हा अनुभव आपल्याला आला असेल तर नकीच शेअर करा...
*कधी कधी आपण ज्या माणसांवर सर्वाधिक विश्वास ठेवतो*,
*तेच आपल्या पाठीवर वार करतात... आणि आपण गोंधळून जातो*.
*आपणच चुकलो का?" असं वाटायला लागतं*
*पण नाही*..
*कारण काही लोक हे बगळ्या सारखे*.
*वरून पांढरे शुभ्र, पण आतून काळ्या गोष्टींनी भरलेले*
*त्यांचं बोलणं मधुर, चेहरा गोड, वागणं सभ्य* –
*पण काळजात मात्र दुसऱ्याला खाली खेचण्याची काळी सुपारी घेतलेली असते*.
*ते पांढऱ्या पंखांमध्ये आपले खरे हेतू लपवतात*–
*पण ती नजर... ती नेहमी फाडणारीच असते*
*या बगळ्यांपेक्षा*
*कावळा बरा*!
*तो दिसतो तसाच असतो*.
*कधी गोंडस दिसत नाही, पण तो* *फसवत नाही*.
*त्याच्या कावकावात खोटेपणाचं गोड रूप नसतं*
*जे आहे, ते थेट तुमच्या चेहऱ्यावर सांगतो*
*कपटी माणसं कधीह समोरासमोर बोलत नाहीत*.
*ते तुमच्याशी गोड बोलतील*, *तुमच्या पाठीमागे विखार उधळतील*.
*तोंडावर बोलणारे लोक त्रासिक वाटतात, पण फसवत नाहीत कारण ते तोंडात एक आणि पोटात एक असे वागत नाहीत*.
*कपटी माणसं गोंजारतात, पण नकळत जखम करतात*
*या जगात फसवणं नविन नाही...
*विश्वास ठेवावा, पण आंधळेपणाने नाही*.
*मनापासून जोडावं, पण स्वतः हरवून नाही*
#☺️प्रेरक विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #☘️हर हर महादेव🙏🏼