@rupali891
@rupali891

😘 Rupali Kadam 😍

❤I love my mom ❤

#

⛳स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी

छत्रपती संभाजी राजे.. वजन - 220 किलो ऊंची - 7 फुट 8 इंच जेवण - 35-40 भाकरया दिवसातून दोनदा तलवारीचे वजन - 65किलो पराक्रम - 203 युद्ध लढले एकही न हरता सर्वात मोठे युद्ध- समोर शत्रूचे 5 लाख सैन्य उभे व आपले सैन्यबळ फ़क्त 37 हजार असून सुद्धा स्वराज्याला विजय प्राप्त करून देणारा एकमेव शुर.एकाच युद्धात जवळ जवळ 2 लाख शत्रुंना एकटाच मृत्युमुखी पाडणारा जगातील एकमेव योद्धा. अरे आपल्याला साधा 15 किलो चा सिलिंडर उचलवत नाही तर विचार करा आपल्या वजनाइतक्या जड़ तलवारि उचलून कसे काय युद्ध जमत असेल या मावळ्यांना.. गर्व बाळगा की असे शूरवीर आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. "छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्मरण दिन." शंभुराजांना पकडून जेव्हा औरंगजेबासमोर आणलं, तेव्हा तो औरंगजेब "सिवाच्या पोराला" पाहायला सिंहासन सोडून खाली उतरला. अत्याचाराने माराने घायाळ झालेले शरीर, पण....मान ताठच, नजर हि तशीच....त्या नजरेकडे पाहत औरंगजेब विचार करू लागला.... तो हाच का संभा??ज्याने ह्या आलमगीराला नऊ वर्षे रानोमाळ हिंडवल.... एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन फिरतो तद्वतच ह्याने मला फिरवलं..... माझे नामांकित सरदार ज्यांच्या शौर्यावर मी अनेक लढाया जिंकल्या, त्यांनाच ह्याने आस्मान दाखवलं?? माझी कैक लाखांची सेना लांबून एखाद्याने पहिली तर छातीत धडकीच भरावी एवढं अफाट मनुष्यबळ.... पण ह्या संभाजीने पार वाट लावली त्यांची, तो हाच का संभाजी?? वाटलं होत संभा म्हणजे शिवाजीच्या पोटाला आलेला तख्तनशील वारीस, संभाजी म्हणजे व्यसनी, दुराचारी, संभाजी म्हणजे बदफैली, संभाजी म्हणजे नादान बच्चा सिवाचा, पण..... पण नाही, माझा अंदाज साफ चुकला, ह्या नादान पोरानं बुढाप्यामध्ये मला जवान बनवलं, त्या सिवापेक्षा दहापट अधिक तापदायक आहे हा संभाजी..... अरे त्या सीवाने माझे किल्ले किल्ले जिंकले, प्रदेश जिंकला पण कधी बुऱ्हाणपूरला हात नाही घातला, पण हा संभाजी गादीवर आला आणि सगळ्यात आधी ह्याने बुऱ्हाणपूर लुटलं, भागानगर जाळून टाकलं, कैक कोटींचा खजिना ह्याने ओढून आपल्या वळचणीला टांगला... साढे आठ वर्षांचा असताना हा आला होता सिवाबरोबर आग्र्यात, त्यावेळी मी त्याला विचारलं होत... "क्यों रे संभा, तुम्हे डर नही लगता हमारा??" तेव्हा हा म्हणाला होता, "हमें किसीका डर नही लगता, पर हमारी वजाहसे सबको डर लगता है." हाच तो संभाजी.... पुरे हिंदुस्थान के आलमगीर होना चाहते है हम... पण माझ्या ह्या महत्वाकांक्षेलाच यानं छेद दिला, बुढाप्यामध्ये जवान बनवला ह्या पोराने मला, ह्याची माणसं हि तशीच बेडर, धाडसी, पराक्रमी, तो तो तो नाशिकचा किल्ला "रामशेज".... किल्याच्या खाली माझी ३०-४० हजारांची फौज आणि किल्ल्यावर ह्याची अवघी ६०० माणसं, पण सहा वर्षे अजिंक्य ठेवला किल्ला त्यांनी, माणसाच्या हृदयात काय पेरतो हा कुणास ठाऊक? मी इंग्रजांना ह्यांच्याविरुद्ध