@naviarthkranti
@naviarthkranti

Navi Arthkranti - नवी अर्थक्रांती

मराठी माणसाला बिझनेस करायला मदत करणारी नवी अर्थक्रांती

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचे नोबेल -------------------------- भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी त्यांची पत्नी एस्तेर दुफालो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. स्विडनची राजधानी स्टॉकहोम येथे या पुरस्काराची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. अभिजीत बॅनर्जी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. 'जागतिक गरीबी निर्मुलन संशोधन' यासाठी केलेल्या शाश्वत कामाबद्दल या तिन्ही अर्थशास्त्रज्ञांना गौरविण्यात आले आहे. इकॉनॉमिक सायन्स प्रकारांतर्गत हा पुरस्कार मिळालेले अभिजीत बॅनर्जी हे भारतीय वंशाचे पण अमेरिकन नागरिक आहेत. अभिजीत हे सध्या मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते अब्दुल लतीफ जमील गरीबी पॉव्हर्टी ॲक्शन लॅबचे सह-संस्थापक आहेत. अभिजीत बॅनर्जी हे एक भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९६१ रोजी कोलकाता येथे झाला होता. त्यांनी कोलकाता विद्यापीठ आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. अभिजीत यांनी १९८८ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे. २००३ मध्ये अभिजीत बॅनर्जी यांनी ‘अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी ॲक्शन लॅब’ची स्थापना केली. या कामात त्यांना एस्तेर डुफलो आणि सेंदिल मुल्लाइनाथन यांचे सहकार्य मिळाले. बॅनर्जी हे अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस आणि द इकॉनॉमिक सोसायटीचे सहयोगी संशोधक राहिले आहेत. आर्थिक विकास विश्लेषणासाठी ब्यूरोचे माजी अध्यक्ष होते. त्यांना इन्फोसिस पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. #🗞14 ऑक्टोबर '19 news #नोबेल पुरस्कार
#

नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कार - THE SVERIGES RIKSBANK PRIZE IN ECONOMIC SCIENCES IN MEMORY OF ALFRED NOBEL 2019 Illustrations : Niklas Elmehed TON ME Abhijit Esther Michael Banerjee Duflo Kremer “ for their experimental approach to alleviating global poverty THE ROYAL SWEDISH ACADEMY OF SCIENCES - ShareChat
110 जणांनी पाहिले
4 तासांपूर्वी
✍ फ्रँचायजी बिरबल ----------------------- ३५. लॉजिक की इमोशन्स? ----------------------- तुम्हाला एका यशस्वी व सुप्रसिध्द ब्रॅंडच्या फ्रँचायझीचे मालक म्हणून करिअर घडवायचे आहे का? स्वत:च्या फ्रँचायझी व्यवसायाचे मालक असण्याचे फायदे आपण समजून घेतले आहेत. परंतु योग्य फ्रँचायझी निवडण्यापूर्वी एखादी फ्रँचायझी संधी आपल्यासाठी परिपूर्ण आहे याबाबत तुमचे हृदय व मेंदू पूर्णतः तयार आहे का? अर्थातच हा निर्णय तुमच्या भावनेवर नव्हे तर तर्कवादावर आधारित असावा. आपले डोके वापरा, मन आपोआपच साथ देईल. आपल्यासाठी कोणती फ्रँचायझी सुयोग्य व परिपूर्ण आहे, हे ठरवण्यापूर्वी आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत व आपली उद्दिष्टे काय आहेत याचा विचार करण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या. त्यासाठी आपली उद्दिष्टे, स्वप्ने व इच्छित जीवनशैली याबाबत स्वतःला प्रश्न विचारा. एका माणसाला क्रिकेटचे फार वेड होते. क्रिकेटविषयी तो फारच भावनिक होता. याचे तीव्र भावनेतून त्याने खेळाच्या साहित्याचे दुकान सुरू केले. परंतु लवकरच त्याची फसगत झाली. क्रिकेटची तीव्र आवड असूनही त्याचे दुकान काही महिन्यांत बंद झाले. कारण त्याच्याकडे एक दुकानदार म्हणून, एक व्यापारी म्हणून आवश्यक असलेली कौशल्ये व हुशारी नव्हती. फ्रँचायझी क्षेत्राबद्दल पॅशनेट (तीव्र इच्छुक) असलेल्यांसाठी हा एक धडा आहे. तुमच्या निर्णय प्रक्रियेत तुमची वैयक्तिक आवड किंवा छंद यांना प्राथमिकता देऊ नका. व्यावसायिक निर्णय घेताना ते भावनात्मक नसावेत, ते तर्कशुध्द असावेत. एका विशिष्ट फ्रँचायझीच्या यशासाठी तुमचे कौशल्य व तुमच्यातील उपजत बुद्धिमत्ता हे दोन घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. या व्यवसायात तीव्र पॅशनसोबतच लीडरशीप कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असते. फ्रँचायझी सिस्टीमच्या एकूण उद्दिष्टांबद्दल तुम्ही नेहमीच पॅशनेट व उत्साहित असले पाहिजे. परंतु आपण योग्य निर्णय घेत असल्याचे कसे सुनिश्चित करू शकता? तुम्ही योग्य लोकांशी सल्ला मसलत केले पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. एका संशोधनानुसार अनेक व्यावसायिक केवळ प्रॉडक्टची जाहिरात आवडल्याने फ्रँचायझी विकत घेतात व व्यवसाय सुरू करतात. ही भावना नैसर्गिक असली तरी केवळ भावनात्मक निर्णय घेऊन व्यवसाय सुरू करणे हा तर्कसंगत मार्ग नाही. यामुळे आपण अडचणीत येऊ शकता. एखाद्या फ्रँचायझी संधीसाठी आपल्या भावना तीव्र असतील किंवा एखाद्या फ्रँचायझी संधीने आपणास भावनिक अपील केले असेल, तर ते तुमचे अंतिम लक्ष्य साध्य करण्यास तुमची मदत करेल याची खात्री करा किंवा तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास योग्य आहे का, हे तपासून पहा. बरेच व्यावसायिक तर्कशुध्द विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन फ्रँचायझी विकत घेतात व नंतर अपयशी होतात. काही व्यावसायिक अजून एक चूक करतात. केवळ एखादे उत्पादन किंवा सेवा उदा. पिझ्झा, केकची आवड आहे म्हणून पिझ्झा स्टोअर किंवा केक शॉपची फ्रँचायझी घेतात. या लॉजिकमध्ये गुणवत्ता व कौशल्यांचे मूल्य शून्य असते. कारण या फ्रँचायझी निवडीमध्ये केवळ आपली आवड हा एकमेव आधार असतो आणि तो नसावा. तुम्ही या व्यवसायात स्वतःला कसे गुंतवू इच्छिता. एक फ्रँचायझी ऑपरेटर/मालक म्हणून की एक ऍबसेन्टी ओनर म्हणून? तसेच फ्रँचायझी सपोर्ट सिस्टीम, कॉर्पोरेट स्टाफ आणि गुंतवणूक याबाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे. केवळ भावनिक निर्णय घेऊन बिझनेस सुरू केल्यास एक सक्षम लीडर म्हणून पुढील वाटचालही आव्हानात्मक असते. ही आव्हाने योग्य रीतीने हाताळता न आल्यास अपयश पदरी पडते. वरील सर्व गोष्टी पडताळून तसेच तर्कशुध्द विचार करून आपली उद्दिष्टे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी परिपूर्ण फ्रँचायझी कोणती आहे याबाबत निर्णय घेतल्या नंतरच तुमच्या संकल्पना वास्तवात उतरतील. एका नामवंत व यशस्वी ब्रॅंडच्या फ्रँचायझीचे मालक होणे ही स्वप्नवत व रोमांचक गोष्ट आहे. परंतु भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुध्द पध्दतीने विचारपूर्वक व्यवसाय चालवला तर तुम्ही आत्मविश्वासाने यश प्राप्त करू शकता. कारण फक्त तीव्र भावनांनी यश संपादन करता येत नसते, त्यासाठी ज्ञान, कौशल्ये, स्थिर लक्ष्य व तर्कशुध्द विचारशक्ती आवश्यक असते. – प्रा. प्रकाश भोसले, सीईओ, ई-ब्रँडिंग इंडिया व्हॉटसअ‍ॅप – ९८६७८०६३९९ इतर लेख वाचण्यासाठी भेट द्या - https://www.naviarthkranti.org #बिझनेस #बिझनेस टिप्स
#

