@shree414
@shree414

shree swami samarth

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

🙏स्वामी समर्थ

‼ श्री स्वामी समर्थ ‼ "जीवन कसे जगावे " ……? स्वामींनी हसत सहज उत्तर दिले " एकतर सहन करत किंवा सामना करत …… दोन्ही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी आहेच " आम्ही नाही समजलो स्वामी राया…… 🌹स्वामी पुढे म्हणाले 🌹 " सहन करतांना तुझे पहिले पाऊल मागे पडेल आणि सामना करतांना पहिले पाऊल पुढे पडेल. सहन करतांना तुझा दृष्टिकोन नकारात्मक ताणाने झुकेल तर सामना करतांना सकारात्मक ऊर्जेने उंचावेल. सहन करत प्रगती खुंटते पण सामना करीत उत्कर्ष साधता येतो ". 🌹स्वामींना पुन्हा सवाल🌹 पण आपण पाठीशी असता चिंता आम्ही कशास करावी...? 🌹स्वामी पुन्हा सहज उत्तरले🌹 " ते तर माझे भक्तांस दिलेले वचन आहे, " योगक्षेमं वहाम्यहम् ". पण जीवन तुम्हास जगायचे आहे, सहन अथवा सामना तुम्हास करायचा आहे, नकारात्मक किंवा सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असेल, अधोगती किंवा प्रगती तुम्हास साधायची आहे, मी पाठीशी आहे, हे जो स्मरतो तो सामना करतो आणि ज्यास माझा तणावात विसर पडतो,तो सहन करतो". 🌹स्वामी पुढे म्हणाले🌹 " तुम्ही सहन केलेत तर तुम्हास सोशिकतेचे बळ देईन आणि सामना केलात लढण्याचे सामर्थ्य देईन. मी पाठीशी सदैव आहे, माझ्या लेकरांपासून मी कधीच दूर नव्हतो, नाही आणि नसेन ". 🌹भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे🌹 ‼श्री स्वामी समर्थ ‼ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 #🙏स्वामी समर्थ
413 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..