चिथावलं, पुर्तुगीझांना ह्यांच्याविरुद्ध उभं केलं, सिद्दी ला ह्याच्या विरुद्ध लढायला प्रवृत्त केलं, पण सगळ्यांच्या उरावर पाय देऊन हा उभा राहिला, इंग्रजांना चारी मुंड्या चित केलं, पुर्तुगीझांची हाडे खिळखिळी केली, जंजिऱ्याच्या सिद्धीचा तर कंबरडंच मोडलं ह्याने, माझं कैक लाखाचं सैन्य, माझे नातलग, माझे शाहजादे ह्या सगळ्यांवर जबरदस्त जरब बसवली ह्याने, माझ्या सैन्याने तर आपण कुठे मरणार हे पण गृहीत धरलं होत. मद्रास, पाषाणकोट, तंजावर, जंजिरा, प्रत्येक जागी हा आणि ह्याची माणसे आहेतच, जळी स्थळी काष्टी पाषाणी जणू हाच दिसत होता मला, कसल्या मिट्टीचा बनलाय हा?? औरंगजेब आसन सोडून उठला आणि त्या खुदाचे आभार मानायला जमिनीवरून गुडघे टेकून बसला..... "अय खुदा, आखीर तुने वो दिन दिखाया..... शुक्रगुजार है हम तेरे" त्याच वेळी शंभूराजे कविराज कलशांना विचारते झाले, "काय कविराज ह्या अशा वेळी सुचतीय का एखादी कविता?" आणि तत्क्षणी कविराज बोलते झाले.... "राजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग" याचा अर्थ असा : राजन काय लढलात आपण... काय तुमचं ते शौर्य.... तुमचा प्रताप पाहून हा औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर गुढघे टेकून बसलाय..... आणि मग सुरु झालं अत्याचारांचा पाशवी खेळ, ४२ दिवस सतत, सलग, क्षणाक्षणाला, भीमा-इंद्रायणी सुद्धा आसवं गळू लागल्या.... ह्या अत्याचारांच्या शृंखलेत एक दिवस असाही आला जेव्हा "मियाखान" ज्याच्या दोन्ही मुलींची लग्ने स्वतः संभाजीराजांनी स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली होती, तो आला... पाहिलं त्याने "मराठ्यांच्या राजाची झालेली दुरावस्था", डोळे काढलेत, कान कापलेत, हातापायाची बोटे छाटलीत, रक्त....फक्त रक्त ठिबकतंय त्यातून... चामडी सोलून काढलीय पूर्णांगाची.... त्यावर बसणारे किडे, माश्या पहिल्या, त्यांचा होणार त्रास बोलून दाखवायला वाचाच राहिली नव्हती.... जीभ छाटली होती माझ्या राजाची.... तो मियाखान अशाही परिस्थितीत विचारता झाला शंभू राजांना, "राजं वाचवू का तुम्हाला?? घेऊन जातो तुमच्या स्वराज्यात..." आवाज ओळखीचा वाटला तशी शरीराची तगमग, तडफड सुरु झाली, हातपाय हलायला लागले, उठून बसायचा एक केविलवाणा प्रयत्न आणि तो हि सपशेल फसला.... सततचे अत्त्याचार सोसून जर्जर झालेला देह साथ देईनासा झाला.... आणि त्यांची अशी अवस्था पाहून पुन्हा मियाखान बोलला.. " नको राजं.... नकोच..... तुम्हाला हा असा स्वराज्यात घेऊन गेलो तर तिथली रयत माझ्यावर छी थू करेल, मलाच मृत्यूच्या दाढेत लोटून देईल... विचारेल मला ज्याने तुझ्या मुलींची लग्ने स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली त्या... त्या आमच्या राजाची अशी अवस्था झाल्यावर त्याला आमच्याकडे घेऊन येताना तुला लाज नाही वाटली का?? नाहीत सहन होणार मला त्यांच्या आरोपांच्या फैरी.... त्यापेक्षा तुम्ही इथ मेलेलंच बरं...." हे शब्द ऐकताच थरारला-शहारला छावा, साखळदंडांनी जखडलेल्या देहाला हिसके बसायला सुरुवात झाली.... त्यांच्या आवाजांनी त्या भयाण