@vasantrao6678043
@vasantrao6678043

📿🙏 *श्री ...वसंतराव!!!* 📿🙏

📿🙏आपणास ठाव ते सकला सांगावे 😇ज्ञानी करुण सोडावे ...सकल जन!!!📿🙏

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀 *(मुलांना नक्की वाचायला द्या, स्वतः वाचुन त्यांना सांगितले तर अधिक उत्तम)* *🔸नित्ययज्ञ (रियाज)🔸* *नेहेमीप्रमाणे धावपळ करत मंदार वर्गात पोचला. मिलिंद फडके सरांचा ड्रॉईंग चा तास सुरु झाला होता. त्यांच्या सारख्या दिग्गज चित्रकाराचे मार्गदर्शन मिळवणारी त्याची बॅच लकी होती. मंदार धापा टाकत मागच्या बाकावर बसला.* *फडके सर सांगत होते - “जिम कॉलिनस्' ने सांगितलेली ही शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची ही घटना आहे. दोन ब्रिटीश गट उत्तर ध्रुवावर जाण्यास निघाले. शर्यतच होती दोन्ही गटांमध्ये, कोण आधी पोहोचतो ते ! पहिला गट उत्तर ध्रुवावर पोहोचला, आणि ३० दिवसात सर्वजण सुखरूप परत आले. दुसरा गट उत्तर ध्रुवा पर्यंत पोचला तर नाहीच पण दुर्दैवाने त्या गटातील सर्वजण मृत्यू पावले.* *“या घटने मागचे कारण शोधतांना असे लक्षात आले – पहिल्या गटाने ठरवले होते रोज २० मैल अंतर कापायचे. थंडी असो, वारा असो, वादळ असो. काहीही असो, रोजचे ठरलेले ध्येय गाठायचे.* *दुसरा गट मात्र जमेल तेंव्हा - जमेल तितके अंतर कापत होता. या गटातील एकाची दैनंदिनी मिळाली, त्यात लिहिले होते – आज पुन्हा वादळी वाऱ्यामुळे हलता आले नाही, आम्ही दोन दिवस एकाच जागी थांबून आहोत. आणि त्याच दिवसाची नोंद पहिल्या गटाने केली होती – आजही वादळ होते, त्यामुळे आजचे २० मैल कापायला जास्त कष्ट पडले.” गोष्ट संपली तसे फडके सर वर्गाला म्हणाले, ”या गोष्टीवरून वरून काय कळते?”* *कोणी सांगितले – “ध्येयाच्या दिशेने एक पाउल जरी टाकले तरी ती प्रगती आहे.”* *कोणी सांगितले – “यश मिळणार की अपयश, हे रोजच्या सवयींवर ठरते.”* *आणखी कोणी आणखीन काही सांगितले.* *शेवटी, फडके सर म्हणाले, “तुम्हाला त्या घटने मागाची कारणे नीटच कळली आहेत! आता पुढचा प्रश्न: 'तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे ?”* *इतका वेळ हिरहिरीने उत्तरे देणारा वर्ग, या प्रश्नाने अंतर्मुख झाला. मंदार विचार करत होता, खरंच आपण रोज ठरलेलं असं काय करतो? सरांनी सांगितलेली Sketching ची practice दुसऱ्या गटासारखी करतो. जमेल त्या दिवशी, जमेल तेंव्हा आणि जमलं तर. मग मंदार ने सरांनाच विचारले – “फडके सर, तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे ?”* *“रोज सकाळी ५ स्केचेस् काढल्याशिवाय मी सकाळचा चहा पीत नाही!”* *पांढरी शुभ्र दाढी आणि hearing aid मिरवणारे सर अजूनही रोज सराव करतात? अंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार असूनही रोज सराव करतात! सरांच्या उत्तराने वर्गात शांतता पसरली. तसे सर म्हणाले, “यालाच आजकाल Daily Ritual म्हणतात. रोजचा अभ्यास, रोजचा रियाझ, रोजचे sketching, रोजची practice, रोजची exercise झालीच पाहिजे!”* *ज्ञानेश्वर यालाच ‘नित्ययज्ञ’ म्हणतात! जो नित्ययज्ञ करायला चुकला, तो सुखाला मुकला! त्याचे यशापयश, सुख-दु:ख परतंत्राने चालते.* *हा लोकू कर्मे बांधिला | तो परतंत्रा भूतला | तो नित्ययज्ञाते चुकला | म्हणोनिया || ३.८४ ||* *आपली रोजची २० मैलाची यात्रा काय आहे? आपण पार पाडतो? विचार करायला लावणारी पोस्ट आहे.* 🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀 #💐इतर शुभेच्छा
#

