#🤷♀️या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही : धक्कादायक! महापालिका निवडणुकीनंतर हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसै थांबले, संतप्त महिलांची कार्यालयामध्ये गर्दी.............
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे ३० हजार महिलांचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा 1500 रुपयांचा मासिक हप्ता अचानक थांबल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
योजना कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात गर्दी करत चौकशी सुरू केली आहे. #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