@khotaradi_ashu
@khotaradi_ashu

..................

thank you..sc ..😊 😊

तुझ्याशी नाही रे.. मला स्वतःशीच भांडायचं आहे.. कसं जगायचं..? किती सोसायचं..? याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे.. प्राजक्त असून दारी, फुले शेजारीच पडतात.. ज्यांचा आहे तिटकारा, असेच प्रसंग का घडतात..? नशिबाचे उधळलेले वारु, अचानक अडतात.. स्वप्नांचे इमले वास्तवात न येताच मोडतात.. अवाजवी अपेक्षांचं आता इथंच सांडायचं आहे... ||१|| तुझ्याशी नाही रे.. मला स्वतःशीच भांडायचं आहे.. कर्तव्याचं भान सोडून, थोडं मनमुराद जगायचं आहे.. सगळ्या जगाला विसरुन, फक्त माझ्याकरता काही मागायचं आहे.. बंधनं झुगारुन सगळी, बिनधास्त वागायचं आहे.. माझं जीवनगीत मला, माझ्याच सुरात गायचं आहे.. धुंद श्रावणलहरींमध्ये.. वारा पिऊन, बेफाम हिंडायचं आहे.. ||२ || तुझ्याशी नाही रे.. मला स्वतःशीच भांडायचं आहे.. सुख दुखाःचा ऊन-पाऊस, आशा निराशेचे चढ-उतार मूक संवेदनांचे हुंकार आणि कल्पनेने छेडलेली.. हृदयीची तार.. शतरंगी भावनांचे पदर, अलवार उलगडणार आहे.. आयुष्याच्या रंगमंचावर, कलंदर बनून बागडणार आहे.. अस्तित्वाच्या क्षितिजावर यशाचं तोरण बांधायचं आहे.. ||३ || तुझ्याशी नाही रे.. मला स्वतःशीच भांडायचं आहे.. कसं जगायचं..? किती सोसायचं..? याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे.. ! #📝कविता / शायरी/ चारोळी
#

📝कविता / शायरी/ चारोळी

📝कविता / शायरी/ चारोळी - ShareChat
734 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
प्रेम !! या शब्दाचा अर्थच थोडा वेगळा आहे या दोन शब्दातच मानतील भाव सगळा आहे मी तुझावर खूप प्रेम करतो ...... हे ऐकल्यावरच मन कसं भर भरून येतं आकाशा पेक्षा जास्त कुठे तरी या दोन डोळ्यातच प्रचंड वादळ भरतं. तू हवीस माला, मी नाही राहू शकत तुझा शिवाय.... या शब्दाने जग मोकळ झाल्याची जाणीव होते पण जर तू माझा बरोबर आहेस तर तळपळत्या उनाची ही जाणीव होत नसते.. तिचा स्पर्श,तिचा सहवास, तीच हसणं-रूसण सारं सारं कस्स लक्खं लक्खं मनामध्ये असतं भेटणायची तिला चाललेली धडपड तिला एकदा पाहण्याची तळमळ किती मस्त तुझा डोळ्यात मी अश्रु पाहू शकत नाही ... या शब्दातच तिच्या बद्दलची काळजी असते हसताना तिच्या गालावर पडणारी ती खळी काळजाच पाणी पाणी करून टाकते सुख दुखा सगळे गेले, बघ बघ आले तुझा जीवनात प्रेम आले खरच खूप वेगळा असतं प्रेम खरच खूप वेगळा असतं न हे प्रेम!!!!!-- #📝कविता / शायरी/ चारोळी #💗प्रेम / मैत्री स्टेट्स
#

📝कविता / शायरी/ चारोळी

📝कविता / शायरी/ चारोळी - ShareChat
804 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..