〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*📖✒️स्वतःला "माफ" करण्याची कला.✍️*
*दुसऱ्याला "माफ" करणं कधीही कठीण नसतं, पण तीच वेळ जेव्हा स्वतःवर येते, तेव्हा स्वतःला माफ करणं खूप अवघड होऊन जातं.*
*कारण अगदी सोप आहे, बुद्धी प्रत्येक व्यक्तीकडे असते, पण आपण एखाद्या व्यक्तीकडून फसवलं जातो किंवा आपला विश्वासघात होतो, तेव्हा आपण आपल्या बुद्धीने विचार करत नसतो, तर मनाने विचार करत असतो.*
*जगात कोणीच कोणाला फसवू शकेल इतकं बुद्धिमान नसतं. प्रत्येकाचा चलाखीपणा लक्षात येत असतो, पण आपण नाती जपत असतो म्हणूनच फसवलं जातो.*
*जेव्हा कधी असं वाटेल की, एखाद्या व्यक्तीने आपल्याला फसवलं, आपला मौल्यवान वेळ वाया गेला, किंवा आयुष्यात खूप मागे आलो, तेव्हा स्वतःला सांगा की कोणावर विश्वास करणं किंवा प्रेम करणं चुकीचं नसतं, तर चुकीचं असतं कोणाचा तरी विश्वासघात करणं किंवा कोणाचा तरी वेळ व्यर्थ घालवणं.*
*जर तुम्ही कोणासोबत वाईट वागले नसाल आणि तरीही तुमच्यासोबत वाईट घडलं असेल, तर ती तुमच्या चांगुलपणाची शिक्षा समजा आणि याचा अर्थ तुम्ही माणूस म्हणून कुठेही कमी पडला नाहीत.*
*आणि स्वतःच स्वतःला माफ करा आणि त्यातून बाहेर पडून नवीन सुरुवात करा. नवीन आयुष्य तुमची वाट पाहत आहे.*
✨✨✨✨💫✨✨✨✨
*जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिम्मत ठेवा, आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.*
*चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगल.*
*आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते. त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.*
*वर्तुळाला शुन्यात मोजणाऱ्या लोकांना परीघाचं महत्व कळत नाही.*
*सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत, मग ते वृक्ष असो की आई.*
*नदीचे पाणी कितीही गोड असले, तरी शेवटी तिला खाऱ्या समुद्राला, मिसळूनच राहायला लागतं.*
*तसच मनुष्य कितीही सरळ असला, तरी त्याला काही वाकड्या, व्यक्तींबरोबर मिसळूनच, जीवन व्यतीत करायला लागतं.
*🌻🌞 शुभ सकाळ 🌞🌻* #🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ #🙏भक्तीमय सकाळ🎬