@khadusmulga
@khadusmulga

🌿🌴भारतीय🌵 आयुर्वेद🌱🍀

।।ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य ध

पालेभाज्यांपासून बनलेल्या डिश वाढवतील प्रतिकारशक्ती व ताकद या ऋतूमध्ये बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या मिळतात या ऋतूमध्ये बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या मिळतात. यापासून बनवलेल्या डिशमधील पोषक द्रव्ये आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. या भाज्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने वजन कमी करण्यातही त्या सहायक ठरतात. आपल्या आहारात यांचा समावेश करा. ◆पालकाची भाजी भरपूर प्रथिने, कार्बोदके आणि फायबर्स असलेली पालकाची भाजी अवश्य खावी. यातील नायट्रेट रक्तदाब कमी करण्यामध्ये मदत करते. तसेच हृदयविकारापासूनही बचाव होतो. यातील फोलेट कॅन्सरपासून बचाव करण्यात मदत करते. ◆मोहरीची भाजी कॅलरी आणि फॅटचे प्रमाण कमी असल्यामुळे ही भाजी वजन कमी करण्यास मदत करते. यामध्ये कार्बोदके, फायबर्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, सी, डी, बी-१२, मॅग्निशियम, लोह आणि कॅल्शियम भरपूर असते. सोबतच यामधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि हिवाळ्यातील आजारांपासून बचाव होतो. यातील कॅल्शियम आणि पोटॅशियममुळे हाडे बळकट व निरोगी राहतात. ◆मेथीची भाजी मेथीची भाजी नियमित खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल व लिपिड स्तर नियंत्रित राहतो. यामुळे रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित राहतो आणि मधुमेहाची शक्यता कमी राहते. यात फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, बी-६, सी, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम असते. मेथी फायबरचा उत्तम स्रोत असून यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. ◆चाकवताची भाजी यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम आढळते. या भाजीची डिश खाल्ल्याने मूतखडा होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. याशिवाय या भाजीमुळे पोटदुखी, गॅस, मलावरोध आणि अॅसिडिटी आदी समस्यादेखील दूर होतात. ही भाजी तुम्ही कालवण, कोशिंबीर, पराठा आणि त्याच्या पुऱ्या बनवूनही खाऊ शकता. ◆तांदळीची भाजी यातील लायसिन नावाचे अमिनो अॅसिड वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. या भाजीमध्ये फायटोन्यूट्रियंट्स, अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. हिवाळ्यात ही भाजी खाल्ल्याने शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढता येते. सर्दी-खोकल्यामध्ये ही भाजी खाणे फायद्याचे ठरते. #⚕️आरोग्य #आयुर्वेद
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - ShareChat
591 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
सकाळच्या या पाच सवयी तुम्हाला आयुष्यभर ठेवतील फिट आणि निरोगी अशी काही कामे आहेत जी प्रत्येक व्यक्तीने सकाळी करायला हवीत प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात करतो. कोणी सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असतो तर कोणी जिमला जातो. मात्र अशी काही कामे आहेत जी प्रत्येक व्यक्तीने सकाळी करायला हवीत. या छोट्या छोट्या गोष्टी, आपण केल्या तर आपले आयुष्य बदलून जाईल. जाणून घेऊया ती ५ कामे जी प्रत्येक व्यक्तीला करायला हवीत. ●कोमट पाणी प्या सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायला हवे. पाणी पिण्याची ही सवय लावून घ्यायला हवी. घरातल्या प्रत्येकाला तसे करायला सांगायला हवे. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने पोटातील आजार दूर होतात. बद्धकोष्ठता दूर होते. याची सुरुवात आजपासूनच करा. ●भिजलेले बादाम घ्या रात्री भिजवलेले बदाम सकाळी उठल्यानंतर खाण्याची सवय लावा. बदामांसह अक्रोडदेखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यातून शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि प्रथिने मिळते. शिवाय स्नायू मजबूत करण्यास मदत करते. ●नाष्टा गरजेचा सकाळच्या न्याहारीने शरीराला ऊर्जा मिळते. नाष्टा न केल्यामुळे कामात मन न लागणे, बेचैन होणे चिडचिड देखील होऊ शकते. निरोगी राहण्यासाठी विटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटिऑक्सिडेंट्स असलेले पदार्थ घ्या. न्याहारीत नेहमी दलिया, पोहे, इडली-सांभर, फ्रूट घ्या यातून तुम्हाला पोषक तत्त्व मिळते आणि तुम्ही दिवसभर एनर्जीटिक राहता. ●व्यायाम करा जिमला जाण्याची वेळ नसेल तर सूर्य नमस्कार सारखा योग घरातच करा. ताण आणि चिंता कमी करण्यासाठी दररोज ध्यान करणेदेखील गरजेचे आहे. नियमित चालण्याचे व्यायाम करून आपण शरीराची सक्रियतादेखील वाढवू शकता. विविध योगासनातून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. ●विचार बदला सकाळ हाेताच आजचा दिवस चांगला जाईल असा विचार करा. काही अडचण असेल तर त्यावर उपाय शोधा, नक्कीच प्रश्न सुटेल. #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - timun - ShareChat