बिझनेस

बिझनेस - ३५ . लॉजिक की इमोशन्स ? फ्रँचायजी बिरबल फक्त आवड आहे , म्हणून निवड करू नका . व्यावहारिक निर्णय घ्या Onaviarthkranti . org अथक्राती - ShareChat
111 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
'परम' महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! ------------------------------------------ भारताने अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून डॉ. भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात २ जून १९८८ रोजी केली. भटकर हे तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला काम करीत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. असे असून, डॉ. विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती. विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा (ग्राहकहित-'अंबाला' ) या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११ ऑक्टोबर १९४६. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे आणि पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पूर्ण केले. भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली, असे म्हणतात. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोकर्‍यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते. विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी १९७२ साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८० ते१९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. १९९२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत १९८७ मध्ये उपाध्यक्ष झाले. भटकरांनी १९९३मध्ये परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे. त्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या. डॉ. विजय भटकर यांची तंत्रज्ञानावरची आतापर्यंत १२ पुस्तके व ८० निबंध प्रसिद्ध असून हे साहित्य युरोप, अमेरिका व भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये अधिकृत म्हणून वापरले जाते. राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांची रचना त्यांनी केली आहे. उदा. C-DAC, ER & DC त्रिवेंद्रम येथील R&D सेंटर, पुणेयेथीलI2IT, IIMV इ. डॉ. विजय भटकर यांच्या निरनिराळ्या शोध, उपक्रम व आयटी क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना जागतिक इलेक्ट्रॉनिक्स व संगणक क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणा-या संस्था IEEE व ACMयांनी 'फेलो' या अत्युच्च पदवीने पुरस्कृत केले आहे. डॉ. विजय भटकर यांच्या कर्तुत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सर्वोच्च नागरी महाराष्ट्रभूषण तर केंद्र शासनाने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले आहे. https://www.naviarthkranti.org #विजय भटकर बर्थडे #🎂हॅपी बर्थडे #🗞11 ऑक्टोबर '19 news
#