रात्रीची शांतता भंग पावली, चोरट्या पावलांनी शंभुराजांना भेटायला, पाहायला आलेला मियाखान मृत्यूच्या कराल दाढेत अडकल्यासारखा जागच्या जागीच थिजून थरथरायला लागला... मशाल विझली.... आणि त्यातून ऐकू येऊ लागला साखळदंडांचा संथ आवाज... काही वेळानंतर तो आवाजही थांबला..... संभाला काय झालं हे पाहायला आलेल्या एका पहारेकरी हशमाला तो रक्तात लोळागोळा होऊन पडलेला शंभूंचा देह हातातल्या मशालीच्या उजेडात दिसला.... तो पाहिल्यावर एक विषारी फुत्कार टाकून तिथे असलेली एक मशाल पेटवून तो हशम शंभूराजांपासून निघून गेला... अंधारात लपून बसलेला मियाखान काही वेळानी बाहेर पडला.... मघाचा साखळदंडांचा आवाज त्याला राजापर्यंत यायला भाग पाडत होता.... तो आला... आला... जवळ आला... समोरच्या मशालीच्या उजेडात मघाची झालेली हालचाल कशासाठी होती हे शोधू लागला आणि तिथल्याच एका दगडी शिळेवर बोटं तुटल्या हाताने शंभूराजांनी लिहिलेले शब्द वाचून पुरता शहारला... ती वाक्ये होती "वाचवाच मला खांसाहेब, माझ्या नुसत्या जिवंत असण्यानेसुद्धा हा औरंगजेब बादशहा खंगून खंगून मारून जाईल.... वाचवाच मला खांसाहेब" मरणाच्या दाढेत पडलेला असूनसुद्धा... अरे मृत्यू देहावर, विचारांवर थैमान घालत असताना सुद्धा फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी जगायची, रयतेसाठी लढायची, अशाही परिस्थितीत असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून पुरता भारावून गेला... एखाद्या लहान बाळासारखा मुसमुसून रडायला लागला.... अल्लाहकडे हात पसरून बोलायला लागला, "इन्सानियत का सच्चा वारीस आज तेरे करीब आ रहा है, उसपे अपनी रेहमात बरसा, तेरे जन्नत के दरवाजे इस पाकदिल इन्सान के लिये हमेशा खुले रख".... अरे दुष्मनाच्या काळजात घर करून राहिलेला... दुश्मन ज्याच्या अफाट ताकदीचा चाहता झाला... त्या.... त्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतीला, दस्तुरखुद्द छात्रपती शिवरायांच्या छाव्याला आमच्या स्वकीयांनीच रेखाटताना खूप वेगळा रेखाटला.... आम्हाला संभाजी सांगितला ना... पण तो सांगितला असा... संभाजी म्हणजे व्यसनी, बदफैली, रगेल आणि रंगेल, आणि तेवढाच संभाजी आम्ही लक्षात ठेवून त्याच बलिदान मात्र सोयीस्कररीत्या विसरून गेलो.. ९ वर्षे... सलग ९ वर्षे... इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्धी, मोघल अशा एक नाही तब्बल बारा बारा आघाड्यांवर स्वराज्यासाठी दुश्मनांची ससेहोलपट करणारा संभाजी आम्हाला कुणी सांगितलाच नाही... वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत पंडित ठरलेला, सातसतक, नखशिखा, बुधभुषणंकार झालेला नृपशंभो आम्हाला कुणीच नाही दाखवला, दुष्काळाने पीडित रयतेला शेतसारा माफ करून सरकारातून पैसे आणि बी-बियाणं पुरवून शेतीला आणि शेतकऱ्याला आधार देणारा जाणता राजा नाही सांगितला... तब्बल १४० लढाया करून एकही लढाईत पराभूत न झालेला रणमर्द सर्जा संभाजी आम्हाला कळूच दिला नाही कुणी... स्वतःच्या बायकोला "स्त्री सखी राज्ञी जयती" असा 'किताब देऊन तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीला उघड आव्हान देत स्त्री पुरुष समानतेचं मूळ धरून मुलखीं कारभार सोपवणारा द्रष्टा सुधारक कधी सांगितलाच नाही आम्हाला.... वडिलांच्या स्वराज्य मंदिरावर स्वतःच्या प्राणांची आहुती देत कळस चढवणारा, "पुत्र व्हावा ऎसा गुंडा-ज्याचा तिन्ही लोकी झेंडा" ह्या तुकोबारायांच्या पंक्तीला पुरून उरलेला सज्ञान कर्ता पुत्र नाही सांगितला... भक्ती आणि शक्तीचा सुंदर मिलाफ ठरलेली पंढरपूरची वारी आणि संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर आदी विभूतींच्या पालख्या सुरु करून त्यांना सरकारातून खर्च आणि संरक्षण देणारा संस्कृती पुरस्कर्ता नाहीच दाखवला.. रामशेज सारखा सगळ्यात कमी उंचीचा पठारी किल्ला सतत सहा वर्षे कमी मनुष्यबळावर झुंझवता ठेवणारा झुंझार रणमर्द नाही दाखवला.... रयतेला छळणाऱ्या सिद्दीला समुद्रात बुडवायचा चंग बांधून ८०० मीटर लांबीचा समुद्रात भराव टाकून पूल बांधणारा इंजिनियर नाहीच सांगितला... राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे माफ करून वडिलधाऱ्यांचा मान आणि इज्जत अबाधित ठेवणारा एक मानी संस्कारी राजा नाही सांगितला कुणी... बाणांच्या वर्षावात मनुष्यहानी होऊ नये म्हणून जनावरांच्या कातडीची जॅकेट तयार करून सैन्याची काळजी वाहणारा रणमर्द झुंजार नाही दाखवला.... मराठ्यांच्या स्वराज्याचा दुसरा छत्रपती, धाकलं धनी संभाजी महाराज.... ज्याचा जवळचा मित्र रायाप्पा एक "महार", ज्याला सोडवायला तयार झालेला मियाखान एक "मुसलमान", आपल्या धन्याच्या मरणाची वाट आपण शत्रूला दाखवली म्हणून १०-१२ वर्षांच्या वयात पश्चात्ताप करत शत्रुलाटेवर तुटून पडत त्यांच्या छावणीतले डेरेदांडे जाळत मृत्यू जवळ करणारी ती आठ पोरं "धनगर", मलकापुरात दहा हजाराची राखीव आणि अजिंक्य फौज तयार करून देणारा, कवी आणि कवित्व जपतानाच राजधानी रायगडावर आलेलं शत्रू वावटळीची शेंडीला गाठ मारून धूळधाण उडवणारा... राजाचा श्वास जणू असा कविराज कलश एक "ब्राम्हण", "#ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो?? आणि #मराठा म्हणून कोण पाठी घालतो"?? अशी कणखर भूमिका ठेवणारा द्रष्टा व बहुजनवादी राजा म्हणजेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती... धाकलं धनी.... महाराज... रणमर्द झुंजार... छावा.... सर्जा संभाजी छत्रपती ! देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था.... महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था.... "शंभूराज तुम्हाला ह्या मावळ्याचा त्रिवार मनाचा मुजरा." सकलकुलमंडीत_अखंड_लक्ष्मीअलंकृत_राजकार्य_धुरंधर_संस्कृत_पंडित_रणमर्द_छावा_छत्रपती_श्री_संभाजी_महाराज_कि_जय. #जय_जिजाऊ...... #जय_शिवराय
67.2k जणांनी पाहिले
9 दिवसांपूर्वी
#

👨‍👧बाबांची लाडकी

