कल्पना करा, फक्त १३ वर्षांचा एक लहानसा मुलगा…
आईवडिलांच्या कुशीत असावा, शाळेत धावावं, मित्रांसोबत खेळावं एवढं त्याचं वय. पण या मुलाने काय केलं?
तो काबुल विमानतळावरून प्रवाशांच्या गर्दीत शिरला आणि थेट विमानाच्या व्हील वेल मध्ये जाऊन लपला! त्याला वाटलं तो इराणला पोहोचेल… पण नियतीने त्याला थेट भारतात आणलं.
९४ मिनिटं… हो अगदी तासभरापेक्षा जास्त वेळ तो मुलगा विमानाच्या चाकांमध्ये अडकून राहिला.
१०,००० फूट उंचीवर ऑक्सिजन नाही, थंडगार वारे, मृत्यूची सावली… आणि तरीही हा लहान जीव वाचला!
ही केवळ योगायोग नाही, तर देवाची कृपा म्हणावी लागेल.
दिल्ली विमानतळावर उतरल्यावर जेव्हा तो मुलगा थरथरत बाहेर आला, तेव्हा तिथले कर्मचारी थक्क झाले.
CISF जवानांनी त्याला ताब्यात घेतलं आणि इमिग्रेशन विभागाकडे सोपवलं.
त्याची कहाणी ऐकताना डोळ्यात पाणी येतं…
किती मोठी असावी त्याची धडपड, किती खोल असावं मनातलं दुःख, की १३ वर्षांचा जीव मृत्यूला डोळ्यात डोळे घालून विमानाच्या चाकात जाऊन लपतो!
आज तो मुलगा अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. त्याला पुन्हा काबुलला परत पाठवलं जाणार आहे.
पण त्याचा हा थरारक प्रवास आपल्याला एक मोठा प्रश्न विचारतो –
बालपण असं असावं का? की मुलांना पंख मिळावेत… पण उड्डाण स्वप्नांच्या दिशेने असावं, मृत्यूच्या छायेत नव्हे! 💔
जगभरातील माहितीसाठी Follow करा! World Marathi
.
.
.
#marathi #maharashtra #pune #mumbai #nagpur #india #instagram #trending #viral #satara #kolhapur #viral #sambhajinagar #nashik #marathimotivational #marathimeme #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