@k13031992s
@k13031992s

🌷💖🌷कृष्णसखी🌷💖🌷

अशक्य ही शक्य करतील स्वामी .. 🌹॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🌹

🌹🌹 स्वामी वाणी भाग 112 🌹🌹 आपले स्वामी बोलतात ... “ काय म्हणता पाणी नाही..!! चला तुम्हाला पाणी दाखवतो..!! ” 🌹🌹 स्वामी लीला 🌹🌹 अक्कलकोट पुण्य पावन नगरीत प्रत्यक्ष परब्रम्ह सगुण रुपात अवतरले होते.. अक्कलकोट मध्ये वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जात असत.. असेच एके वर्षी श्री गुरुप्रतीपदेचा उत्सव दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी अतिशय उत्साहात साजरा होणार होता... उत्सवात महाप्रसाद भजन पूजन आदी उपक्रमांची तयारी सुद्धा झाली होती... आता गुरुप्रतीपदेचा दिवस उजडला.. परंतु त्या दिवशी एक समस्या उत्पन्न झाली.. ती अशी कि, उत्सवात येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत होती.. पाण्याची कमतरता जाणवत होती.. गावातील सर्व विहिरींचे पाणीच आटून गेले असल्यामुळे आता फजिती होते कि काय.. हि चिंता सर्वांना पडली.. अजून महाप्रसाद व्हायचा आहे.. गर्दीतर वाढत होती.. काय करावे काहीच सुचत नव्हते.. त्या वेळेला फक्त जंगमाच्या विहिरीवर नरोटीने पाणी भरण्यास मिळे... आता सर्वांना स्वामींना प्रार्थना करण्या शिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता.. आणि सर्व मंडळी स्वामींकडे आले... स्वामींना व्याकुळतेने प्रार्थना केली.. “ महाराज.. पाण्याचा खूपच तुटवडा आहे.. पाणी कोठेच मिळत नाही.. आता काय करावे ? ”. व्याकुळतेची प्रार्थना ऐकताच करुणाघन समर्थ हसले आणि सर्वांकडे बघून बोलले.. “ काय म्हणता पाणी नाही..!! चला तुम्हाला पाणी दाखवतो..!! ”. असे बोलताच स्वामी महाराज भराभरा चालायला लागले.. आणि जंगमाच्या विहिरीजवळ आले.. आणि त्या विहिरीत लघवी करून पुन्हा माघारी निघून आले.. स्वामी भक्त हो !! स्वामींची हि आगळी वेगळी लीला बघून तर क्षणभरासाठी सर्व भक्त मंडळी गोंधळूनच गेली.. त्यानंतर श्री केशव देशपांडे वगैरे मंडळींनी जेव्हा पुन्हा विहिरीकडे जावून बघितले तर आश्चर्य घडले.. विहिरीमध्ये अचानक भरपूर पाणी आले.. स्वामींची हि लीला बघून सर्वांना अत्यानंद झाला.. सर्व स्वामी भक्त स्वामी नामात नाचुच लागले.. त्या नंतर दिवसभरात श्री गुरुप्रतीपदेचा उत्सव सुद्धा अतिशय उत्साहात पार पडला.. परंतु पुन्हा एक चमत्कार घडला.. उत्सव व्यवस्थित पार पडल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी विहिरीचे पाणी कमी झाले आणि नरोटी सुरु झाली.. आणि ह्याचे सर्वांना आश्चर्य वाटले..!!! बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !! 🌹🌹 स्वामी बोध 🌹🌹 स्वामी महाराजांच्या लीला ह्या खरोखर बुद्धीच्या पलीकडे आहे.. काय चमत्कार हा !! खरोखर शब्दच नाही.. आजच्या स्वामी वाणीचे मनन चिंतन करता स्वामी खूप प्रेरणा देत आहेत.. बघा ना आजच्या लीलेत जेव्हा पाण्याचा तुटवडा जाणवला.. तेव्हा पाण्याशिवाय उत्सव व्यवस्थित पार पडूच शकणार नाही अशी परिस्थिती झालेली होती.. आणि हीच मानसिकता घेवून सर्व सेवेकरी स्वामींकडे आले आणि त्यानंतर स्वामीनी “चला तुम्हाला पाणी दाखवतो” ह्या स्वामी वाणी तून त्यांना आधार