विजय भटकर बर्थडे

विजय भटकर बर्थडे - ShareChat
165 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
फ्रँचायझी विशेष -------------------------- कॉम्प्युटरचा वापर, इंटरनेट मार्केटिंग हे आजच्या पिढीतील तरुणाला उत्तमरीत्या जमते व त्याला नव्या जगाची आव्हाने खुणावत आहेत. अशा परिस्थितीत या क्षेत्रात खूप कमावता येऊ शकते. एखाद्या चालू आणि यशस्वी उद्योगाचा विशेष विक्रीय अधिकार मिळवून त्याचीच शाखा/उपशाखा चालवणे म्हणजेच फ्रँचायझी. भारतात विशेष विक्रीय अधिकार व्यवसाय माध्यमात सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे ते मॅक्डोनाल्ड, पिझ्झा हट्, डॉमिनोजसारखे परदेशी खाद्यपदार्थांचे उद्योग, तर बाटा चपला, गोल्ड जिमसारखे परदेशात आपली यशस्वी धुरा सांभाळणारे अनेक उद्योग. ज्यांना एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्यांच्याकडे भांडवल कमी आहे तसेच त्यांचा या व्यवसायाबद्दलचा अनुभव कमी आहे, अशांसाठी फ्रँचायझी हे क्षेत्र एक सुसंधी आहे. कारण या क्षेत्रातील उद्योग हे सहसा यशस्वी झालेले असतात. त्यांचा सेटअप बसलेला असतो. अशा वेळी धंद्यात नाव प्रस्थापित करणे किंवा बाजारपेठेत जम बसवणे ही उद्योगाची पहिला पायरी चढावी लागत नाही. आजच्या घडीला प्रत्येक मॉलमध्ये किमान पिझ्झा हट, कॅफे कॉफी डे, बेल्मोनट, आदिदास यासारख्या फ्रँचायझी दुकानांची गर्दी आपणाला दिसते. लोकांना जे पसंत आहे, जे चालते, ज्याच्या यशाची खात्री आहे, ज्यातून उत्पन्न, रोजगार उपलब्ध होतो असे अनेक उद्योग आपल्याला फ्रँचायझीच्या रूपाने मिळतात. फ्रँचायझीधारकाला नवीन व्यवसाय सुरू करतानाच्या अडीअडचणीपेक्षा सुरुवातीलाच एक यशस्वी उद्योगाचे नाव, त्याची कार्यपद्धती शिकायला व अनुभवायला मिळते. अमेरिकेत फ्रँचायझी पद्धत रूढ आहे. जवळपास 70 वेगवेगळ्या उद्योगांची ही बाजारपेठ 100 अब्ज डॉलर इतकी आहे. फ्रँचायझी सुरू करताना फ्रँचायझी देणारी कंपनी नियम ठरवत असते. जसे जागा ठरवणे, भांडवलाची रक्कम, कंपनीची कार्यपद्धती, नफ्या-तोट्याचे प्रमाण. अशा प्रकारे फ्रँचायझी घेणाऱ्या उद्योजकाला कंपनीशी त्या पद्धतीने अ‍ॅग्रीमेंट करावे लागते. आपल्या देशात 2 लाखांपासून ते कोट्यवधी रुपयांची फ्रँचायझी उद्योगाची उलाढाल आहे. फ्रँचायझरला दोन महत्त्वाची भांडवल गुंतवणूक करावी लागते. एक म्हणजे ‘रॉयल्टी’ ट्रेडमार्कबाबत आणि दुसरी प्रशिक्षण व मार्गदर्शन फी. प्रत्येक फ्रँचायझीची कालमर्यादा असते. हे अ‍ॅग्रीमेंट साधारणत: 5 वर्षांपासून ते 30 वर्षांपर्यंत असते. भारतात फ्रँचायझी उद्योग फारसा रुजलेला नाही. कारण येथे परकीय गुंतवणुकीसाठी कडक नियम आहेत. कृषी क्षेत्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा आपणा सर्वांना माहीतच आहे. पण एक व्यवसाय म्हणून हा उद्योग नव्या पिढीसाठी एक उत्तम पर्याय आहे. आपल्याकडे ‘आमची कुठेही शाखा नाही’, ‘आमच्या या शाखा आहेत’, असे बोर्ड दिसतात. आता ‘आमच्या फ्रँचायझी शाखा इथे आहेत,’ असा बदल घडताना दिसतोय. आजच्या पिढीत शिक्षणासोबतच काळाची पावले ओळखून, सकारात्मकतेने पुढे जाण्याची धमक आहे. धोका पत्करण्याची सकारात्मकताही आजच्या पिढीत आहे. कॉम्प्युटरचा वापर, इंटरनेट मार्केटिंग हा वर्ग उत्तमरीत्या जाणतो व त्याला नव्या जगाची आव्हाने खुणावत आहेत. अशा परिस्थितीत या क्षेत्रात खूप कमावता येऊ शकते. - पद्मश्री राव, --------------------------- https://www.naviarthkranti.org/ #बिझनेस टिप्स #बिझनेस #बिझनेस
#

बिझनेस टिप्स

बिझनेस टिप्स - ShareChat
136 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..