
शिवभक्त सुरेश भोसले
@sureshbhosale
🚩रोजचे ऐतिहासिक शिवदिनवीशेष🚩📱📲8975379375
#🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ४ डिसेंबर इ.स.१६७९
शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले
औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की , "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा !"
अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली !
संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं ... अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले ( दि. २० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले . तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले ( दि. ३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि. ४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले . संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला . ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले .
🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ४ डिसेंबर इ.स. १६८२
रणमस्तखानाने कल्याण काबीज केले. त्याच्याशी मुकाबला करण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांनी रूपाजी भोसले आणि निळोपंत पेशवे यांना रवाना केले. त्यांच्याबरोबर १० हजार स्वार व १२ हजार पायदळ होते. दिनांक ४ डिसेंबर रोजी बहादूरखान व या सैन्यात लढाई झाली. कल्याण-भिवंडीपासून ५ मैलांवर असणाऱ्या मेहेंदळी गावात मराठयांच्या दोन हजार स्वारांनी मुघल ठाण्याची लुटालूट केली होती. त्यावेळी मुकर्रबखान मराठयांना तंबी देण्यासाठी धावला. मुकर्रबखान आणि मराठे यांच्याता मेहेंदळी गावाच्या अलीकडे ३० कोसांवर असलेल्या उरण खेड्या जवळ लढाई झाली, त्यात दोन्हीकडील सैनिक मेले व जखमी झाले. त्या लढाईनंतर मुकर्रबखानाने मौजे मेहेंदळी येथे डेरा जमा केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ डिसेंबर इ.स.१७२७
थोरला बाजीराव पूर्णा परळी प्रांतात आले. पुढे ६ डिसेंबर पौष शु. ५ कसबे नरसीक, ८ डिसेंबरला वाशिम जिल्हा अकोला, ९ डिसेंबरला तालुका मंगळूरपीर जिल्हा अकोला, १० डिसेंबर ला हातगाव, ११ डिसेंबर ला मांजराखेड. तालुका चांदूर जिल्हा अमरावती हे सगळे प्रांत लुटून उध्वस्त केले. म्हणजे डिसेंबर च्या ह्या प्रारंभीच्या काळात राऊ नी तुफानी घोड-दौड करून वाशीम,माहूर, मंगळूरपीर तालुके धुळीस मिळवले. मग अचानक वायव्येस शिरले आणि चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्या जवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ डिसेंबर इ.स.१७४८
पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला
निवती गड तसा छोटा आहे. उंचीनेही छोटा आहे, पण छान आहे. गडासंबंधी जास्त काही ऐतिहासिक माहिती वाचायला मिळत नाही. शिवकाळानंतर हा किल्ला १८व्या शतकामध्ये सावंतवाडीच्या सावंतांकडे होता. ४ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला चढवला. पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माइल खान नावाच्या कॅप्टनने शौर्याची कमाल करून सावंतांकडून हा किल्ला जिंकून घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ डिसेंबर इ.स.१७९१
महादजी शिंदे यांनी एक पत्र पेशव्यांस पाठविले. महादजी शिंदे लिहीतात. "स्वामींचे दर्शन घ्यावयाचा बेत करून मेवाडातून येत असता उदेपुरकर राणाजींचे राज्यात बंदोबस्त नाही. उमराव आपापले जागा मुलुख बळकावून राहीले. भिमसिंगाकडे चित्तोडचा किल्ला. तो भिमसिंग राणाजींचे लक्षात नाही. याकरिता राणाजी येऊन भेटले. चित्तोड वगैरेचा बंदोबस्त करावा म्हणोन बजिदी केली त्यावरून राणाजीसह चित्तोडनजीक येऊन मुक्काम केला. भिरमसिंगाने गोळी वाजवली. सबब मोर्चे लाऊन तोफांची निकड करताच भिमसिंग घाबरा झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ डिसेंबर
आज #भारतीय_आरमार_दिन
भारतीय आरमाराचे जनक शिवाजी महाराज.