देत हीच प्रेरणा दिली कि, समस्येला बघून घाबरून जावू नका.. कोणतीही समस्या कायम स्वरूपी नसते.. प्रत्येक समस्येचे समाधान हे निर्माण झालेले आहे आणि पुढे लीला करून सर्वांना सिद्ध सुद्धा करवून दिले.. स्वामी भक्त हो !! आजही आपल्यासाठी आजच्या पिढीसाठी आजची स्वामी वाणी खरोखर खूप प्रेरणादायी आहे.. विशेषतः अशा स्वामी भक्तांसाठी ज्यांना जीवनात समस्येने पूर्णपणे वेढलेले आहे.. ज्यांच्या समोर संकटांचा पहाड उभा असून पुढे जाण्याचा मार्गच दिसत नाही.. आणि त्यांच्या मनाने जवळ जवळ हे निश्चित केले आहे कि, आता हि समस्या आपल्या जीवनातून जावूच शकत नाही.. ह्या समस्येला समाधानच नाही.. आणि जेव्हा असा भक्त हतबल होऊन स्वामींना प्रार्थना करतो.. जसे आजच्या स्वामीनी लीला करत विहिरीत पाणी आहे हे दाखवून देण्याची कृती केली.. अगदी तसेच आजही आपल्या जीवनात स्वामी महाराज अशी प्रेरणादाई व्यक्तिमत्व वा भक्त पाठवत असतात.. आणि आधार देत सांगत असतात कि, घाबरु नकोस, ह्या विश्वात अशक्य असे काहीच नसते.. प्रत्येक समस्येला समाधान आहे.. स्वामी भक्त हो !! हि प्रेरणादाई व्यक्तिमत्व आपल्या जीवनात प्रत्यक्षात येतील वा पुस्तकाच्या रुपात येतील वा इतर अन्य कोणत्याही माध्यमातून.. आपल्याला मनन चिंतन करून हे बघायचे आहे कि, त्यांच्या जीवनात सुद्धा अशाच समस्या आलेल्या होत्या.. आणि त्यांनी कशा पद्धतीने इच्छा शक्ती.. भक्तीची शक्ती.. विश्वास शक्ती.. साहसशक्ती सह विविध गुणाच्या सहाय्याने त्या समस्येवर मात केली.. समस्येचे समाधान शोधले.. ह्या सह आजच्या लीलेत पुन्हा दुसऱ्या दिवशी विहिरीत पाणी कमी झाले वा पूर्ववत झाले ह्यातून स्वामी आपणास हाच संकेत देत आहेत कि, जेव्हा आपण अशा प्रेरणादाई व्यक्तिमत्वाचे अनुभव वाचतो वा ऐकतो तेव्हा काही वेळा पुरते आपल्याला छान वाटते.. परंतु काही वेळाने आपले नकारात्मक मन पुन्हा आपल्याला समस्येत गुंतवते.. म्हणून स्वामी भक्त हो !! आजच्या लीलेतून प्रेरणा घेता अनन्य स्वामी भक्तीचा भाव धारण करत.. यशस्वी व्यक्तिमत्वाचे गुण धारण करायचे आहे.. त्या गुणांच्या साठी स्वामींकडे प्रार्थना करून लागलीच कृती करायची आहे.. म्हणजे आपल्या जीवनातून समस्येचा समूळ नाश होईल... चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! जेव्हा आमच्या जीवनात समस्या येते.. तेव्हा मन पूर्णपणे खचुन जाते.. आणि ह्या समस्येला समाधानच नाही असे पक्क करते.. तेव्हा हे श्री गुरुतत्वा !! तुला आमची करुणा येते.. आणि विविध यशस्वी प्रेरणादाई व्यक्तिमत्व आमच्या जीवनात पाठवतो.. त्यांच्याद्वारे तूच आधार देत सांगतो कि, ‘ बाळानो नि:शंक रहा !! ह्या विश्वात अशक्य असे काहीच नाही.. सर्व शक्य आहे.. प्रत्येक समस्येचे समाधान आहे..!! ’ आणि त्यानंतर आमच्याकडून कर्म करवून घेऊन समस्येतून बाहेर काढतोस..!! हे आई !! आम्हा बाळावर करत असलेल्या बेशर्त प्रेमासाठी धन्यवाद ! धन्यवाद !! धन्यवाद !!! ” बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !! 🌹🌹🌹 #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - स्वामी वाणी 112 “ जेव्हा आपणाला समस्या येते . . आपले मन हतबल होऊन समस्ये समोर हात टेकवते . . तेव्हा स्वामी महाराज आपल्या जीवनात स्वामी महाराज अशी प्रेरणादाई व्यक्तिमत्व वा भक्त पाठवत असतात . . आणि आधार देत सांगत असतात कि , “ बाळा घाबरु नकोस , ह्या विश्वात अशक्य असे काहीच नसते . . प्रत्येक समस्येला समाधान आहे . . . प्रयत्न कर . . यश निश्चित आहे . . ! ! ” - ShareChat
