@sha8380
@sha8380

🎷श्रीSHA💗🎺

💖i love u mmumy 💖

#

👫नवरा बायको / सासू सून

नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला - मी कसा दिसतो ते सांग बरं ....!!!! बायको म्हणाली — मेघनाद अरि तात वधी ज्या नराला । ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। तैसे तुम्ही दिसता मजला मनी। 😛 😂😂😂 नवर्‍याला याचा अर्थ काही कळेना..? म्हणून त्याने एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यांनी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.👇 मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ? तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ. दशरथाच्या हातून अजाणता कोण मारला गेला ? तर श्रावणबाळ ( मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण ) श्रावण महिन्याच्या अमावस्येला ( संहिता म्हणजे अमावस्या ) कोणता सण असतो ? तर पोळा . पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची .( त्या दिवशी बैलाला सजवतात ) त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात.😉😁😂😂 आता बोला ....😍 😷😷😷😜😜😜 ती बायको मराठीची प्राध्यापिका असावी ! 😄😄😄😄😄😄
262 जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
#तिच्यावर_प्रेम_करणं_अवघड_नाहीये...! सकाळच्या धामधुमीत असली की फक्त जरा गरमागरम डब्यांची झाकणे लावा. पोरांची तयारी करते तेव्हा जरा बॅग उचलून हातात द्या. ऑफिसला निघताना "आज लवकर येतो " असं जरा हसून म्हणा. ऑफिसला गेल्यावर एक मीस कॉल देऊन कळवा पोहचलो ग व्यवस्थित. उगाच तिला असाच छान नवरा बायकोचा विनोद पाठवा. संध्याकाळी घरी आलात की हसून तिला मिठीत घ्या. तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...💝 कधीतरी सुट्टीच्या दिवशी तिला निवांत झोपू द्या. आवडीचा नाश्ता आणि चहा बनवून मग तिला उठवा. उगाच काही कारण नसताना तिच्या आई वडिलांशी बोला. तिला फोन देताना मात्र "झालं बरं माझं तक्रार करून" असं उगाच चिडवा. तिच्या मित्र मैत्रिणीच्या टवाळक्या चर्चेत उगाच तिला टाळी द्या. तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...💝 कधी फावल्या वेळेत "बस जरा डोक्याची मालिश करून देतो" म्हणा. कधी ती अंघोळ करून आली की लाडाने तिचे केस पुसत गप्पा मारा. तिच्या प्रत्येक ओल्या बटीला अलगद कळून येईल असे खेचा. चिडणार नाही ती, " काय रे तू पण, बघ ना जरा नीट" म्हणून खोटा त्रागा करते. हसून जिरवा. तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...💟 कधी किचन मध्ये गुरफटली असेल तर उगाच जाऊन तिथे भुणभुण घाला. कधीतरी आईपेक्षा काही चांगला स्वैंपाक केलाय बिनधास्त सांगा. एका हाताला तिला घेऊन दुसऱ्या हाती लेकराला घेऊन भर बाजारात चाला. न आवडत्या शॉपिंगला पण "तुझी चॉईस भन्नाट बाबा" असं म्हणून जिरवा. तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...❣️ तिला जास्त काही लागत नसतं. तिची ती खूप समर्थ आहे. पण ती वेडी खूप भावनिक असते. गुंतून पडलेली असते तुमच्या क्षणाक्षणामध्ये. तुम्हालाही तिच्या प्रत्येक क्षणाचे आकर्षण असते ह्याची तिला जाणीव करून देत राहा. जगण्याची कारणे खूप आहेत पण सगळ्यात महत्त्वाचे कारण ती आहे हे तिला कधीतरी कळू द्या. तिच्यावर प्रेम करणं खरंच जास्त अवघड नाहीये...💞 👉 तुम्ही इतिहासात #प्रेम केलं असेल तर शेअर करा. 🙏🙏🙏🌷🌷
#

👫नवरा बायको / सासू सून

👫नवरा बायको / सासू सून - ShareChat
24.4k जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..