"आरमार उभारणी" इ.स. १६५९ पासुन शिवरायानी आरमार तळ उभारण्यास सुरूवात केली. पश्चिम किनारपट्टीवर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग बांधले. मालवणचा सिंधुदुर्ग तर जलदुर्गाचे आश्चर्य म्हणावे लागते कारण तो एवढा अचुक व मजबुत बांधला आहे. आरमाराची यादी चित्रगुप्ताच्या बखरीत दिली आहे त्यात "थोर गुराबा ३०, गलबते १००, महागिर्या १५०, लहान गुराबा ५०, होड्या १०, लहान होड्या १५०, तारवे ६०, पाल १५, जुग १५, मचवे ५०. एवढी होती. इंग्रजानीही स्वराज्याच्या आरमाराच्या याद्या वेळोवेळी लिहुन ठेवलेल्या आढळतात. त्यावरून स्वराज्याचे आरमार कारवार पर्यंत गेले तेंव्हा त्यात एका डोलकाठीची ३० टनापासुन १५० टनापर्यंत वजनाची ८५ जहाजे व तीन अतिमोठी जहाजे होती. म्हणून आधुनिक भारताशी अनुबंध असणारा, समुद्र व आरमाराचा गम्भिरपणे विचार करणारा पहिला राजा म्हणजे शिवाजी महाराजच म्हणावे लागेल. पहिले आरमारप्रमुख सरखेल "कान्होजी आंग्रे" होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🙏🚩श्रीदत्त जयंती निमित्त शिवमय शुभेच्छा* #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿
#🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
⛳आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष⛳
📜 ३ डिसेंबर इ.स. १६७९
सिद्धीस मूर्खात काढून मराठ्यांची दोन जहाज खांदेरीस पोहचले..!!
१ डिसेंबर रोजी खांदेरीला मराठ्यांचा एक लहान मचवा काही रसद घेऊन गेला व सिद्दी आणि इंग्रज यांना तो अडवता आला नाही. पुढे ३ डिसेंबर रोजी एक चमत्कारिक घटना घडली. मराठ्यांची २ जहाजे बेटाकडे जाताना सिद्दयाला दिसली व त्याने ती अडवली असता ती थांबली. सिद्दयाच्या लोकांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी आपण इंग्रज नौका दलातील असून त्यांनी आपल्या नाविक दलाच्या कॅप्टन आणि नौकेचा खलाशी यांचीही नावे त्वरित सांगितली आणि त्यांनी त्वरित जाऊ द्यावे, अशी मागणी केली. कारण आपण काही मराठी नौका दक्षिणेच्या बाजूने येताना पाहिल्या असून त्याची माहिती मिळवण्याकरिता जात असल्याचे सांगितले. सिद्दयाच्या त्या लोकांना खात्री पटली व त्यांनी मराठ्यांना जाऊ दिले व पुढे त्यांना दिसले की, ते खांदेरीच्या आखातात जाऊन तिथेच नांगरले. त्यावरून त्यांना समजले की, ते मराठेच होते व आपल्याला मूर्खात काढून ते पळून गेले. ही माहिती सिद्दयाच्या त्या जहाजावरील एका हशमाने इंग्रजांच्या सेवेतील एका मुसलमानाला दिली व त्यावरून ती इंग्रजांनी नमूद केली. ३ डिसेंबर रोजी सिद्दीच्या आरमाराचा मुख्य सिद्दी कासीम आणि केग्वीन यांची भेट झाली व कासीमने आता आपण बेटावर उतरून काय तो सोक्षमोक्ष लावूया, असे सांगितले असता केग्वीनने आपल्याला मुंबईहून आदेश येईल तसेच आपण वागू, असे सांगितले. यावेळी केग्वीनने सिद्दीच्या जहाजावर काही मराठी गुलाम मंडळी पाहिली व ही कुठून आली विचारले असता सिद्दीने सांगितले की, आपण मराठ्यांच्या मुलुखात शिरून जाळपोळ केली व काही गुलाम पकडून आणले. तसे केग्वीनने हे लिहून मुंबईला पाठवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
👉🏻 ३ डिसेंबर इ.स.१६७८
छत्रपती संभाजीराजे रोजी मुघलांकडे गेले.
वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात अॅबे करेने लिहलेला अवहाल मांडतात” …..हा अॅबे करे आपल्या अवहालात लिहतो की,” छत्रपती शिवाजी महाराज या मुलाला मुघली प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतु म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर म्हणजे शहजाद्याबरोबर गुप्त कट घडवुन आणावा. शहजाद्याची आणि छत्रपती संभाजीराजेंची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या राजकारणांत एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले. ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडुन गुप्त असे काहीच राहात नसे. तो छत्रपती संभाजी राजेंना अधिकाधिक प्रेमाने वागवित असे. कारण की , शहजाद्याला छत्रपती संभाजीराजेंकरवी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत हवी होती. करे पुढे सांगतो की ” शहा आलमने त्याच्या बापाकडुन त्याच्याविरूद्ध अविश्वासाचे उदगार एकायला मिळतात; कारण औरंगजेबाच्या दरबारातील लोक आपला द्वेष करतात त्यामुळे आपल्याला दरबार सोडुन दक्षिणेच्या सुभेवर पाठवलंय. येथे बापाचे पुष्कळ सैन्य आहे त्या सैन्यावरील अधिकारी आपले बाजूचे असून ते केव्हाही आपण सांगू तेव्हा पादशहाविरूद्ध बंड करतील. आणि छत्रपती संभाजी हे सर्व घटना छत्रपती शिवाजीला वारंवार कळवीत असे. आपल्या आकांक्षा सुफलित करून घेण्यास नवीन राजकारण हाती आल्यामुळे छत्रपती शिवाजींना फार आनंद झाला. अशा तऱ्हने छत्रपती शिवाजींनी आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनितीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला.”
अॅबे करेचा हा अहवाल खुप महत्वाचा आहे. कारण या अहवालाच्या सहाय्याने पुढील अपरिचित गुप्त राजकारणाचे रहस्य दडले आहे.
ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले त्यावेळेस शहजादा शहाआलम पुन्हा दक्षिणेच्या सुभेदारीवर आलेला होता. आपल्या आधिच्या मैत्रपुर्ण संबंधातुन अर्धवट राहिलेली राजकारण छत्रपती संभाजीराजेंना सिद्धिस न्यायचे होते अशी दाट शंका येते कारण शहजादा औरंगबादेस येईपर्यंत छत्रपती संभाजीराजे मुघलांकडे गेलेच नाहीत. नोव्हेंबर १६७८ अखेर शाहा आलम औरंगाबादेस येऊन पोहचेल अशी बातमी होती आणि छत्रपती संभाजीराजे ३ डिसेंबर १६७८ रोजी मुघलांकडे गेले.
फितुर झालेल्या बर्याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजांना मोगलांच्या छावणीतुन हरप्रकारे प्रयत्नकरुन का सोडवले असतील… हंबीरराव मोहिते फौजेसह मोगल छावणीच्या परिसरात फिरत होते व योग्य वेळी छत्रपती शंभुराजांना मोगली छावणीतुन बाहेर काढले. महाराजांना स्वराज्यावर येणार्या पुढील संकटाची(औरंगजेबची स्वारी) कल्पना होती. त्यांनी त्या द्रुष्टीने तयारी म्हणून मुद्दाम छत्रपती संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी असलेल्या गढूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा. नंतर या गोष्टीचा छत्रपीसंभाजी राजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंजत होते तेव्हा फायदा झाला . कदाचित मुघल छावणीत राहून छत्रपती संभाजी राजांनी काही माणसे हेरली असावीत ज्यांनी नंतर छत्रपती संभाजी राजांना मदत केली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ३ डिसेंबर इ.स.१७७६
महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) ह्यांची जयंती...!!
यांचा जन्म वाफगाव ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. ते पेशव्यांचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी होळकर संस्थानी राज्याची स्थापना केली आणि ते तिथले पहिले राजा झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी दगा फटका झाल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्या मुळेच होळकर साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत..!
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ३ डिसेंम्बर इ.स.१८०३
पेशवा बाजीराव द्वितीय पेशवेपदी गादीवर बसला...!!
