@jayantrpatilofficial
@jayantrpatilofficial

Jayant Patil

Official Page of Jayant Rajaram Patil. President, Nationalist Congress Party, Maharashtra Member of Legislative Assembly, Government of Maharashtra Former Home,Finance & Planning and Rural Development Minister,Government of Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून हद्दपार करण्याच्या निर्णयाचा मी निषेध करतो. शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्या भाजपा-शिवसेनेच्या सरकारने आधी किल्ले भाड्यावर देऊन व आता इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न करुन केल्यामुळे त्यांचा मुघलकी मनसुबा आता स्पष्ट झाला आहे.महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्या स्वाभिमानाची भवानी तलवार अजून म्यान केलेली नाही. आपल्या आराध्य दैवताच्या या अपमानाचे उत्तर लवकरच ते आपल्याला देतील. #जयंत पाटील
भारतीय जनता पक्षाने आज प्रसिद्ध केलेला त्यांचा जाहीरनामा म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून, गेल्या पाच वर्षातील त्यांच्या संपूर्ण अपयशाचा 'कबुलीनामा' आहे. भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान आपलाच प्रसिद्ध केलेला २०१४ चा जाहीरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने ही २०१४ सालीच दिलेली आहेत. हि आश्वासने पूर्ण का झाली नाहीत, याचेही उत्तर याच जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने देणे अपेक्षित होते. या जाहीरनाम्यात सुरुवातीलाच भाजपाने कलम ३७० चा उल्लेख केलेला आहे. एकंदरच काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील निवडणुका जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीचा केविलवाणा प्रयत्न कायम आहे. कलम ३७० ऐवजी महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भविष्यासाठी हा पक्ष काय करणार आहे, याचे उत्तर या जाहीरनाम्यातून मिळाले असते, तर राज्यातील जनतेने किमान हा जाहीरनामा वाचला तरी असता.  मी हा जाहीरनामा संपूर्ण वाचला, मात्र या जाहीरनाम्यात राज्याच्या सर्वसमावेशी, शाश्वत व संपूर्ण विकासाचे कोणतेही सूत्र अथवा मॉडेल नाही. बहुधा आपण पुन्हा सत्तेत येणार नाही, याची खात्री भारतीय जनता पक्षाला झालेली दिसते. म्हणून, आश्वासनांची पोकळ जंत्रीच या जाहीरनाम्यात भाजपाने दिलेली आहे.  या जाहीरनाम्यात दिलेली अनेक आश्वासने केवळ एका वर्षात देखील पूर्ण करणे शक्य आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्ष सत्ता हातात असताना देखील ही आश्वासने का पूर्ण केली नाहीत, याचा जाब महाराष्ट्रातील जनता श्री. देवेंद्र फडणवीस यांना नक्की विचारेल. २०१४ च्या भाजपच्या जाहीरनाम्यात अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण करण्याचा उल्लेख होता, २०१९ जाहीरनाम्यात देखील हाच उल्लेख कायम असून या दोन्ही स्मारकांची पहिली विट सुद्धा रचलेली नाही. यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने ते किती गांभीर्याने पाळतात हे स्पष्ट होते. या जाहीरनाम्यात भाजपाने ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा उल्लेख केला आहे. मात्र, गेली पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना फुले दाम्पत्याला 'भारतरत्न' का दिला गेला नाही ? याचेही उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्ज वाढत चालले असताना भाजपाने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करू, असे आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात दिले आहे. देशाचा विकासदर पाच टक्क्याहून खाली येण्याची चिन्हे असताना एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे हास्यास्पद स्वप्न  दाखवण्यापेक्षा, देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील उद्योग का बंद पडले ? याचे उत्तर राज्यातील जनतेला द्यावे.  नेहमीप्रमाणेच या जाहीरनाम्यात देखील भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनासोबतच गेल्या पाच वर्षात सोळा हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या ? याचेही उत्तर जाहीरनाम्यात लिहायला हवे होते. याही जाहीरनाम्यात भाजपाने पुढील पाच वर्षात एक कोटी रोजगार निर्माण करण्याचे भ्रामक आश्वासन दिले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात लाखो तरुणांनी नोकऱ्या का गमावल्या, याचे उत्तर मात्र या जाहीरनाम्यात नाही. भारतीय जनता पक्षाच्या गेल्या पाच वर्षांतील अपयशाच्या या कबुलीनाम्याला महाराष्ट्रातील तरुणाई व नागरिक २१ तारखेला केराची टोपली दाखवतील, याची खात्री आम्हाला आहे. #जयंत पाटील
