@only9176
@only9176

👄👄🌷🌷 K 💜KUMAR👄👄🌽🌽🌷🌷

🌱🌱🌹🌹🌹🌺🌺🌺जास्तीत जास्त कमेंट करा मुलींना तर कोणीही करत मुलांना कमेंट करा 💙💜🌺💞👄👄🌷🌷

#

🎓जनरल नॉलेज

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ🚩🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 छत्रपति शिवाजि महाराजांच्या घराण्याविषयी व वंशावळीविषयी केलेले लिखाण वाचनात आले. खुप छान आणि उपयुक्त माहिती त्यांनी दिली आहे. त्यानंतर माझ्या वाचनात काही पुस्तके आली. त्यांचाच संदर्भ घेउन हे लिखाण मी करीत आहे. आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज" व प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' यांनी लिहिलेले क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज" ही ती दोन पुस्तके. दोघांनीही आपापल्या पुस्तकामध्ये भोसले घराण्याच्या पुरवजांविषयी लेखन केले आहे. ते मी इथे थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करतोय. आनंद घोरपडे आपल्या पुस्तकात लिहितात " अल्लाउद्दीन खिअलजीने ज्यावेळी इ.स.१३०३ मध्ये चित्तोडवर स्वारी केली, तेव्हा झालेल्या लढाईत राणा लक्ष्मणसिंह ठार झाला. राणी पद्मिनीने इअतर राजस्त्रीयांसहीत आत्मत्याग केला.लक्ष्मणसिंहाचे सात मुलगे या लढाईत ठार झाले. आठवा मुलगा अजयसिंह चित्तोडच्या गादीवर आला. अजयसिंहाला सजनसिंह आणि क्षेमसिंह असे दोन मुलगे होते. एका लढाईत दोघांनाही आलेल्या अपयशामुळे रागावलेल्या अजयसिंहाने पुतण्या हमीरला गादीवर बसवले. त्यामुळे नाराज होऊन हे बंधू इ.स.१३२० च्या सुमारास मेवाड सोडुन दक्षिणेकडे आले. सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह यांनी बहामनी राज्याची स्थापना करणार्‍या हसन गंगू बहामनी यांच्याकडे नोकरी पत्करली. याच दिलिपसिंहापासूनच्या १२व्या पिढित (सन १५३३) बाबाजी यांचे पुत्र मालोजी हे जन्माला आले. मालोजी हे शहाजी राजांचा जन्म झाला. दिलिपसिंहाच्या नातवाचे नाव 'भोसाजी' असे होते. याच नावामुळे पुढे हा वंश भोसले म्हणुन ओळखला जाउ लागला असे काही जाणकार मानतात. काही इतिहासकरांच्या मते भोसले हे नाव 'भूशल' पासुन पडलं अस्ल्याचं अधिक संभवनीय वाटतं. त्यांच्या मते 'भूशल' चा एक अर्थ 'भूतलावरील शस्त्रधारी' म्हणजेच 'क्षत्रिय योध्दा' असा आहे. त्यामुळे भूशलचे वंशज हे भौषल, भौसल, भोसल, भ्सला, भोसले अशी भोसले या शब्दाची परंपरासिद्ध, इतिहास सुसंगत व्युत्पत्ती ठरते. पण हे भोसले घराणे चित्तोडच्या राजपुत सिसोदे वंशातील अस्ल्याची वंशावळ उपलब्ध आहे. तसेच खुपशा जुन्या कागदपत्रांमध्ये शहाजीराजे आणि शिवाजी राजांचा उल्लेख राजपुत म्हणुन केल्याची नोंदही मिळते. हे झाले आनंद घोरपडे यांच्या पुस्तकाबाबत. प्रा. रा आ. कदम यांनी तर आपल्या पुस्तकात सजनसिंहापासुनची वंशावळच दिली आहे. तीच सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी हा खटातोप मी केला आहे. वंशावळ १. सजनसिंघ २. दिलिपसिंघ ३. सिंघजी ४. 'भोसाजी' ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रुपसिंघ ९. भुमिंद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजी १५. बाबाजी १६. मालोजी १७. साहजी १८. शिवाजी १९. संभाजी संदर्भ - सिद्धांत विजयः पृष्ट ८४-८५) हि दोन्ही पुस्तके वाचनीय आहेत. आत्तापर्यंत वाचनात न आलेला इतिहास आपल्याला जाणुन घेता येईल. या सर्व लिखाणासाठी त्यांनी केलेला अभ्यास व केलेली मेहनत वंदनिय आहे. ती सर्वांपर्यंत पोहोचावी हीच सदिच्छा. ⚃🚩🚩👄👄💖💋💋💗🖤🖤💜💜💛💛💚💙🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
209 views
4 hours ago
ShareChat Install Now
ShareChat - Best & Only Indian Social Network - Download Now
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because