डिसेंबर १८०२ ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ३ डिसेंबर इ.स.१८८९
खुदीराम बोस (बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाले. त्यांचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्यांच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्यांची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.
बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीराम यांनाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली. यातच खुदीराम यांनी किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीराम यांचे सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसर्या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्ल यांनी अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्यांना दि. ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २ डिसेंबर इ.स.१६६७
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामजी शेणवी यांसी पोर्तुगीज गव्हर्नकडे तहाचे पत्र घेऊन पाठवले..!!
#शिवरायांचे बारदेशमध्ये आगमन व पोर्तुगीजांशी तह...!!
शिवाजी महाराजाची स्वारी बारदेशवर होणार आहे याची बातमी पोर्तुगिजांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आग्वादच्या किल्ल्यात आश्रय दिला. तेव्हा बार्देशमध्ये कोलवाळ – थिवीचा सरळ लांब रेषेत तटबंदी असणारा किल्ला महाराजांच्या सैन्याने सहजपणे जिंकून घेतला. पोर्तुगिजांचेे सैन्य घाबरून लगेच आग्वाद किल्ल्याच्या आश्रयास पळून गेले. काही जुन्या गोव्यात आश्रयास जाऊन राहिले. कोणतेही पोर्तुगीज सैन्य शिवरायांचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही.
२२ नोव्हेंबर रोजी शिवाजीराजे बारदेशातून निघून डिचोलीस आले. त्यानंतर खासा विजरई बार्देश मध्ये आला. तोपर्यंत बार्देशमधील झालेला प्रकार पाहून शिवाजीराजांकडे आपला वकील रामजी शेणवी कोठारी यास डिचोली येथे तह करण्यासाठी पठविले. २ डिसेंबर १६६७ च्या दिवशी रामजी शेणवी हा शिवाजी महाराजांचे पत्र घेऊन गव्हर्नरकडे आला. पुढेे या तहाच्या वाटाघाटी ५ डिसेंबर पर्यंत चालल्या व ६ डिसेंबर रोजी तह झाला.
बारदेशच्या मोहिमेच्या दरम्यान पुष्कळ ख्रिस्ती स्त्रिया आणि मुले पकडली गेली होती. त्यांना कोणताही त्रास न देता तसेच त्यांच्याकडून एक रूका (रुपया)ही न घेता शिवाजी महाराजांनी त्यांस सोडून दिले, असे पोर्तुगिजांनी शिवरायांविषयी आदरपूर्वक लिहून ठेवले आहे. ‘‘शिवाजी हा शत्रूंच्या बायकांस अत्यंत आदराने वागवी.’’ हे पोर्तुगिजांचा शिवाजी महाराजांचा चरित्रकार कॉस्मी-द-ग्वॉद त्यांच्या चरित्रात साक्ष देतो. शिवरायांच्या बारदेश स्वारीची धास्ती पोर्तुगिजांना चांगली बसली होती. पोर्तुगिजांना अशा प्रकारे आक्रमण करून धडा शिकविणारा हा पहिलाच भारतीय राजा होता.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २ डिसेंबर इ.स.१६८३
(मार्गशीर्ष वद्य नवमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार रविवार)
दुर्गादास राठोड मध्यस्थीसाठी पोर्तुगीज व्हाईसरायकडे!
छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून दुर्गादास राठोड गोव्याच्या पोर्तुगिजांच्या भेटीत गेला. या भेटीत पोर्तुगिजांचा मानस काय आहे, औरंगजेबास ते कितपत मदत करणार याचा कानोसा घेण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे अधिक्रृत पत्र जवळ नसल्याने दुर्गादास राठोड याला भेटीस बोलावले नाही !