798 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
अंडरआर्म्स काळवंडले असतील तर अशी घ्या काळजी बाजारात कित्येक स्क्रब मिळतात. पण घरच्या घरी काही स्क्रब तयार करता येतील स्लिवलेस, सिंग्लेट, हॉल्टरनेक अशा टॉप्सची सध्या चलती आहे. पण हे टॉप्स घालताना आपल्याला नेहमी टेन्शन येते ते आपल्या अंडरआर्म्सचे… कारण असे कपडे घालण्यासाठी क्लिअर अंडरआर्म्स असणे आवश्यक असते. पण काळवंडलेले अंडरआर्म्स, इनरग्रोथ यामुळे अंडरआर्म्स आकर्षक दिसत नाहीत, पण रोज काळजी घेतली तर तुमचे अंडरआर्म्स चांगले दिसू शकतात. ही काळजी घेणे खिशालाही परवडणारी आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. पण थोडावेळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी काही नैसर्गिक स्क्रबची माहिती जाणून घ्या. बाजारात कित्येक स्क्रब मिळतात. पण घरच्या घरी काही स्क्रब तयार करता येतील. एक नजर.., ●कॉफी स्क्रब जाड दळलेली कॉफी घेऊन त्यात थोडी अॅलोवेरा जेल घालून थीक पेस्ट तयार करा आणि अंडरआर्म्सना चोळा. पण अगदी १ मिनिटेच कारण हा भाग खूप नाजूक असतो. ●ओट्स कॉफी प्रमाणे ओट्समध्ये अॅलोवेरा जेल आणि थोडीशी हळद घालायची आहे. हा स्क्रब खूप सिल्की स्मुथ आहे त्यामुळे तो थोडावेळ अधिक चोळायला हरकत नाही. ●बेकिंग सोडा थोडासा बेकिंग सोडा घेऊन त्यात अगदी दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घाला आणि ती पेस्ट अंडरआर्म्सला दोन ते तीन मिनिटे लावून ठेवा आणि अंडरआर्म्स थंड पाण्याने धुवून टाका. ●मध आणि साखर मध्यम आकाराची साखर घेऊन त्यात थोडे मध मिसळून हे मिश्रण अंडरआर्म्सवर एक मिनिट घासायचे आहे. कोमट पाण्याचे काख धुवून तेथील त्वचा कोरडी करुन घ्यायची आहे. #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - ShareChat
1.3k जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
दाट दाढी वाढवण्याचे 5 आयुर्वेदिक उपाय दाढी न वाढण्याची विविध कारणे आहेत तरुणांमध्ये सध्या दाढी ठेवण्याचा ट्रेंड वाढला आहे. पण प्रत्येकाला हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. कारण प्रत्येकालाच दाट दाढी येत नाही. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हवा तसा लूक ठेवता येत नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. दाढी न वाढण्याची विविध कारणे आहेत. त्यातील महत्त्वाची कारणे म्हणजे हार्मोन बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. मात्र आयुर्वेदातील हे उपाय दाढी वाढवण्यास मदत करु शकतात. - रोज रात्री कच्चे दूध दाढीवर लावून झोपा. यामुळे केसांची वाढ होईल. - नारळाच्या तेलात ५-६ कढिपत्त्याची पाने टाकून गरम करा. त्यानंतर या तेलाने दाढीला मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा. - नियमितपणे गाजराचा ज्यूस घ्या अथवा डाएटमध्ये गाजराचा समावेश करा. - थोडीशी काळी मिरी पावडर, मध आणि लिंबूचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. - चेहऱ्याला नियमितपणे १०-१५ मिनिटे आवळ्याच्या तेलाने मसाज करा. यामुळे त्वचा मुलायम होईलच तसेच दाढी वाढेल. #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - ShareChat
414 जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
निरोगी रीरासाठी अवश्य करून पाहा हे सोपे उपाय दररोज डाळिंबाचे सेवन केल्यास अकाली वृद्धत्व येत नाही धावपळीच्या जीवनामुळे अनेक तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वेळेआधीच केस पांढरे होणे, अशक्तपणा, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टिदोष यासारख्या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत.  ■दररोज करा हे उपाय :  आवळ्याचा रस, गायीचे तूप, मध व मिश्री (बारीक खडीसाखर) प्रत्येकी १५-१५ ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशीपोटी या मिश्रणाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून दूर राहू शकता. यामुळे तारुण्यावस्था दीर्घकाळ टिकवते.  ■लसूण : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी लसणाच्या दोन पाकळ्या खाव्यात आणि त्यानंतर थोडे पाणी प्यावे. असे नियमित केल्याने अशक्तपणाच्या समस्येपासून तुम्ही लवकर बाहेर याल.  ■डाळिंब : दररोज डाळिंबाचे सेवन केल्यास अकाली वृद्धत्व येत नाही, तारुण्यावस्था दीर्घकाळ टिकून राहते. डाळिंबाचे सेवन रक्ताशी संबंधित अनेक आजारांपासून शरीराला वाचवते तसेच रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. मात्र हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.  ■संतुलित आहार घ्या : दररोज संतुलित आहार घ्यावा. आहार असा घ्या जो पचण्यास हलका असावा. आहार असा घ्या ज्यामुळे शरीराच्या पाचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ नये. खाण्यात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि खनिज तत्वांचे जास्तीत जास्त प्रमाण हवे. बाहेरचे खाद्य, तेल, तूप, आणि गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा.  ■तणावापासून दूर राहा... : जी व्यक्ती जास्त विचार करते आणि खूप ताण घेते, अशा व्यक्तीला अनेक आजार तारुण्यावस्थेतच व्हायला लागतात. जर मानसिक त्रास जास्त असेल तर चांगल्या मित्रांमध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवा. चांगले संगीत ऐका, चांगली पुस्तके वाचा, यामुळे तुमचा मानसिक ताण दूर होण्यास मदत होईल.  #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - ShareChat
457 जणांनी पाहिले
16 दिवसांपूर्वी
मुलांचे वजन वाढवायचे असेल तर हे उपाय करा... हिवाळा वजन वाढवण्यासाठी सर्वात चांगला ऋतू मानला जातो. तुमची मुले कमजोर असतील तर त्यांचे वजन वाढवण्यासाठी फॅट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ त्यांना खाऊ घातले पाहिजेत. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदचे तज्ज्ञ डॉ. सी. आर. यादव सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी... ●केळी - कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. ●फुल क्रीम मिल्क - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. ●भात - यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते. ●चिकू शेक - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते. ●मासे - यामधील ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे. ●डाळ - यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते. ●चीज - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे. ●अंडी - प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल. ●मटण - यामधील प्रथिने तुमच्या मुलांचे वजन लवकर वाढवण्यास मदत करतात. ★मुलांची उंची वाढवणारे पदार्थ ●दही - यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो. ●संत्री - यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते. ●डाळिंब - यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात. ●पालक - यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते. ●पनीर - यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात. #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - ShareChat
415 जणांनी पाहिले
16 दिवसांपूर्वी
दररोज तुळशीचा चहा प्या, प्रतिकारशक्ती वाढेल... तुळशीच्या चहामधील अँटिऑक्सिडंट्स अनेक आजार टाळण्यास मदत करतात. तुळशीच्या चहामधील अँटिऑक्सिडंट्स अनेक आजार टाळण्यास मदत करतात. हा चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. मुंबईच्या आहारतज्ज्ञ डॉ. येजनेसिनी बोस यांच्याकडून जाणून घेऊया तुळशीचा चहा पिण्याचे फायदे... ◆निरोगी त्वचा - यामधील अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा कोमल आणि उजळ बनवण्यास मदत मिळते. ◆कॅन्सर - तुळशीच्या चहामधील फ्लेवोनॉइड्स कॅन्सर टाळण्यास मदत करतात. ◆प्रतिकारशक्ती - हा चहा पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. ◆दमा - या चहामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात. ते दमा टाळण्यास मदत करतात. ◆संधिवात - यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्याचा संधिवातामध्ये फायदा होतो. ◆डोळे - तुळशीच्या चहामधील व्हिटॅमिन ए डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते. ◆मधुमेह - हा चहा पिल्यास ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते व मधुमेह होत नाही. ◆हृदयविकार - तुळशीचा चहा कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करतो. त्यामुळे हृदयविकार टाळता येतो. ◆संसर्ग - तुळशीच्या चहामधील अँटी मायक्रोबियल गुणधर्म संसर्ग होऊ देत नाही. ◆रक्तदाब : हा चहा पिल्याने रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. #⚕️आरोग्य
#

⚕️आरोग्य

⚕️आरोग्य - ShareChat
422 जणांनी पाहिले
16 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..