💐इतर शुभेच्छा

💐इतर शुभेच्छा - आनंदी किंवा सुखी असण्या पेक्षा आनंदी किंवा सुखी वाटणे हे जास्त महत्वाचे असते कारण असणे हे तुमच्या हातात नसेलही कदाचित पण वाटणे हे तुमच्याच हातात असते . म्हणजे कस आहे पहा ! सुखाच्या सर्व वस्तु तुमच्याकडे आहेत पण तुम्हाला सुखी आनंदी वाटतच नसेल तर काय करणार ? पण काहीही नसतांना तुम्हाला सुखी आनंदी वाटत असेल तर तसे वाटण्यापासुन कोणी थांबवु शकेल का ? कोणीच नाही हो ! अगदी देव सुद्धा नाही . म्हणजे आनंदी रहाणे तुमच्याच हातात आहे ना ? - ShareChat
534 जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
*🌺🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌺* *🔵 देशकाल व राशिभविष्य 🔵* 🏀 *शुक्रवार, दिनांक :- ०६/१२/२०१९* 🏀 *पूजेसाठी देशकाल : विकारीनाम संवत्सरे, दक्षिणायने, हेमंतऋतौ, मार्गशीर्षमासे, शुक्लपक्ष्ये, दशमी (३०.३४ प.), तिथौ, शुक्र वासरे, उत्तराभाद्रपदा दिवस नक्षत्रे (२२.५७ नं. रेवती), मीन राशिस्थिते वर्तमान चंद्रे, वृश्चिक राशिस्थिते सूर्ये, धनु राशिस्थिते देवगुरौ.* 🏀 *गुरु अस्त १७-१२-१९; गुरु उदय ०७.०१.२०* 🏀 *सुर्योदय :- ०६.५९* 🏀 *सुर्यास्त :- १७.५९* 🏀 *दिनमान :- ११.००* 🏀 *दिनविशेष :- अमृत २२.५७ नंतर.* 🏀 *अग्नि :- अग्नि पृथ्वीवर नाही.* 🏀 *१६.०० पर्यंत चांगला दिवस.* 🏀 *साडेसाती- वृश्चिक-धनु-मकर या राशींना साडेसाती आहे* 🏀 *राहु काळ - स. १०.३० ते १२.००* ❄ *संदर्भ- दाते पंचांग.* ❄ *संकलन-सदानंद पाटील-रत्नागिरी.* 🏵🏵🏵🏵🏵🌼🏵🏵🏵🏵🏵 *🔷मेष राशी भविष्य 6 Dec 2019* चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालवाल. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे. लकी क्रमांक: 4 *🔷वृषभ राशी भविष्य 6 Dec 2019* धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवाल. त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकतो. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. आज तुम्ही नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अश्या जागेत घालवणे पसंत कराल, जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. लकी क्रमांक: 3 *🔷मिथुन राशी भविष्य 6 Dec 2019* आजच्या दिवशी तुमच्या चेह-यावरील निरंतर स्मित, नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात यावर विश्वास ठेवाता काळजी घ्या. लकी क्रमांक: 1 *🔷कर्क राशी भविष्य 6 Dec 2019* विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे, तुमच्या मनावर दबाव येईल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. लकी क्रमांक: 5 *🔷सिंह राशी भविष्य 6 Dec 2019* आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देईल, जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर, तुम्हाला धन लाभ नक्कीच होईल. आपल्या बहिणीचा विवाह ठरण्याच्या बातमीमुळे आपण आनंदीत व्हाल, पण भविष्याची काळजी न करता या उत्साहाचा आनंद घ्या. कामाच्या ठिकाणा आज तुमचा दिवस आहे! या राशीतील लोक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतील. तुमच्या काहीशा उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा/जोडीदार तुमच्यावर भडकेल. लकी क्रमांक: 3 *🔷कन्या राशी भविष्य 6 Dec 2019* आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत कराल. त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. तुमची कामातील हातोटी, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे तुमचे कौतुक होईल. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. लकी क्रमांक: 2 *🔷तुल राशी भविष्य 6 Dec 2019* आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपल्या एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या ओळखीचे कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. लकी क्रमांक: 4 *🔷वृश्चिक राशी भविष्य 6 Dec 2019* तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा, मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. जे दुसऱ्याला मदत करतात त्यांना देवही मदत करतो हे लक्षात ठेवा. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. लकी क्रमांक: 6 *🔷धनु राशी भविष्य 6 Dec 2019* तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग जाळून टाका नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे प्राप्त होईल. सामाजिक कामात रमाल परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. कामात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. हाताखालच्या सहका-यांच्या उपयुक्त सूचना लक्षपूर्वक ऐकून घ्या. आपल्या वाटेत येणा-या सर्वांशी अत्यंत नम्र, वागा. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल. लकी क्रमांक: 3 *🔷मकर राशी भविष्य 6 Dec 2019* दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवाल. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. उत्तम मानवी मूल्ये जोपासा. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा. त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल. आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. लकी क्रमांक: 3 *🔷कुम्भ राशी भविष्य 6 Dec 2019* तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. उद्योग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. लकी क्रमांक: 9 *🔷मीन राशी भविष्य 6 Dec 2019* तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवाल. आज तुम्ही आपल्या कुठल्या ही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर नाराज होईल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लकी क्रमांक: 7 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 #⏳5 Dec राशिभविष्य
#