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २ डिसेंबर इ.स.१७०२
डिसेंबर १७०२ मध्ये फोंडा किल्ला मराठयांनी सर केला, फोंड्याचा किल्लेदार म्हणून कृष्णाजी अनंत यांची नेमणूक ताराबाईंनी केली. यावेळी बादशहाचा मुक्काम भीमेच्या काठावर असलेल्या बहादूरगडावर होता. फोंडा किल्ला काबीज केल्यानंतर मराठयांनी बहादुरगडावर असणाऱ्या बादशाही छावणीभोवती धामधूम उठविली होती. तरीही बादशहास अद्यापि मराठयांचे अनेक किल्ले जिंकावयाचे स्वप्न मनात बाळगत होता. विशाळगड जिंकून घेतल्या नंतर सैन्यासह २ डिसेंबरला कोंडाणा ऊर्फ सिंहगड जिंकून घेण्यासाठी निघाला. वाटेत त्याने जेजुरीच्या खंडोबाच्या देवालयाची नासधूस केली. श्रींचा कळस व मंडप जाळून टाकला. जेजुरी हुन कूच करुन बादशाह कोंडाण्याच्या पायथ्याशी २७ डिसेंबरला पोहोचला.पुढे तरबीयतखानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केल्या.भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला ८ एप्रिल १७०३ रोजी मोगलांच्या ताब्यात दिला. सिंहगड चे नाव बख्शीदाबख्श (ईश्वरदत्त) असे ठेविले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २ डिसेंबर इ.स.१७४८
१८ व्या शतकात हा निवतीचा किल्ला सावंतवाडीच्या सावंताच्या ताब्यात होता. २ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगिजांनी निवतीवर हल्ला चढवला. त्या वेळी इस्माईलखान हा पोर्तुगिजांच़्या पदरी नोकरीस असलेल्या कँप्टनने शौर्याची कमाल करुन निवतीवर पोर्तुगिजांचे निशाण लावले. हा इस्माईलखान पुर्वी मराठ्यांच्या पदरी सेवेत होता. निवतीच्या किल्ल्यावर व्हाईसराय स्वता: आला होता. काही वर्षांनी निवती सावंतानी पुन्हा जिंकून घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २ डिसेंबर इ.स.१७५१
२ डिसेंबर रोजी मराठयांनी निजामापासून त्रिंबक किल्ला जिंकून घेतला. या दोन महिन्याच्या युद्ध धुमाळीत बुसीच्या तोफखान्याचा मराठयांच्या गनिमी काव्याच्या लढाईपुढे काही उपयोग झाला नाही. म्हणून सलाबतजंगाने तहाची बोलणी लावली. शिंगवे, परगणे राहुरी येथे ७ जानेवारी १७५२ रोजी उभयतास अटी मान्य होऊन तह झाला. या तहात ठरल्याप्रमाणे पेशव्यांनी त्रिंबक किल्ला निजामास परत दिला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २ डिसेंबर इ.स.१७६०
पानिपतचा रणसंग्राम
नोव्हेंबर सन १७६० रोजी मराठी फौजा व अहमदशाह अब्दाली याच्या फौजांची प्रथम पानिपतावर चकमक झाली. या चकमकीत अहमदशाह अब्दाली याने माघार घेऊन त्याने नोव्हेंबर सन १७६० रोजी दहाड येथे छावणी केली. यानंतर अब्दाली याने पुन्हा माघार घेऊन त्याने २ डिसेंबर सन १७६० रोजी यमुनातीरावर छावणी केली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 १ डिसेंबर इ.स.१६६१
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला 'शिरपामाळ' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ डिसेंबर इ.स.१६६३
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पाहुणचार खाल्लेला शाहिस्तेखान शिवछत्रपतींच्या भीतीने बंगालकडे रवाना...!!
