती. *_वाचाल तर वाचाल_* 📚📖📚📖📚📖📚 *अशा प्रकारचे दर्जेदार मराठी लेख आणि कथा रोज वाचण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कामाच्या गोष्टी फेसबुक पेज ला.* *रोज आपल्या फेसबुक वर लेख मिळवण्यासाठी पेज लाईक करायला विसरू नका.* *अन्यथा तुमच्या फेसबुक वर लेख येणार नाही* वाचनाची आवड आहे पण वाचाण्याकरिता वेळ नाही. एकदा अवश्य भेट द्या कामाच्या गोष्टी फेसबुक पेजला.आजच्या धकाधकीच्या जीवनात पुस्तक घेऊन एखादा तास वाचत बसण्याचा वेळ कोणाच कडे नाही. यावर एकच रामबाण उपाय कामाच्या गोष्टी. फावल्या वेळेत गेम खेळत बसण्यापेक्षा पाच ते दहा मिनिटात वाचून होणारे अतिशय दर्जेदार लेख फक्त तुमच्या साठी. 👇👇👇👇👇👇👇 https://m.facebook.com/kamachygosti #मार्मिक
470 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..