@satyashodhak
@satyashodhak

KIRAN BHAU SHINDE

!!..जय सावता, नमो बुध्दाय, जय जोती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम..!!

#

Mahatma Fule Songs ( गाणी जोतीबा- सावित्रीची )

*.......माळी समाज जागेल.......* जोती साविञीचा पोरा, नको राहुस रे माघ । माळी समाज जागेल, तुझे ऐकता भाषण ।। कस समजावु मी तुला, काय समाजाची दशा । साविञी ज्योतिबांनी, शिक्षणाची दिली दिशा ।। फुलेंचा रे वाघा, नको करुस मे-मे । माळी समाज जागेल, तुझे ऐकता गर्जन ।। शाहु राजाची रे देण, तुला दिला आरक्षण ।। असा समोर समोर येण, कर समाजाच रक्षण ।। आपल्या हक्कासाठी, नको बसु रे चुप । माळी समाज जागेल, तुझा ऐकता आवाज ।। भिमरायाने दिले, घटनेमध्ये अधिकार । दिल्लीतही बसुन, बनव आपले सरकार ।। मतदार दादानो, नका विकु रे मत । माळी समाज जागेल, तुझ ऐकता बोल ।। फुले शाहु व भिमाचा, असा चालला तो लढा । दिलीप दादा कडुन, भास्करने घेतला धडा ।। अरुणा सोनुले चे, नको विसरु हे गित । माळी समाज जागेल, तुझे ऐकता गाण भास्कर सोनुले माळी जलसा धानोरा मो. नं. ९४०४८३४९४४
290 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#

