@kishor00f
@kishor00f

Kishor

“Be happy and smile when you’re around people who hate you. Your happiness will kill them.”

#

🎓जनरल नॉलेज

💁‍♂ General Knowledge 1) क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध कोणत्या कंपनीने तयार केले? उत्तर : मायलान 2) एशियामनी कडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान कोणत्या कंपनीला मिळाला? उत्तर : TCS #🎓जनरल नॉलेज 3) "गर्ल, वुमन, अदर" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? उत्तर : बर्नार्डिन इव्हारिस्टो 4) जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? उत्तर : 6 ऑक्टोबर 5) ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा कुठे आयोजित करण्यात आली? उत्तर : नवी दिल्ली 6) 2019 या वर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर : अभिजीत बॅनर्जी 7) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? उत्तर : 15 ऑक्टोबर 8) 2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर : मार्गारेट अ‍ॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो 9) ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे? उत्तर : जलशुद्धीकरण 10) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर : डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम
109 जणांनी पाहिले
10 तासांपूर्वी
#

⚕️आरोग्य

🦶🏻भेगाळलेल्या टाचांसाठी... टाचांना भेगा पडल्या असतील तर, हि गोष्ट आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. मधुमेही रुग्णांना तर पायाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. भेगाळलेल्या टाचांना बाय बाय करायचे असेल तर खालील उपाय करून पहा: ▪ बदाम, खोबरेल तेल रात्री टाचांना चोळावे आणि सॉक्स घालावेत. यामुळे भेगा कमी होतातच पण हेच तेल त्वचा कोरडी असेल तर अंगाला लावावे त्याने त्वचा नरम होते. ▪ पाय स्वच्छ धुवून व्हॅसलीनचे मालिश करून सॉक्स घातल्याने सुद्धा टाचेच्या भेगा कमी होतात. ▪ घरात बहुदा केळे असते ते कुस्करून भेगाळलेल्या टाचेवर घासून लावावे. त्यापूर्वी टाचा गरम पाण्याने धुवाव्यात. 10-20 मिनिटांनी धुवून टाकावे. 2-3 दिवसात टाचेच्या भेगा भरून येतात. ▪ मध साधारण गरम पाण्यात टाकून 10 ते 20 मिनिटे पाय बुडवून ठेवावे आणि प्युमिक स्टोनने टाचा हळुवार घासून स्वच्छ कराव्यात. हा उपाय आठवड्यांतून तीन वेळा करावा. #⚕️आरोग्य
1.1k जणांनी पाहिले
10 तासांपूर्वी
#

⚕️आरोग्य

🤨 कोंडा झालाय...? डोक्यातील कोंड्याने एकही व्यक्ती हैराण झाला, असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. कोंड्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळविण्यासाठी करून पाहा पुढील आयुर्वेदिक आणि पारंपरिक उपाय. ▪ ग्लिसरीन आणि गुलाब जल हे एकास तीन या प्रमाणात घेऊन बाटलीत ठेवा. ▪ रोज स्रान केल्यानंतर हे औषध हातात घेऊन बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळांशी लावा. कोंडा दूर होईल. ▪ खोबरेल तेलात कापूर मिसळा आणि हे तेल रोज केसांना लावा. थोड्याच दिवसात कोंडा निघून जाईल. ▪ लिंबाचा रस केसांच्या मुळांशी लावा. यानेही कोंडा दूर होतो. ▪ दह्याने केस धुवा. कोंडा जाईल. ▪ झोपण्यापूर्वी डोक्याला तेल लावा. कोरडेपणा दूर होईल. #⚕️आरोग्य
4.6k जणांनी पाहिले
11 तासांपूर्वी
#

⚕️आरोग्य

💁‍♀ तेल आणि मुलायम त्वचा आपलं सौंदर्य सर्वांनाच प्रिय असतं. ते जपणं आपल्याच हाती असतं. दाट आणि काळ्या केसांसाठी तेलाचा वापर जसा महत्वाचा असतो, तसंच काही तेल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात. 👉 खोबऱ्याचं तेल: खोबऱ्याच्या तेलाचा असा फायदा आहे कि, यातील पोषक तत्त्वांमुळे त्वचा मुलायम आणि निरोगी राहते. 👉 ऑलिव्ह ऑइल: ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ''इ'' आणि पॉलिफेनॉल्स असतात ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा चकाकते. 👉 बदामाचं तेल: बदामाच्या तेलाने हृदय निरोगी राहते. व्हिटॅमिन ''इ'', फॅटी ऍसिड या तत्त्वांमुळे बदामाचे तेल त्वचेवर सुद्धा फायदेशीर असते. या तेलाने त्वचा निरोगी रहाते आणि केस देखील मजबूत होतात. ✅ त्वचेवर कोणत्याही प्रकारचे तेल लावताना ते रात्री लावले जाईल याची काळजी घेण्यात यावी. #⚕️आरोग्य
677 जणांनी पाहिले
11 तासांपूर्वी
🗺 #इस्त्रो पहिले डिजिटल मॅप 'अ‍ॅप' तयार! ⚡ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) देशवासियांसाठी पहिले डिजिटल मॅप 'नाविक' तयार केले आहे. 2020 पासून क्वॉलकॉम प्रोसेसर असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये या मॅपचा वापर करता येणार आहे. 👀 'हे' मॅप अ‍ॅप बनवण्यासाठी इस्त्रो व क्वॉलकॉम टेक्नोलॉजीने भागिदारी केली आहे. याचबरोबर नाविक प्लॅटफॉर्मवर IRNSS टेक्निकचाही सपोर्ट मिळणार आहे. 🧐 क्वॉलकॉमची लोकेशन बेस्ड टेक्नोलॉजी सध्या भारताच्या सात सेटेलाईट्सबरोबर काम सुरु आहे. यामुळे युजर्सला अचूक लोकेशनची माहिती मिळणार आहे. 📍 इस्त्रो आणि क्वॉलकॉमने या नेविगेशन मॅपमध्ये चिपसेटचा वापर केल्यामुळे ही सेवा काही मोजक्याच स्मार्टफोन आणि ऑटोमोटिव युजर्ससाठी उपलब्ध आहे. नाविक आणि स्टँडर्ड जीपीएस मिळून काम केले तर याचे नेविगेशन एकदम अचूक असेल. 🗣 काय म्हणाले के. सिवन? : नाविकच्या मदतीने देशातील विकासाची गती वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकांना यामुळे खूप फायदा होणार आहे.
#

इस्त्रो

इस्त्रो - NAVIK TIONAVSHARE से जुड़े हुए Ne6 सैटेलाइट प्रयोग 20 . 34 HRS 02 ONM - ShareChat
91 जणांनी पाहिले
11 तासांपूर्वी
#

खेळ

🏏 पाकिस्तानच्या कर्णधाराची हकालपट्टी 💁‍♂ विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी तसेच घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सर्फराज अहमदची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. 👉 निवड समिती तसेच प्रशिक्षकांना बदलल्यानंतरही संघाच्या कामगिरीत सुधारणा होत नसल्याचे पाहून अहमदला कसोटी आणि ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदावरून काढण्यात आले आहे. 🧐 संघातील खेळाडूंच्या मनमानी वागण्यामुळे पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक मिसबाह उल हक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. 📍 दरम्यान, पाकिस्तानच्या कसोटी संघाचे नेतृत्व अझर अलीकडे तर आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे नेतृत्व बाबर आझमकडे देण्यात आले आहे. 🗣 अझर म्हणाला : पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मिळणे, हे माझे भाग्यच आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासावर खरा उतरण्याचा माझा प्रयत्न असेल. #खेळ
106 जणांनी पाहिले
11 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..