*म्हातारपण (लघुकथा)*
आज सकाळी बसमध्ये बसायला जागा नसल्याने मी उभा राहून प्रवास करत होतो. पुढच्या स्टॉपला अंगावर मळका सदरा, मळके धोतर असलेले तसेच एका हातात काठी व दुसऱ्या हातात पिशवी असलेले अंदाजे 80 वर्ष वयाचे एक वृद्ध गृहस्थ बसमध्ये चढले.
बसायला जागा नसल्याने ते हळूहळू खालीच बसले. त्यामुळे बाजूलाच एका सिटवर बसलेल्या एका 30 वर्षाच्या युवकाच्या कपाळावर अटया पसरल्या. कारण त्या वृद्ध व्यक्तीने त्याची पिशवी त्या युवकाच्या पायाजवळ ठेवली होती. त्यामुळे त्याला थोडी अडचण झाली होती.
तो युवक त्या वृद्ध व्यक्तीला उद्देशून म्हणाला,
“ बस फुकट आहे म्हणून काम नसताना कोठेही फिरतात हे म्हातारे. ”
त्या व्यक्तीचे शब्द एवढे खोचक होते की कोणीही रागावले असते. पण ते वृद्ध गृहस्थ काही न बोलता त्याच्याकडे पाहून फक्त हसले.
जणू त्यांच्या मनात आले असेल. काही दिवस थांब तुलाही म्हातारं व्हायचंय.
*लेखक- संदीप खुरुद* #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #🌻आध्यात्म 🙏 #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स