735 जणांनी पाहिले
7 तासांपूर्वी
*स्वामीपाठ* *श्री स्वामीसुत महाराज विरचित* *||अभंग 01||* *श्रीस्वामीसमर्थ नाम हे शोभत |* *नमू भगवंत-मोक्षदाता ||* *स्वानंदाची मूर्ती आनंदाची वृत्ती |* *विराजे ही दीप्ती समर्थाचीं||* *मिथ्या दुजा शीण तव नामावीन |* *ध्याता हे चरण, सर्व सिद्धी ||* *समर्थ तूं एक द्यावयासी सुख |* *तारीले अनेक जडमूढ ||* *जगी तुझें पद तारक हे वंद्य |* *त्याचा हा आमोद , आम्ही सेवूं ||* *यज्ञ नको याग, तप आणि योग |* *नामाच्या सवेग चारी मुक्ती ||* *जप तव नामी, कलियुगी स्वामी|* *आणि ध्यान कामी येत असे ||* *यथार्थ तराया सर्व सोय राया |* *भावें तव पाया ध्याता होय ||* *स्वानुभवे पाहता तुजला समर्था |* *नुरे भवव्यथा काहीं एक ||* *भीती नसे काही , शोभीता न ठाई |* *पडशि तूं आई , भक्तीविणे ||* *समर्थ तूं स्वामी , सुता निजधामी |* *कृपावंता तुम्ही सदा ठेवा ||* *श्री स्वामी समर्थ महाराज की जय* #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - ॥ श्रीस्वामी समर्थ JJ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे | | - ShareChat
150 जणांनी पाहिले
7 तासांपूर्वी
*श्री स्वामी समर्थ* *स्वामीविश्व* ☘☘☘☘☘☘☘☘ *धनकवडी म्हणजे काय?* *जीवनात असतील अडचणी, चिंता, वारंवार येणाऱ्या अपयशामुळे येणारे नैराश्य या सगळ्या गोष्टी विरून जाण्याचे ठिकाण म्हणजे धनकवडी* *धनकवडी म्हणजे काय ?* *जीवनातील अडचणीमुळे सगळे आप्तइष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी हे परिस्थिती पाहून लांब गेलेले असतात त्यावेळी मायेने जवळ करून वारंवार मी तुमच्या बरोबर याची खूण दाखवून तुम्ही एकटे नाही आहात हे सांगणार ठिकाण म्हणजे धनकवडी* *धनकवडी म्हणजे काय?* *अडचणीमुळे सगळे मार्ग प्रयत्न करून झाले तरी ही स्थिती तशीच त्यावेळीच शेवटचं आणि कायमच ठिकाण म्हणजे धनकवडी* *धनकवडी म्हणजे काय?* *आपण भजता त्या सदगुरु सेवेची पोच पावती व स्वामी समर्थांची इच्छा असेल तर मिळणार ठिकाण म्हणजे धनकवडी* *धनकवडी म्हणजे काय?* *जिथं सर्व चिंता ,अडचणी, काळजी, नैराश्य सगळं सगळं संपून जीवनात नव्याने झेप घेण्यासाठी बळ देणार ठिकाण म्हणजे धनकवडी* *धनकवडी म्हणजे काय?* *अहंकार,मोह ,माया संपल्यावर मिळणार ठिकाण म्हणजे धनकवडी* *धनकवडी म्हणजे काय?* *जिथं माझ्या बाबांची समाधी ही समाधी नुसती नावाला घेतली आहे कारण आजही भक्ताला भेटून अन दर्शन देणारा सदगुरु भक्तांची काळजी त्यांच्यापेक्षा जास्त वाहणारा सद्गुरू श्री शंकर महाराज यांनी जिथं बोलावून घेऊन भक्तीला लावतात ते ठिकाण म्हणजे धनकवडी* *श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *सदगुरु श्री शंकर महाराज की जय* #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - ShareChat
120 जणांनी पाहिले
7 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..