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे येथील लाल महालात मुक्कामी असलेल्या शाहिस्तेखानावर योजकतेने हल्ला चढविला. पळून जाताना त्याची बोटे छाटली गेली. खानास त्यामुळे कायमची आठवण राहिली, असे रियासतकार सरदेसाई नमूद करतात. निवडक सैन्याच्या साहाय्याने मावळे लाल महालात घुसले आणि त्यांच्या नियोजनबद्ध कृतीने शाहिस्तेखानास जरब बसली. शाहिस्तेखानाचे सैन्य बळ आणि त्याची ताकत पाहता, हे आव्हान महाराजांनी स्वीकारले आणि त्यामध्ये अपूर्व विजय संपादन करण्याचा विक्रम केला. नियोजन, व्यवस्थापन आणि समन्वय यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली. एप्रिल १६६३ मधील लाल महालावरील हल्ल्याच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत २०० निवडक मावळे होते. लग्नाच्या वर्हाडासोबत हे मावळे पुणे शहरात घुसले. शाहिस्तेखानाचा अंगठा व बोटे कापली गेली. त्याचा मुलगा व जावई त्यात दगावला ह्याचा तर दुःख सागर त्याच्या मनात होताच पण शिवछत्रपती पुन्हा त्याला ठार करायला येतील म्हणून त्याने तडक छत्रपती संभाजी नगर म्हणजेच खडसी (औरंगाबाद ) कडे पळून गेला त्याच्या ह्या डरपोक पनास बघून शेवटी औरंग्याने शाहिस्तेखानाची बंगालला बदली केली, त्याची नामुष्की झाली. शिवचरित्रातील हा प्रसंग उत्कृष्ट नियोजन व नेतृत्व गुणाचा प्रत्यय आणून देणारा आहे.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १ डिसेंबर इ.स.१६७५
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये अजिंक्यतारा स्वराज्यात सामील करून घेतला. १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६च्या डिसेंबर-जानेवारीमध्ये छत्रपती शिवराय अजिंक्यतारावर आजारी पडले होते. त्यावेळी तब्बल दोन महिने त्यांनी येथे विश्रांती घेतली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ डिसेंबर इ.स.१६८३
(मार्गशीर्ष वद्य अष्टमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार शनिवार)
छत्रपती संभाजी महाराजांची सालशेतला धडक पोर्तुगिजांचे धिंडवडे काढले. पोर्तुगिजांचे धर्मांधतेचे वेड फारच वाढले होते. त्याबरोबर स्त्रियांवरचे अत्याचार ननरीज व मोनेस्टीजमध्ये पोर्तुगिजांचा अत्याचार महाभयानक असाच होता. छत्रपती संभाजी महाराजांची एक तुकडी सालशेतमध्ये घुसली तर दुसरी बारदेश वर चालून गेली. मुळात छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य या भागात नवीन त्यात पोर्तुगिजांचा तोफखाना चांगला. शिवाय मजबूत अशी शिबंदी असूनही मराठी सैन्य तटाला भगदाड पाडून घोडदळासकट आत शिरून पोर्तुगिजांना पळवून लावले. पोर्तुगीज सैनिकांची यथेच्छ पिटाई करीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने १० दिवसाच्या प्रयत्नानंतर थिव्हीमचा किल्ला घेतला. इतर दोन किल्ले पोर्तुगीज सैन्य न लढल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात आले! पुढील २ ते ३ दिवसांत चापोरा गड देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात गेला. या चारही गडावरील अत्याचारी १४० पोर्तुगीज फादर्सना मराठी सैन्याने त्याच्या अंगावरील झगे काढून हात मागे बांधून उघड्या पाठीवर कोरडे काढत जेवढी करता येईल तेवढी मानखंडना करून कैदेत ठेवले. महाराजांनी साधारणततः महिण्याभरात सालशत व बारदेश प्रांत लुटून जाळून फस्त केला. या संबंध धामधुमीत छत्रपती संभाजी इतकी दहशत निर्माण केली की या संपूर्ण कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यापुढे उभे राहण्यासही कोणी धजावला नाही. सोबत बारदेशच्या किल्ल्यांतून तब्बल ४६ तोफा छत्रपती संभाजी महाराजांनी नेल्या!
