#📢21 नोव्हेंबर घडामोडी➡️
मनोज जरांगे पाटील यांची पीडित कुटुंबाला भेट
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका नराधमाने तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला व तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली.
तीन वर्षाच्या बाळावर झालेल्या अत्याचारामुळे एकीकडे महाराष्ट्र हळहळला तर दुसरीकडे राज्यात कायदा व सुव्यवस्थाच उरली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आज मनोज जरांगे पाटील यांनी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावी जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व यज्ञाला न्याय मिळवून देणार असा शब्दही दिला.