⏳5 Dec राशिभविष्य

⏳5 Dec राशिभविष्य - ज्या व्यक्तीला कुठल्याही कामाची लाज वाटत नाही तीच कुठेच अडत नाही . अशी व्यक्ती नेहमी बिनधास्त राहू शकते . वेळ पडल्यास कुठलही काम करावं म्हणजे आयुष्यात कुठेच अडत नाही . इथे जगायचं तर आपला मान आणि अपमान , लाजण ह्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात . कारण वेळ आली तर कोणी पैसे घेऊन येणार नाही . CONNECT MARATHI - ShareChat
28.5k जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
*📿🌹🌻 ६ डिसेंबर - निरासक्ति आणि शरणागति 🌻🌹* एखाद्याची सुरी असली, तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली; दुसर्याने चांदीची केली, कुणी सोन्याची केली; पण मारल्यानंतर परिणाम एकच ! तसा, प्रपंच चांगला असला, कसाही असला, तरी तो सुरीच आहे, त्याचा घात सगळीकडे सारखाच ! प्रपंचाची आसक्ति म्हणजे सुरीची धार आहे. म्हणून, आपला धंदा, नोकरी, सगळे उत्तम करावे, त्यात मागेपुढे पाहू नये; पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी. नोकरी ही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ति आणि अभिमान राहणार नाही. सावधगिरीने वागावे, भगवंताचे स्मरण ठेवावे, त्याचे नाम घ्यावे; बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या. यानेच समाधान मिळेल. भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्य नाही. 'मी समाधान राखून चाललो' असे म्हणणारा, तो जगात धन्य आहे खरा ! ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे, राम कर्ता आहे, ही भावना ठेवून आपण प्रपंच करू या. प्रयत्न आटोकाट करावा, पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावे. भगवंताची प्राप्ति व्हायला दुसरे काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे. इतके उपाधीरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही. ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, अभिमानाने भरलेले असू नये. एकमेकांवर प्रेम करा, घरातून सुरुवात करा. मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही, पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. निःस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा. त्यासाठी, राम दाता आहे,पाठीराखा भगवंत आहे, ही जाणीव ठेवून तुम्ही रहा. ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांति मिळवायला हाच मार्ग आहे. दैन्यवाणे कधीच नसावे. अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता, मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाही; वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही रहा. त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या, राम कल्याण करील हा माझा भरवसा तुम्ही ठेवा. *📿३४१. सुख कशात आहे ? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे ही समजूत तेवढीच खरी आहे.* #🙏भक्ती स्टेट्स
#