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १ डिसेंबर इ.स.१६९७
संताजींच्या मृत्यूनंतर झुल्फिकार
खानाच्या सैन्याने इ. स. १६९७ व्या पावसाळ्यात जिंजीस वेढा घातला. यावेळी राजाराम महाराजांकडे सैन्य नव्हते म्हणून रामचंद्रपंतास धनाजींस सैन्यासह ताबडतोब पाठविण्यास लिहिले. नंतर आणखी आणीबाणीची पत्रे पाठविली. परंतु महाराष्ट्रातून सैन्य लवकर येण्याची शक्यता न वाटल्यामुळे राजाराम महाराजांनी झुल्फिकार खानाबरोबर तहाचे बोलणे लाविले. बोलणी करण्यासाठी आपला दासीपुत्र कर्ण यांस कारकुनासह वांदिवाशला रवाना केले. २ ऑगस्ट १६९७ रोजी राजा कर्ण व कारकून मंडळी बांदिवाशला गेली. त्यांचे बोलणे ऐकून घेऊन झुल्फिकार खानाने ते बादशहास कळविले. ह्या बोलण्यात राजाराम महाराज मोगलांचे स्वामित्व पत्करण्यास तयार असून त्याप्रमाणे तह घडून यावा असा आशय त्यांत होता. परंतु औरंगजेबाने तहास मान्यता न देता जींजी काबीज करण्याचाच कडक आदेश दिला. तेव्हा झुल्फिकार खानाने कर्ण यांस परत पाठविले. यानंतर ८ नोव्हेंबर १६९७ त झुल्फिकार खानाने जिंजीचा वेढा कडक केला. किल्ल्याभोवती ठाणी बसवून ती सरदारांत वाटून दिली. दाऊदखान चिखली दुर्गाच्या पायथ्याशी ठाणी बसवून होता. त्याने धाडसाने चमार टेकडीवर हल्ला चढविला आणि एका रात्रीत त्याने किल्ला जिंकून घेतला. झुल्फिकार खानाने मनात आणले असते तर तो जिंजीला ज्या दिवशी पोचला त्याचदिवशी तो किल्ला हस्तगत करू शकला असता पण राजारामास सुखरूपपणे जिंजीहून पळून जाण्यासाठी त्याने मुद्दाम मोहीम लांबविली. राजाराम महाराजांपाशी युद्धसामग्री पुरेशी नव्हती. चमार टेकडी हातची गेली होती हे सर्व पाहून राजाराम महाराज घाबरले. त्यांनी खंडोबल्लाळ यांजला खानाकडे बोलणी करण्यास पाठविले. आपण कोणत्या बाजूने हल्ले करणार, तुम्हास बाहेर निघून जाण्यास कोणीकडुन कशी संधी ठेविली आहे इत्यादी प्रकार खानाने खंडोबल्लाळ मार्फत राजाराम महाराजांस कळविले. खानाच्या सैन्यांत गणोजी शिर्क सरदार होते. त्यांजला खंडोबल्लाळ भेटले आणि छत्रपतींच्या आणि त्याच्या कुटुंबीयांचा बचाव करण्याविषयी त्यांस त्यांनी गळ घातली. गणोजी शिर्के यांना दाभोळीच्या देशमुखीचे वतन हवे होते ते राजाराम महाराजांनी खंडोबल्लाळास दिले होते.खडोजींनी ते वतन लगेच गणोजींच्या हवाली करण्याचे कबुल केले आणि छत्रपतीकडून त्याच्या लेखी सनदा लिहून घेऊन शिरक्यांच्या हवाली करण्याचे कबूल केले. नंतर शिर्के यांनी राजाराम महाराजांस बुरख्याच्या पालखीत बसवून आपल्या आप्तांच्या बायका असे सांगून स्वतःच्या गोटांत आणिले. दुसरे दिवशी शिकारीचे निमित्त सांगून शिर्के राजाराम महाराजांस बरोबर घेऊन बाहेर पडले. जवळच धनाजींची फौज आली होती, तिच्या हवाली राजाराम महाराजांस केले तेथून राजाराम महाराज वेलोरास दि. १ डिसेंबर १६९७ रोजी गेले. वेलोरचा किल्ला मराठयांच्या ताब्यात होता. मानाजी मोरे नावाच्या किल्लेदाराने राजाराम महाराजांची सर्व व्यवस्था नीट ठेवली. अशा रीतीने राजाराम महाराजांची सुटका करवून झुल्फिकार खानाने राजाराम महाराजांशी मैत्री जोडण्यात त्याचा अंतिम हेतू बादशहाच्या मृत्यूनंतर गोवळकोंड्याचे राज्य घ्यावयाचे व राजाराम महाराजांस विजापूरचे राज्य द्यावयाचे हा होता किंवा काय हे समजण्यास पुरेसा पुरावा उपलब्ध नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर







