#📢1 ऑक्टोबर अपडेट्स🔴 तो, कृष्ण अंधळा होता...
कुठून अन् कसा, माझा मोबाईल नंबर विलास बडे सर यांचा आहे, अशी नोंद समाज माध्यमात झाली हे मला माहित नाही... परंतु, दोन दिवसापासुन विलास बडे सर समजुन मलाच रोज शेकडो फोन येत आहेत... ठिक आहे, तुम्ही विलास बडे नाहीत परंतु, तुमच्याकडे त्यांचा नंबर असेल तर द्या, असे म्हणत आहेत.... एका पत्रकारावर लोकांचे ईतके प्रेम अन् विश्वास असु शकतो, हे पाहुन मी अक्षरश: भारावुन गेलो आहे... प्रत्येकाचे फोन उचलत आहे, मी विलास बडे सर नाही असे सांगुन त्यांच्याशी बोलत आहे... बोलता बोलता लोक माझ्याशी व्यक्त होत आहेत... फोन करणारांपैकी बहुतांश जणांना विलास बडे सर यांचे कौतुक करायचे आहे... जेव्हा प्रचंड दु:ख होते तेव्हा, खुप जवळच्या माणसाला मिठी मारून, त्यांच्या खांद्यावर मान ठेवुन लोक ढसा- ढसा रडतात... आभाळ फाटलेल्या आजच्या अतिवृष्टीच्या संकटात शेतकर्यांना तो अश्वासक अन् आधाराचा खांदा विलास बडे सर यांचा दिसत आहे...
असो,
मराठा अथवा ओबीसी आरक्षण आंदोलने असोत किंवा... सध्याचे अतिवृष्टी अन् महापुराचे संकट... विलास बडे सर यांची पत्रकारीता, त्यांचा निपक्षपणा, संवेदनशीलता, माती अन् मातील माणसाशी असलेली आपुलकी... आपण पाहीलीच आहे... सध्या आभाळच फाटले आहे... त्याला नक्कीच शिवता येणार नाही... परंतु, या भिषण अन् भयानक संकट काळात अपद्ग्रस्तांना मायबाप सरकारपेक्षा विलास बडे सर यांच्याकडून न्याय मिळेल, अशी आशा वाटते...
किती हा विश्वास... कोण आहेत विलास बडे? शेतकरी कुटुंबातुन पुढे आलेले अन् प्रचंड संवेदनशील असलेले विलास बडे हे पत्रकारीतेच्या सुरूवातीच्या काळात ते इंडीयन एक्सप्रेस समुहाच्या अन् देश- विदेशात वाचल्या जाणार्या लोकप्रभा मासिकाचे पत्रकार होते...
लोकप्रभा मासिकात त्यांनी एक स्टोरी लिहीली होती... जी मी एकदा नव्हे, तर दोन तिन वेळा वाचली...
आज मायबाप सरकारपेक्षा जास्त विश्वास असलेल्या विलास बडे सर यांनी पत्रकारीतेच्या उमेदीच्या काळात लोकप्रभा मासिकात लिहीलेल्या तो कृष्ण आंधळा होता... या लेखाची लिंक अन् त्यांचा मोबाईल नंबर देखील पाठवत आहे....
https://mannmajhe.blogspot.com/2011/02/nice-marathi-love-story.html?m=0
तो कृष्ण अंधळा होता, नक्की वाचा... प्रतिक्रिया द्या... विलास बडे सर मोबाईल नंबर इथे देत आहे.... 86898 77772
कृपया एक नम्र विनंती... विलास बडे सर यांना फोन अथवा व्हाट्सअप मेसेज करण्यापेक्षा... टेक्स्ट मेसेज पाठवावा... एक माणूस राज्यभर चिखल तुडवत फिरत आहे... सर्वांचे फोन कॉल उचलू शकत नाही... सर्वांच्या व्हाट्सअप मेसेजला तर देऊ शकत नाही... परंतु, आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत केवळ टेक्स्ट मेसेज च्या माध्यमातून मांडूया... 🙏🙏
Vilas Bade Page
Vilas Bade