@spruhavarad
@spruhavarad

Spruha Joshi

An Indian film, television and theatre actress also a poet & compere.

तू नेमका कसा आहेस काय सांगू? शब्दांच्या चिमटीत तुला नेमकं कसं पकडू? रंगमंचावरच्या कठपुतळ्या जिवंत होत जातात क्षणाक्षणाने, एका अवकाशात आपलं अस्तित्व वाढवत नेतात कणाकणाने.. तूही त्यातलाच एक.. काही रानटी झाडं असतात, आपली आपण वाढणारी आपल्या मस्तीत, उग्र सौंदर्याने भारून टाकणारी.. आपल्याच आकाशाला हरक्षणी अधिकाधिक उंच करत जाणारी! त्या क्षणी, त्या त्रिमितीत चौथी भिंत ओलांडून एक इवलीशी मूर्ती साकारते काही सगळ्यात सुंदर, सगळ्यात शूर, सगळ्यात प्रेमळ, सगळ्यात क्रूर! सगळं काही तुझ्यात असतं, सगळं काही तिथेच घडतं. वाळूसारखा एकेक क्षण निसटताना अलगद मनात बंदिस्त होतो, एक साधासा तरुण आता वेडावून टाकतो, कवेत घेतो, माझ्यासाठी कायमचा रुबाबदार राजकुमार होतो. वेळ सरून जाते, वय हरवून जातं. लोक वेडे, अट्टाहास करत राहतात 'जुन्या' तुला शोधण्याचा, मी?.. मी आनंद घेत राहते, रंगमंचावर रोज 'नवा' तू सापडण्याचा..!! - स्पृहा.
#

marathi

marathi - ShareChat
127.6k views
11 days ago
ShareChat Install Now
ShareChat - Best & Only Indian Social Network - Download Now
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because