🙏भक्ती स्टेट्स

🙏भक्ती स्टेट्स - अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा , पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता , मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा . वैभव आज आहे , उद्या नाही ; वैभवावर विश्वास ठेवू नका . मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही रहा . त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या , राम कल्याण करील हा माझा भरवसा तुम्ही ठेवा . | मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही , पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन . निःस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा . त्यासाठी , राम दाता आहे , पाठीराखा भगवंत आहे , ' ही जाणीव ठेवून तुम्ही रहा . ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे . facebook . com / gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
1.3k जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
From Whats App - श्रीकृष्ण ....... एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की यात काय आहे? दुकानदार म्हणाला त्यात मीठ आहे. संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले यात काय आहे? दुकानदार म्हणाला यात साखर आहे. असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले आणि यात काय आहे? दुकानदार म्हणाला यात श्रीकृष्ण आहे. सन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला अरे या नावाची कोणती वस्तू आहे मी तर कधी ऐकली नाही हे तर देवाचे नाव आहे. दुकानदार संन्यासीबुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला "महाराज तो रिकामा डबा आहे पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो." बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. ते ईश्वराला म्हणाले "अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्यागोष्टी साठी मी एवढा भटकलो घरदार सोडून सन्यासी झालो ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस. परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे". असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला. जे मन-बुद्धी- हृदय *काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख* अशा लौकिक गोष्टीने भरले आहे तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. लोकाना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही... ****** #🙏भक्ती स्टेट्स
#

🙏भक्ती स्टेट्स

🙏भक्ती स्टेट्स - प्रयत्न आटोकाट करावा , पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावे . निःस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच _ _ परमार्थ आहे खरा . श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
872 जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
सत्पुरुषाला लोकांचं मन मोडणं फार कठीण जातं. महाराजांबरोबर स्त्री पुरुष पंगतीत जेवायला बसायचे. मध्ये महाराजांचं पान असे. तेव्हा लहान मुलं महाराजांपाशी जायची आणि म्हणायची प्रसाद द्या. महाराज अजून जेवायला बसलेले नसायचे आणि ते त्या मुलांच्या हातावर आपल्या पानातले काही द्यायचे. या संदर्भात वाईला एक भाऊशास्त्री म्हणून शास्त्रीबुवा होते, त्यांनी परचुरे शास्त्र्यांकरवी महाराजांना एक पत्र लिहिलं की तुम्ही धर्म भ्रष्ट करता आहात. तुम्ही आपलं उष्टं लोकांना देता हे बरोबर नाही. महाराजांनी उष्टं कधीही न देऊन सुद्धा असं पत्र लिहिलं गेलं आणि त्या वेळच्या समाजामध्ये हे प्रसिद्ध झालं. महाराज निंदा-स्तुतीच्या पलीकडे असल्याने त्याचं त्यांना काही वाटलं नाही. असो. पुढे ह्या शास्त्रीबुवांना महारोग झाला आणि त्या अवस्थेत ते महाराजांना भेटले आणि म्हणाले, महाराज ह्या हातांनी मी ते पत्र लिहिलं म्हणून हे असं झालं का? हे ऐकून महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं! ते म्हणाले, शास्त्रीबुवा, मी इतका क्रूर नाही हो. मला फक्त लोकांचं मन मोडवत नाही. तेव्हा शास्त्रीबुवांनी महाराजांना एक प्रश्न विचारला, "महाराज, मानवी जीवनाचं ध्येय काय आणि मनवी जीवनाचा अर्थ काय?" ह्या शास्त्रीबुवांना फार मान होता परंतु रोग झाल्यापासून त्यांना गावात कुणी राहून देईना, तेव्हा त्यांना हा प्रश्न पडला. ह्याला महाराजांचं उत्तर फार अर्थपूर्ण आहे- "शास्त्रीबुवा, मानवी जीवन ही यात्रा आहे. माणूस हा प्रवासी आहे. पण ह्या प्रवासात तीन गोष्टी आहेत. एकीकडे पशु आहे, मध्ये माणूस आहे आणि पलीकडे संत किंवा देव आहे. माणसाचा प्रवास द्विमुखी आहे. तो पशुकडे तरी जातो नाहीतर संताकडे तरी जातो. आणि संताचं कार्य माणसाला प्रवासात भगवंताची दिशा दाखवणं हे आहे. म्हणजे जीवनाच्या धांदलीत देखील त्याचं समाधान भंगणार नाही! ~~ प. पू. बाबा बेलसरे #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - श्रीमहाराज | | श्री राम जय राम जय जय राम । । - ShareChat
1.7k जणांनी पाहिले
20 तासांपूर्वी
*🌸श्रीराम जयराम जय जयराम!* *🌼जय सद्गुरु!!*🙏 *🌷 चिंतन :५.१२.२०१९* 🔥🔥🔥 *🌻एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले, "गुरुजी, प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवून, कोणी गाऊन, ओरडून, कोणी करूणा भाकून, कोणी डोळे मिटून तर कोणी मौन प्रार्थना करतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात, चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करतात, असे का?" रामदास स्वामी हसले, म्हणाले, " एकदा मी असा प्रसंग पाहिला की ,एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता.अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, नाही आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती.* *डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते. थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले. विचारले, "बोल काय पाहिजे तुला?" भिकारी म्हणाला, "माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे! माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. यावेगळं शब्दात काय सांगू?"* *समर्थ म्हणाले, "त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो, या परते शब्दात काय मागू ? 'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार ? म्हणून अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्‍या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही. तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं"*🌹🙏 (संग्रहित) *जय जय श्रीराम!! जय जय श्रीराम!!* #🌼 जय श्री कृष्ण
#