_*प्रेम कुणावर करावं?*_ हळदीच्या अंगानं कालच उंबरा ओलांडून सासरी आलेली गीता! एकीकडे नव्या आयुष्याची गुलाबी स्वप्नं रंगवण्यात दंग तर दुसरीकडे जबाबदारीच्या जाणिवेनं धास्तावलेली. आईबाबांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. शिक्षणात हुशार, शिवाय खेळ आणि इतर अनेक छंदात चिक्कार गती असलेली. त्यामुळे घरातली कामं, स्वयंपाक याची फारशी सवय नव्हती तिला. हे सगळं शिकायला कधी वेळच नाही मिळाला. आता लग्न करून सासरी आल्यावर हे सगळं कसं निभावणार आपल्याच्यानं, याचं चांगलंच टेन्शन आलं होतं तिला. तशी सासरची मंडळी प्रेमळ होती आणि समजूतदारही, पण ताण होताच. शिवाय मुलगी सासरी जायची म्हणून आईनं आणि माहेरच्या जुन्या जाणत्या माणसांनी केलेला खंडीभर उपदेश. सासू-सासर्‍याचं मन जिंकून घे. घरातल्या जबाबदाऱ्या स्वत:हून अंगावर घे. सगळं घर जागं व्हायच्या आधी उठत जा. वगैरे वगैरे. आज सकाळी ती जागी झाली ते याच सगळ्याचं ओझं डोक्यावर घेऊन. सगळं घर अजून साखरझोपेत असताना तिनं उठून चहा केला, नास्ता रांधला आणि घर हळूहळू जागं झालं तसतसं सगळ्यांची खातीरदारी करण्यात ती गुंतून गेली. सासूनं तोंड भरून केलेलं कौतुक तिला सुखावून गेलं. नवर्‍याच्या डोळ्यातही तेच कौतुक पाहून तर तिच्या अंगावर मूठभर मास चढलं. अशा रीतीने गीताचा नवा संसार सुरू झाला. घरच्या माणसांच्या पसंतीची पावती मिळवण्यासाठी कष्ट करण्यात ती गुंतून गेली. तिचं कौतुक करताना सासूला तर शब्द कमी पडायला लागले. गीताही खुश होतीच; पण तिच्या आवडीच्या गोष्टी करायला मात्र तिला अजिबात वेळ मिळेना. असेच काही महिने गेले. गीताला आता एक उत्तम पगाराची नोकरी लागली. मग एक-दीड वर्षानं तिला बाळ झालं. आता गीताचं आयुष्य खूपच बिझी झालं. शिवाय घरातल्या अनेक जबाबदाऱ्या तिनं अंगावर घेतल्या होत्या. घरच्या माणसांकडून कौतुक करून घेण्याची नशाच होती ती! घरातल्या कुणाचं माझ्यावाचून पान हलत नाही, याचा काहीसा गर्वच तिला व्हायला लागला होता. त्यामुळे ती प्रचंड कष्ट ओढायची. पण हळूहळू गीता चिडचिडी व्हायला लागली. तिचा राग नवऱ्यावर आणि बाळावर सतत निघायला लागला. ती कधीही आनंदी, उत्साही दिसत नाही म्हणून नवरा वैतागू लागला. मग भांडणं सुरू झाली. एका गुण्यागोविंदानं सुरू झालेल्या संसाराची घडी आता अशी उसवायला लागली. वाचताना असं वाटलं ना की आपलीच कहाणी?.. *का होतं हे असं?* "किती काम करतेस रोज आणि सगळं कसं परफेक्ट. 'यू आर अ सुपरवुमन' या लोकांनी केलेल्या कौतुकाचं व्यसनच लागतं जणू. आपल्या या सुपरवुमनच्या प्रतिमेत बायका स्वत:च इतक्या अडकतात, की माणूस म्हणून जगायलाच विसरतात. प्रत्येकीला एक उत्तम आई व्हायचं असतं, उत्तम बायको, उत्तम सून, मुलगी आणि शिवाय ऑफिसमध्येही उत्तम नोकरदार आणि सहकारी. ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकातलं एक वाक्य मला फार आवडतं. ‘लग्न झाल्यावर नव्या नवरीनं तेवढंच चांगलं वागावं जितकं आयुष्यभर वागायला जमेल’ किती खरं आहे हे! कौतुक करून घेण्यासाठी माणूस एक-दोन दिवस जास्त कष्ट करू शकतो, स्वभाव नसला तरी गोड गोड वागू शकतो. आयुष्यभर कसं वागणार असं? त्याचा ताण यायला लागतो. शरीरावरही. मनावरही. शिवाय बाकीच्या जबाबदाऱ्या वाढतात, वय वाढतं, तशी तब्येत ढासळते (कारण तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच झालेला नसतो). आपण सगळ्यांसाठी राबराब राबतोय तरी आपल्याला काय आवडतं हे कुणाच्या