आज राजापूर येथे काही कामानिमित्ताने गेलो असता. येथे रिक्षा चालवणाऱ्या या भगिनी भेटल्या. रिक्षाच्या ड्रायव्हर सिट वर त्यांना पाहून कुतूहल मिश्रित आश्चर्याचा धक्का बसला आणि अभिमानही वाटला. त्यांची विचारपूस केली त्यांचे नाव श्रीमती सानिका वालेकर राजापूरच्या च आहेत. त्यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यांना तीन मुली आहेत. कुटुंबाची जबाबदारी आली. कुठे नोकरी ची गुलामी करायची नाही स्वतःचा व्यवसाय करून पोट भरायचे या निश्चयाने त्यांनी रिक्षा घेऊन शिकून चालवायचे ठरवले. त्यानुसार त्या रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. सकाळी पाच वाजल्यापासून त्या रिक्षा चालवतात. सकाळी जास्त भाडी मिळतात त्यामुळे सकाळी लवकर उठून रिक्षा चालवतात. त्यानंतर घरातील बाकी कामे आटपून विश्रांती घेऊन पुन्हा दिवसभर रिक्षा चालवतात.
माझ्या मते रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षा चालवणाऱ्या एकमेव असाव्यात. कुणी अजून असतील तर त्यांचाही अभिमान.या श्रीमती सानिका वालेकर मला महिलांना दिशा देणाऱ्या भासल्या. महिलांना परिस्थितीमुळे कोणतेही काम "कसे करू?" हा प्रश्न सोडवणाऱ्या त्या आदर्श महिला आहेत. त्यांच्या संमतीने त्यांचा फोटो काढला. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी अशा महिलांचा आदर्श मानून पुढे यायला हवे.
सानिका जी आगे बढो...तुमच्यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळेल..
#ऑटो रिक्षा ने महिलेला फरकळत नेले #🛺रिक्षा व्हिडिओज 🌟 #रिक्षा अचानक उडाली हवेत #रिक्षा चालकाने रागात बाईकस्वाराला दिली धडक #मध्यरात्री चालकाशिवाय सुरु झाली रिक्षा