सत्यशोधक

*कुणबी बहुजन सम्राट* *राजा शंकासूर* ♦. *संक्रात*. ♦ ✍🏼 *सणाचा खरा इतिहास* *माहिती करुन घ्या !* प्राचीन काळी *संक्रात आणि किंक्रात* नावाच्या ब्राह्मण सख्या बहिणी होत्या. या दोन मुलींच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणांनी *राजा शंकेसुराला* (बळी राजाचा नातु) आमंत्रित केले. शंकासूर हा बळी राज्यात शूर सेनानी होता. अत्यंत चपळ व बलवान शूर रजा होता. संक्रांत, किंक्रांत दोघी बहिणी गायन , नृत्यकलेत खूप प्रवीण होत्या. नृत्यगृहात प्रवेश करताक्षणीच नृपूराच्या मंद आणि तबल्याच्या तालबद्द ध्वनिवर नृत्य करीत होत्या. राजासह सारेजण मंत्रमुग्ध झाले होते. नृत्यगृहाच्या दोन्ही कोपरयात अगोदरच दोन भाले आणून ठेवलेले होते. नृत्याने गुंग झालेल्या राजाला पाहून संक्रांत आणि किंक्रात या दोन्ही मुलींनी कोपऱ्यात ठेवलेले भाले उचलले आणि दांडपट्टा खेळतात त्याप्रमाणे भाले घेऊन त्याच्या सहभोवताली फिरत असता एकीने पोटातुन दुसरीने पाठीतून भाले खुपसले. राजा शंकासूर बेसावध असतानाच त्याची हत्या करण्यात आली.. आपले राजे कधीच स्त्रियांवर हत्यार उचलत नसत. याचे अनेक पुरावे आजही वाचायला, पाहायला मिळतात. शंकासूर गतप्राण झाल्यावर दोघी बहिणींनी रक्ताचा टीळा कपाळी लावला. *कुंकू हे शंकेसुराच्या रक्ताचे चिन्ह* आहे.अशा प्रकारे नागांचे पूर्वज ब्राह्मणांनी कट करून मारले व त्या प्रित्यर्थ आनंदोत्सव साजरा केला. आज हि तो आनंद... ♦. *मकर संक्रात* ♦ नावाने आपण साजरा करीत आहोत. 🔶आपल्या बऱ्याच लोकांना *राक्षस , असुर , दास* हे कुणीतरी वेगळे लोक वाटतात. ते आमचे दुश्मन वाटतात. पण हे राक्षस नसून ते आमचे भारतीयांचे “रक्षक” होते, ते असुर नसून शूर होते, पुराण, इतिहास ह्याची जर आपण चिकित्सा केली तर “सत्य” नक्कीच समजते. काय खोटे काय खरे याचे कोडे नक्कीच उमगते. *आर्य(ब्रम्ह) म्हणजे “देव*” व *भारतीय मूलनिवासी म्हणजे “रक्षक*” म्हणजेच आमचे पूर्वज “शूर” होते. *दान करणारे “दानव*” होते. पण आर्य लोकांनी त्यांना आपल्या समोरच, *राक्षस, असुर*, म्हणून उभे केले. ते देवांचे वैरी होते ... लोकांना त्रास देत होते असे ब्राम्हणी इतिहास संशोधकांनी इतिहासात लीहुन ठेवले आणि तेच *कुणबी, ओबीसी, बहुजन समाजतील* शिक्षित लोकांनी वाचले आणि त्याचाच स्विकार केला. खरे काय नी खोटे काय याची साधी समिक्षा , चिकित्सा वा तर्क करण्याचा प्रयत्न केला नाही ... आज आम्ही टी. वी. वर दाखवल्या जाणाऱ्या मालिका दररोज पाहतो. त्यात देव , देवी , लक्ष्मी या सारख्या पात्राद्वारे राक्षस , असुर अश्या पात्रांचा वध केल्याचे पाहतो आणि टाळ्या ही वाजवतो ... कारण वध हा राक्षसाचा.. असुराचा झालेला असतो. ✳ ... आता राक्षस (रक्षक) हे खरे पाहता आपलेच नागवंशीय पुर्वज आहेत ... हे खरा इतिहास वाचला तर समजते नाहीतर आपणच आपल्या पुर्वजांचे मृत्यु दिवस सण म्हणुन साजरे करीत राहतो. 👉🏼कोकणात शंकासूर हा नेहमी 🔹नमन🔹 व 🔹दशावतार🔹मध्ये पूज्य मानला जातो. तो नाचताना दाखविला जातो, *आजही कोकणात कुणबी समाज, कोळी समाज, शेतकरी वर्ग हा शंकासुराला आपला पूर्वज मानत असून त्याची पूजा अगदी मनोभावे केली जात*े. हे सत्य आजही शिमग्याच्या वेळेस पाहायला मिळते. ह्यावरून स्पष्ट होते कि आमच्या पूर्वजांना आजही आपला मूलनिवासी समाज विसरलेला नाही. संक्रात करणे, गोड वाटणे.. ही एक परंपरा म्हणून जर आपण साजरी करीत आहोत पण त्यामागील कारण काय याचा विचार करीत नाही ... याचा अर्थ आपण आपली गुलामी आनंदोत्सव म्हणून साजरी करीत आहोत याचे भान ना समाजातील लोकांना आहे ना समाजातील शिक्षित युवकांना आहे 🔵. *शंकेसुर* हा बळी राजाचा नातु जो नागवंशीय होता ...अतिशय पराक्रमी, शूर योद्धा, सेनापती होता.. आपण म्हणजेच बहुजन समाज, म्हणजेच ब्राम्हणेत्तर सारा समाज हा *नागवंशीय* आहे ... पाहीजे तर खात्री करा ...आपली जन्म पत्रिका तपासुन पहा. त्यात *आपला वर्ण क्षुद्र ... गण राक्षस ... योनी अंत्यज आणि वंश नाग असेल ....!!* *संदर्भ* : बळीवंश, खरा इतिहास, बहुजन लोककला, हिंदू सन व संदर्भ. *टिप* :आपणांस विश्वास नसेल तर पंचागामध्ये असलेले शंकेसुराचे चित्र अवश्य पाहावे. 🙏🙏 *जय भारत !!*
176 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..