खिजगणतीतही नाही, असे विचार सतत मनात यायला लागतात. या सगळ्याचं कारण आहे स्वत:साठी वेळ दिला की त्याचा बायकांना येणारा गिल्ट! स्वत:वर पैसे किंवा वेळ खर्च करणं हा गुन्हा आहे या समजातून आपण बायका कधी बाहेर येणार आहोत? जो माणूस आधी स्वत:ला खुश ठेवतो तो आणि तोच दुसऱ्यालाही आनंदात ठेऊ शकतो हे आम्हाला कधी कळणार? स्वत:चं मन मारून, आवडणाऱ्या गोष्टी सतत स्वत:ला नाकारून, स्वत:च्या आनंदाचे बळी देऊन त्यावर जर आपण दुसर्‍याच्या आनंदाचे इमले बांधत राहिलो तर ते कधी ना कधी ढासळणारच. मग भले ती दुसरी व्यक्ती म्हणजे अगदी तुमच्या पोटचं मूल असेल किंवा तुमचा नवरा. स्वत:वर जरासं प्रेम करायला शिकूया! मला, माझ्या मनाला, माझ्या शरीराला काय हवंय ते ओळखायला शिकू या! स्वत:च्या इच्छा, आकांक्षा, आवाडी-निवडी यांचा जरा आदर करूया! तुमचं शरीर जर अलीकडे थकायला लागलंय जरासं तर स्वत:ला आरोग्यपूर्ण ठेवणं ही आधी तुमची जबाबदारी नाही का? ती जर तुम्हालाच समजली नाही तर इतरांना कशी कळेल? आणि तुम्ही स्वत:ला जर आरोग्यपूर्ण ठेवलं तर तुम्ही घरातल्या इतर जबाबदाऱ्या जास्त चांगल्या पद्धतीनं आणि आनंदानंही पार पाडू शकाल असं वाटत नाही का? तर सांगा आता आपल्या या गीतानं आता काय करायला हवं? तर सगळ्यात आधी *‘सुपरवुमन’* या आपल्या पदवीचा त्याग करायला हवा. आपल्या इतरांनी केलेल्या कौतुकात रमण्यापेक्षा आपल्याला काय हवंय हे आधी समजून घ्यायला हवं. वाढत्या जबाबदार्‍यांमुळे आणि वाढत्या वयामुळे सगळं पूर्वीसारख्या उत्साहानं करायला जमणार नाही हे समजून घ्यायला हवं. शिवाय स्वत:ला आनंदी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हेही समजून घ्यायला हवं. आधी एक तर हे स्वत: समजून घ्यायला हवं आणि मग घरातल्या मंडळींना हे प्रेमानं पण ठामपणे समजावून सांगायला हवं. आणि मग स्वत:ला रोज थोडातरी वेळ द्यायला हवा. त्या वेळात तिनं काहीही करावं. एखादा छंद जोपासावा, व्यायाम करावा, मैत्रिणींना भेटावं किंवा अगदी डोक्यावरून पांघरूण घेऊन ताणून द्यावी. आपल्यापैकी कितीजणी नियमितपणे मैत्रिणींबरोबर वेळ घालवतात? त्यांच्याबरोबर एखाद्या सोलो ट्रीपला जाणं वगैरे तर दूरच पण वेळ काढून कितीजणी मैत्रिणींना भेटतात? मुलांच्या परीक्षा, पाहुणे, बाई आली नाही, सासू-सासर्‍यांची आजारपणं, हजार कारणं मधे येतात आणि आपण मैत्रिणींना भेटणं टाळत राहातो. मध्यंतरी एक छान लेख वाचनात आला. *'ऑक्सिटोसीन'* हे बायकांमधलं *‘लव्ह हॉर्मोन’* आहे. ते स्त्रवलं की बायकांना मस्त वाटतं, त्या खुश असतात. आणि ते सर्वात जास्त कधी स्त्रवतं माहितीये? आपल्या मैत्रिणींच्या सहवासात. मुलाबाळांच्या किंवा प्रियकराच्या सहवासात नाही तर मैत्रिणींच्या सहवासात! जीवलग मैत्रीणींना भेटून आल्यावर खूप वेळ आपल्याला छान वाटत राहातं, ते शरीरात स्त्रवलेल्या या 'ऑक्सिटोसीन'मुळे. मग इतक्या साध्या गोष्टीनं आपल्याला छान वाटणार असेल आणि आपण खुश राहिल्यानं सगळं घर खुश राहाणार असेल तर असे छोटे छोटे आनंद का नाकारायचे आपण स्वत:ला? माझं एक ऐकाल, आजपासून एक पण करा की, ‘मी सुपरवुमन बनायला जाणार नाही. माझ्यावर प्रेम करायला शिकेन. स्वत:ला खुश ठेवायला शिकेन. स्वत:ला वेळ देईन आणि त्याचा गिल्ट येऊ देणार नाही.’ चला, खुश राहूया! आणि कुसुमाग्रजांच्या कवितेत थोडा बदल करून म्हणूया, *प्रेम कुणावर करावं?* *- तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं!*
1.4k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🌹नारी शक्ति

9.6k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

😹फनी जोक्स

*मुंबईतील ट्रेन मधील लोकांच्या सहकार्याचा मजेदार किस्सा* काही दिवसांपूर्वी दादरला ठाण्याला जाण्यासाठी ट्रेन मधे चढलो. माझ्या मागोमाग एक तरुणही चढला. तो बाहेरून प्रथमच मुंबईत आला असावा कारण तो विचारु लागला *"मुलुंड कधी येईल मला उत्तरायचंय."* लोकांनी सांगितलं की *"ही फास्ट गाडी आहे ही मुलुंडला थांबत नाही"*. बिचारा घाबरला. लोकांनी सांगितलं की *"घाबरू नको एक कर, ही गाडी मुलुंडला स्लो होते तेंव्हा तू धावत्या गाडीतून उतार व गाडी ज्या दिशेला जाते त्या दिशेला थोडा धाव म्हणजे तू पडणार नाहीस"*. झालं, ठरल्या प्रमाणे त्याला दारात उभं केलं, गाडी मुलुंड ला स्लो झाली तेंव्हा तो स्टेशन वर उतरला आणि ठरल्याप्रमाणे धावला, पण तो इतका जोरात धावला की पुढच्या डब्याजवळ गेला. तिथल्या लोकांनी त्याला धरून आत घेतला व सांगितलं, *"तुझं नशीब चांगलं म्हणून तुला ही गाडी मिळाली, ही फास्ट ट्रेन आहे. मुलुंडला थांबत नाही."* 😜😜😜😜😜
13.1k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

👩गर्ल्स लाईफ

_*👩‍🏫 आईची शिकवण .... 👌👌*_ नवीनच लग्न झालेली एक मुलगी दर वेळेला माहेरी आलं की आई जवळ नवऱ्याची व सासरच्यांची तक्रार करीत असे-- 'तो रागीट आहे, मला समजावून घेत नाही, सासू लहरी आहे, त्यांना माझ्या भावना कळत नाहीत' वगैरे आईला सांगत असे. आईने चार पाच वेळेस तिचे ऐकले आणि मग ती मुलीला म्हणाली--- "बाळे, माझं नवीन लग्न झालं तेव्हा मी देखील या प्रसंगातून गेले, फक्त मी माझ्या आईला असं कधी सांगत नव्हते. मी स्वतः माझी विचार शक्ती वापरली आणि आपोआप परिस्थिती बदलली बघ." *"म्हणजे कसं?" मुलीने विचारले....* आई हसून म्हणाली--- "मुली, स्त्रीचं खरं चातुर्य हे सासू, सासरची माणसं, नवऱ्याला आपलंसं करून घेण्यात आहे. सासू, सासरे यांच्या पोटात घुसून रहायचे. दिर, नंदा, जावा यांना जिव लावायचा. आधी आपण त्यांचा आदर करायचा, कारण ते तुझं कर्तव्यच आहे. मी काय, तुला सल्ला देईनही, पण किती दिवस ...? तेव्हा लक्षात ठेव, *आई वडिलांनी मुलीच्या संसारात नाक खुपसणं बरं नाही.* ज्या घरात आपल्याला दिलं आहे, तिथंच आपण रहाणार आणि तिथंच मरणार. *तू तुझ्या नवऱ्याचा व सासु सासऱ्यांचा स्वभाव आधी ओळख. तुझा नवरा कुठे दुःखी आहे हे पहा, त्यांचा अहंकार सांभाळ. त्याच्या घरातल्यांना जप.* तू त्यांना थोडासा मान दे. पुरुष प्रेमाचा भुकेला असतो. त्यालाही मान दे, त्याला थोडं स्वातंत्र्य दे. तु जरा नमतं घ्यायला शिक, आणि मग पहा काय चमत्कार होतो ते ! पुढचे वेळी आल्यानंतर मग मला सांग." *चार महिन्या नंतर मुलगी पुन्हा माहेरी आली. आल्या बरोबर तिने आईला मिठी मारली, मग ती आईला म्हणाली ....* "खरंच ग आई, तुझी शिकवण माझ्या कामी आली. मी स्वतःचा स्वभाव थोडा बदलून घेतला. आता माझ्या नवऱ्यामधे व त्यांच्या घरच्यांमध्ये इतका बदल झाला आहे, काय सांगू ! मला सोडून घरातल्यांना एक क्षणही करमत नाही, मला मान सन्मान देतात. आणि आई, आणखी एक गोष्ट मी शिकले बघ " "कोणती बाळ?" *हेच की, आपल्या अडचणी आपणच सोडवल्या पाहिजेत,* थोडी स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे. दर वेळी आई वडील तरी काय सांगणार? _*आणि खरंच, मुलीच्या संसारात आईने ढवळाढवळ करू नये हेच खरे. शेवटी संसार आपल्याला करायचा आहे.*_ मुलीचे ते बोलणे ऐकून आईला खूप कौतुक वाटले आणि तिने मायेने लेकीला जवळ घेऊन कुरवाळले. आज तिच्या मुली मधे आत्मविश्वास निर्माण झाला होता. *💃 मुलगी परत निघाली, तेव्हा आई म्हणाली बाळे, सगळ्याच मुलींनी जर आपल्या स्वतःच्या सद-विवेक बुद्धीने असे घरगुती प्रश्न सोडवले, सर्वांचा आदर केला तर संसार सुखी होईल..✍* _*!! सोच सही तो लाईफ सही !!*_ *🙏🙏🙏🙏*

49.8k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🌹नारी शक्ति

सोपं नसतं बायको बनून कुणाच्यातरी आयुष्यात जाणं... बालपणातील आठवणींना स्वतःच्या हाताने लोटून देणं... नवर्‍याला यायला उशीर होतो तेव्हा जीवाचं कितर कातर होणं.... स्वयंपाक घर ते दार सारखसारखं डोकाऊन पाहणं... मनातल्या मनात वाईट घेऊन देवघरात धावत जाणं.... नवरा दारात दिसताच, जीवातजीव येणं..... आईच्या मायेनं चेहर्‍यावरचे भाव ओळखून घेणं.... आणि तो जेवल्यावरच आपण तृप्तीचा ढेकर देणं... सोपं नसतं बायको असुन नवर्‍याची आई होणं सोपं नसतं ठेच लागेल तेव्हा त्याला साथ देणं त्याची सारी संकट स्वतःहून अंगावर घेणं न सांगता त्याच गणगोत आपलं करून घेणं त्याच्या जबाबदार्‍या आपणहून आपल्या शिरी घेणं. सोपं नसतं बायको असून बहिणीच्या मायेनं समजून घेणं.... सोपं नसतं हसत खेळत प्रत्येक अडचणींना सामोरं जाणं... मागच सोडून पुढे चांगलच घडेल याची वाट पाहणं.. आपला धीर सुटत असताना, त्याला मात्र धीर देणं.. सोपं नसतं बायको असून मैत्रीच्या नात्यानं समजून घेणं... सोपं नसतं, नको त्या शिव्या अन नको ते शब्द ऐकणं.. नको असतं ते रूद्राचं तांडव अन नको असतं ते बेभान होणं, नको असतो तो तमाशा आणि नको वाटतं ते जीणं सोपं नसतं त्याचा रूद्रावतार तोलून धरणाऱ्या सखीच्या नात्यानं पार्वती होणं... सोपं नसतं रक्ताची माणसं विसरून जाणं. सोपं नसतं नवी नाती निर्माण करणं. सोपं नसतं एका माणसापायी अख्खं कुटुंब एकमेकांशी जोडणं. स्वतःच्या मान मर्यादा स्वत्व विसरणं आणि आशा अपेक्षांना विसरून जाणं. सोपं नसतं बायको असून नवरी होते हे विसरून जाणं... सोपं नसतं आपला त्रास बाजूला ठेवून अखंड त्याला बळ देणं एवढ करून सुध्दा आपण मात्र दूर राहणं... त्याला राज्यपद देऊन आपण त्याची राणी नव्हे दासीच होणं... सोपं नसतं बायको म्हणून आयुष्यात येणं अन बायको राहून निभावून नेणं. 💐सर्व स्त्रियांना समर्पित💐
82.6k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..