🌼 जय श्री कृष्ण

🌼 जय श्री कृष्ण - । गोविन्द - गोपालकी जय । । Attp : / / / satcharcha . blogspot . com भगवानका विश्वास भगवान्से भी बड़ा है क्योंकि जो भगवान् सदा सब जगह रहते हुए भी नहीं मिलते , वे विश्वाससे मिल जाते हैं । www . SWAMIRAMSUKHDASJI . ORG - ShareChat
433 जणांनी पाहिले
20 तासांपूर्वी
।। दास-वाणी ।। तूप होतें तरी थिजलें । तरीकरितां मीठ जाले । बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब ।। पृथ्वीकरितां जालें झाड । झाडाकरितां छाया वाड । धातूकरितां पवाड । उंच नीच वर्णाचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०३/०६-०७ आधी तूप असते म्हणून ते कणीदार होते. थिजते. विशाल खाडी असते म्हणून त्यातून खारट मीठ होते. आधी बिंब असते म्हणून आपल्याला प्रतिबिंब दिसते. जमीन आधी आहे म्हणून त्यामधे मोठमोठे वृक्ष उगवतात. वृक्ष असतात म्हणून त्यांच्या विशाल सावल्या पडतात. मूळ धातू नावाचा पदार्थ असतो. मग त्याचे वेगवेगळया रंगांचे उच्च किंवा हलक्या प्रतीचे भेद किंवा प्रकार पडतात. उदाहरणार्थ पिवळया रंगाचे मौल्यवान सोने किंवा तांबुस रंगाचे तांबे किवा काळे कमी किंमतीचे लोखंड. प्रकार वेगवेगळे असले तरी धातू एकच असतो. त्याप्रमाणे मायिक सृष्टी लक्षावधी प्रकारांमधे जरी व्यक्त झाली तरी ती मूलत: ब्रह्मस्वरूपच ! सर्वं खलु इदं ब्रह्म । सूक्ष्मआशंकानिरूपण समास. #🙏भक्ती स्टेट्स
#

🙏भक्ती स्टेट्स

🙏भक्ती स्टेट्स - ॥ ॐ श्रीपरमात्मने नमः । । अनेक साधनांपैकी सद्गुरु एक साधन आहे असे म्हणणारा आत्मसुखाला अंतरला असे समजावे . सद्गुरु एक साधन म्हणूनच केला व त्याचे ऐकले , आणि साध्य जे आहे ते त्याहून निराळेच आहे , असे मानणारा मनुष्य सर्वस्वी नागवला असे समजावे . •श्रीएकनाथी भागवत - ShareChat
320 जणांनी पाहिले
20 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..