मराठा क्रांती मोर्चा
#

मराठा क्रांती मोर्चा

पुरोगामी महाराष्ट्रातील राजकरणाचे जातीय वास्तव ? अशोक राणे,अकोला महाराष्ट्र म्हणजे त्याग, पराक्रम आणि शौर्यची भूमी. महाराष्ट्र म्हणजे विविधतेने नटलेल्या संस्कृती आणि संताची भूमी. याच महाराष्ट्राच्या भूमीने देशाला परकीय आक्रमकासोबत रणांगणावर रक्तरंजित संघर्ष करण्याची पेरणा दिली. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा-हिमालयाच्या मदतीला धावतो सह्य़ांद्री माझा अशी या महाराष्ट्राच्या मातीची देशात ओळख आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठय़ा विनव राष्ट्रगाडा न चाले! खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भरताचा! क्रांतीवीर सेनापती बापट यांच्या वाणीतील उपरोक्त आग महाराष्ट्राचा आणि मराठय़ांच्या पराक्रमाची साक्ष देते, पण आज देशाचा आधार आणि देशाला पेरणा देणारा महाराष्ट्र काही छुप्या राजकारण्यांनी खेळलेल्या जातीय राजकीय खेळीमुळे अराजकतेच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला आहे किंवा आणून ठेपला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. राज्यात शांततेच्या मार्गाने होत असलेल आरक्षण आंदोलन अचानक हिंसक होऊन त्यास जातीय रंग देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आंदोलकांनी नवी मुबईत प्रचंड जाळपोळ करून जनजीवन विस्कळीत करण्यात आले होते. चाकण येथील आंदोलकांनी जवळपास १५0 वाहने जाळली. एसटी बसेसची जाळपोळ करून सात तरुणांचे नाहक प्राण गेले आहेत. राज्यात शिवरायांचा आदर्श ठेवणारा सह्य़ांद्रीतील तरुण जयभवानी जयशिवराय घोषणा देत करीत असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विचार केल्यास कायदा हातात घेऊन पोलिस यंत्रणेवरच हल्ले करणे कितपत योग्य आहे याचे सामूहिक चिंतन करण्याची वेळ आली आहे. आंदोलन करावे पण संयम ठेवून असा संदेश देणे अवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस घटनेच्या चौकटीतून राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि राज्याचा कारभार ना कोणावर अन्याय ना कोणाचा अनुनय शेतकर्‍यापासून शेतमजुरांचा विचार करून योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी अनुकूल कार्य करीत आहेत. मराठा आरक्षणासाठी अनुकूल तथा कायद्याच्या कसोटीवर व घटनेच्या चौकटीत खरे ठरणारे आरक्षण देण्यास कटिबद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवावा लागेल तसेच महाराष्ट्राचा त्यांच्यावर विश्‍वास असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात राज्यात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था, नगर महानगरपालिका निडणुकांमध्ये यश मिळाले असल्याने त्यांचे नेतृत्व सर्वमान्य असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे अनेक राजकीय व्यक्तींच्या दुकानदार्‍या बंद होऊन त्यांना घरी बसावे लागले व भविष्यात सुद्धा किती दिवस घरी बसावे लागेल याची शाश्‍वती नाही किंवा सत्ता बदलाचे कोणतेही संकेत मिळत नसल्यामुळे फुले, शाहू, आंबेडकर नावाने गजर करणारे आता जातीय राजकारणाच्या हत्याराचा वापर करीत आहेत तसेच मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्याच्या पडसादाविषयी सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्ट, आरक्षण मागतो, बायको नाही' तसेच पुणेरी पगड़ी,फड़णवीसाकडून छत्रपती नियुक्ति अशा अनेक खासगीमधील चर्चांचा वेध घेतल्यास चर्चामध्ये स्पष्ट जातीय रंगाची किनार साक्ष देते वास्तवमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला जातीय राजकारणाचे वेध लागणे कोणाच्याही हिताचे नाही. राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाचा संदर्भ देऊन राजकारण केले जात आहे. वास्तव शाहू महाराजांनी त्यावेळेस आरक्षण राजकारण करण्यासाठी दिले नव्हते याचा विचार करावा लागेल. शाहू महाराजांचे नाव घेणार्‍यांच्या मोठ मोठय़ा शिक्षण संस्था, स्वतंत्र विद्यापीठे आहेत. तेथे गरीब मुलांना प्रवेश का देत नाहीत याचा सुद्धा विचार करणे अगत्याचे ठरेल. राज्यामध्ये अनेक मराठा नेत्यांचे खासगी सचिव ब्राह्मण आहेत. काहींचे जावई सुद्धा ब्राह्मण आहेत. मग त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने समस्याचे कारण नसावे म्हणजे खासगी सचिव, जावई ब्राह्मण चालतो. मुख्यमंत्री का नाही? राज्यामध्ये आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वातावरण हळूहळू निर्माण होत असून त्याचे मोर्चे, आरक्षण, मागण्या अशा वेगवेगळ्या रूपाने राज्यात पडसाद उमटतांना दिसत आहेत. राज्यातील सरकार कुचकामी आहे. हे दाखविण्यासाठी विरोधकांनी स्पर्धा सुरू करीत आहेत. यासर्व पार्श्‍वभूमीवर कायद्याच्या कसोटीवर व घटनेच्या चौकटीवर खरे ठरणारे आरक्षण दिले गेले पाहिजे. त्यास कोणाचाही विरोध असूच शकत नाही. आरक्षणाच्या मुद्दय़ावर होत असलेले हिंसक आंदोलन पाहता पुरोगामी महाराष्ट्राला जातीय कीड लागणार नाही किंवा जातीय राजकारणाचे वेध लागणार नाहीत तसेच जाळपोळ करून प्रश्न सुटणार नाहीत, याची खबरदारी घेऊन सामूहिकपणे संयमाची भूमिका घेणे आवश्यक आहे.
816 जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post