꧁🏵️♥️॥श्री स्वामी समर्थ॥♥️🏵️꧂
ShareChat
click to see wallet page
@swami_____creation
swami_____creation
꧁🏵️♥️॥श्री स्वामी समर्थ॥♥️🏵️꧂
@swami_____creation
🔱स्वामी 🔱
आज शारदीय नवरात्रीची सातवी माळ आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी ही २८ सप्टेंबरला असणार आहे. शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रुप देवी कालरात्रीची पूजा केली जाते. कालरात्री देवी दुष्टांचा नाश करणारी, अनेक संकटांवर मात करणारी देवी आहे. त्यांच्या उपासकांनी अग्रीचे, पाण्याचे, प्राण्यांचे आणि शत्रूचे भय कमी होते. जाणून घेऊया कालरात्री देवीची पूजा विधी पद्धत आणि मंत्र देवी कालरात्रीचे स्वरुप नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच महासप्तमीला कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी कालरात्री देवीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. शुंभ निशुंभाचा नाश करण्यासाठी दुर्गा मातेने कालरात्रीचे रूप धारण केले होते असे मानले जाते. कालरात्री देवीचा रंग कृष्ण आहे. म्हणूनच तिला कालरात्री म्हणतात. मातेचे रूप कालिका म्हणजेच काळ्या रंगाचे असून तिचे केस सर्व दिशांना पसरलेले आहेत. कालरात्री मातेला चार हात आणि तीन डोळे आहेत. देवी कालरात्री हे भगवान शिवाचे अर्धनारीश्वर रूप दर्शवते तर गळ्यात माळ आहे. त्यांच्यापैकी एक नाव शुभंकारी देखील आहे. त्यांच्या डोळ्यांतूनही आगीचा वर्षाव होतो. मातेचा वरचा उजवा हात वर मुद्रेत आणि खालचा उजवा हात अभय मुद्रेत आहे. कालरात्रीला तीन डोळे आहेत. देवी कालरात्रीचा मंत्र एक वेधी जपाकरर्णपूरा नग्ना खरास्थित। लम्बोष्ठी कर्णिकाकणी तैलाभयुक्तशरीरिणी।। वामपदोल्लसल्लोहलताकण्टक भूषणा। वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकारी।। देवी कालरात्री पूजा विधी देवी कालरात्री पूजा करताना महासप्तमीला सर्वात आधी स्नान करावे. त्यानंतर मंदिरात किंवा पाटावर लाल रंगाचा कापड पसरवून देवी कालरात्रीची मूर्ती किंवा फोटो प्रस्थापित करा. गंगाजल शिंपडून तुपाचा दिवा लावा. देवी कालरात्रीच्या मंत्रांचा जप करा. त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करुन आरती म्हणा देवी कालरात्री नैवेद्य कालरात्रीला मालपुआ अर्पण केला जातो. त्यामुळे या दिवशी विधीनुसार मातेची पूजा केल्यानंतर मालपुआचा नैवेद्य दाखवावा. ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै। या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. #🙏नवरात्र स्टेट्स🌺
🙏नवरात्र स्टेट्स🌺 - ShareChat
#🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ #🙏नवरात्र स्टेट्स🌺
🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ - ShareChat
00:15
काशी विश्वनाथ 🙏🙏गंगा आरती दर्शन 🙏🙇‍♀️🙏 #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - ShareChat
01:13