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे आयोजित सभेला संबोधित केले.एकीकडे भडगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निष्क्रियतेमुळे अजूनही शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत तर दुसरीकडे भडगाव तालुक्यातील अनेक गावांना गारपीटीचा तडाखा बसला. केळीसारखी पिके उद्ध्वस्त झाली. तरी येथील स्थानिक आमदार व सरकारने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी साधे एक पाऊल टाकले नाही.महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तेव्हा आम्ही सरकारला सांगत होतो की, जनावरांच्या छावण्या सुरु करा त्याशिवाय पशुधन वाचणार नाही. परंतु या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना जनावरांना बाजार दाखवावा लागला. मागील पाच वर्षात १६,००० शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या फडणवीस सरकारची निष्क्रियताच दाखवते.सांगली-कोल्हापूरमध्ये पूर आल्यावर पाच दिवस उलटले तरी सरकारची मदत पोहचली नव्हती. लोकांनीच लोकांना मदत देत पुरातून बाहेर काढले. मात्र नंतर सरकार टीव्हीवर दाखवू लागले की आम्ही ८०% लोकांना स्थलांतरित केले.देशातील इतर राज्यांची अर्थव्यवस्था प्रगती करत असताना महाराष्ट्राचीच अर्थव्यवस्था का ढासळली? औद्योगिकदृष्ट्या देशात नं. १ वर असणारा महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर पाच वर्षात का घसरला? याची उत्तरे फडणवीस सरकारकडे नाहीत. यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे कारखाने बंद पडू लागले आहेत. परिणामी युवकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे.शेतकरी, सामान्य माणसांच्या विरोधातील सरकार सत्तेवर आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मोडीत काढणाऱ्या या सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल. #MaharashtraAssemblyElections #MaharashtraElections #⏱राष्ट्रवादी
मुक्या झाडांची कत्तल तर झाली. आता लोकशाहीची मुळे यांनी उखडण्याआधी जागे व्हा, योग्य उमेदवाराला मतदान करा! #⏱राष्ट्रवादी
‘आरे’तील वृक्षतोड तात्काळ थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
विद्यार्थ्याच्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
मा. सर्वोच्य न्यायालयाने आरेमधील वृक्षतोडीला आज स्थिगिती दिली. मात्र, राज्य सरकारने एका रात्रीत वृक्षतोड करून आपला हेतू आधीच साध्य करून घेतला. न्यायालय यावर योग्य तो निर्णय देईलच, पण सरकारच्या कृतीमुळे झालेले नुकसान भरून येण्यास शेकडो वर्षे लागतील. #जयंत पाटील
आज माझ्या मतदारसंघातील दुधगाव समडोळी येथे सभा घेतली व आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने स्थानिकांशी संवाद साधला.या फडणवीस सरकारची पाच वर्षात उपलब्धी काय तर तर १६,००० शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. यावर उपाय सुचवत शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आम्ही विधीमंडळात सातत्याने मांडले. सरसकट कर्जमाफीची सरकारकडे मागणी केली. मात्र युतीचे सरकार यात पूर्णपणे अपयशी ठरले. परंतु आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल.मागील पाच वर्षात देशाची प्रगती नाही तर अधोगतीच झाली. नोटबंदी झाल्यानंतर महाराष्ट्रात १ लाख ९२ हजार कंपन्या बंद पडल्या. तर संपूर्ण देशात जवळपास ६ लाख कंपन्या बंद पडल्या. २ कोटी रोजगार देऊ सांगणाऱ्यांच्या काळात हातचा रोजगार जाण्याची आज वेळ आली आहे.नोटबंदीमुळे श्रीमंतांची सोय करण्याची व्यवस्थाच भाजपा सरकारने केली. ५००,१००० रु. नोटांचा काळा पैसा ठेवायला जास्त जागा लागत होती. यांनी २००० रु. ची नोट काढून काळा पैसा कमी जागेत मावेल याची व्यवस्थाच तर केली. एकंदर अर्थशास्त्राचा खेळखंडोबा करण्याचे काम यांनी केले आहे.दुष्काळ हटवण्यासाठी या सरकारने पेट्रोल-डिझेलवर तीन रुपये जादा कर घ्यायला सुरुवात केली होती. आता तो कर नऊ रुपयांपर्यंत पोहचला आहे. मात्र दुष्काळग्रस्तांपर्यंत ही मदत कधीच पोहोचली नाही. आपल्या भागातील महापूर जर १ तारखेला अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडले असते तर टाळता आला असता. पण त्यावेळी हे सरकार यात्रा काढत बसले होते. पूर आल्यावर जी मदत ८-१० तासात पोहचायला हवी होती तिथे ५-६ दिवसाने सरकार जागे झाले. इतकेच नाही तर आजपर्यंत संसार उद्धवस्त झालेल्या पूरग्रस्तांपर्यंत सरकारची एक दमडी पोहचलेली नाही. फक्त घोषणा, घोषणा आणि घोषणा..यापलीकडे आपल्या हाती काहीच लागले नाही.अनेक वर्षे मी सत्तेत असताना व आता विरोधी पक्ष म्हणून देखील सरकारच्या चुकीच्या निर्णयांना नेहमीच विरोध केला आहे. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. तेव्हा तुमचा मतरुपी आशीर्वाद तुम्ही मला पुन्हा एकदा द्याल याची मला खात्री आहे. #जयंत पाटील
आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. माझ्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी सदैव उभ्या राहणाऱ्या मतदारसंघातील जनतेचा आजचा उत्साह पाहता आमदारकी तसेच विकासाच्या सप्तपदीकडे आपण पहिले दमदार पाऊल टाकले आहे, एवढं मात्र नक्की!गेल्या सहा टर्म मध्ये मला साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो. #जयंत पाटील