एका अपघाताने सगळं बदललं...! 30 लाखांतून झालेला 83,904.57 कोटींच्या बँकेचा ‘उदय’, मालक बनला सर्वात श्रीमंत बँकर
Kotak Mahindra Bank Success Story : उदय कोटक यांना लहानपणीच क्रिकेटर बनण्याची आकांक्षा होती, पण डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांचं स्वप्न भंगलं. क्रिकेटच्या पीचपासून दुरावल्यावर उदय कोटक यांनी बँकिंग क्षेत्रात भारताला नवीन उंचीवर नेऊन ठेवले. उदय कोटक यांनी अवघ्या 30 लाख रुपये गुंतवून एक इन्व्हेस्टमेंट कंपनी स्थापन केली, जी आज कोटक महिंद्रा बँक म्हणून अस्तित्वात आहे.