वटपौर्णिमा व्हिडीओ स्टेटस
#

वटपौर्णिमा व्हिडीओ स्टेटस

иιѕнι
#वटपौर्णिमा व्हिडीओ स्टेटस #वटपौर्णिमा व्हिडीओ स्टेटस
690 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

वटपौर्णिमा व्हिडीओ स्टेटस

*पूजा करण्याआधी संकल्प कां करावा?* *पूजा विधी संकल्प* पूजा करण्याच्या अनेक पद्धती शास्त्रात सांगितलेल्या आहेत. विधीवत पूजा केल्याने लवकरच पूजेचे फळ मिळते. त्यामुळेच घरात कसलीही पूजा असली तरी ब्राम्हणाला बोलावून त्याच्या हस्ते पूजा करून घेतली जाते. याचप्रकारे तुम्ही स्वतःही रोज पूजा करताना काही नियम पाळले तर देव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. शास्त्रानूसार कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे असते. पूजेच्या आधी संकल्प केला नाही तर पूजा सफल होत नाही. *संकल्पाविना पूजा क
981 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

वटपौर्णिमा व्हिडीओ स्टेटस

*वटपौर्णिमा* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 १) हे वट सावित्रीचे व्रत पूर्वी सुवासिनी अतिशय श्रद्धेने व निष्ठने करत असत, व्रत म्हणले की उपवासही आलाच, तोही तितक्याच श्रद्धेने करीत असत. वट पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रसन्नतेने पूजा साहित्य घेऊन वडावर जाणाऱ्या स्त्रिया आजही दिसतात, ते दृश्य पाहताना मोठा आनंद होतो, पण सध्या काळ हा पुरोगामित्वाचा, समान हक्काचा व सुधारनेचा आहे. या दृष्टीने वट सावित्री व्रतावर सध्याच्या युवती खूपच टीकेचा भडीमार करतात,त्यांनी व्रत व उपवास यापासून काय फायदे आहेत याचा कधी विचारच केला नाही, सावित्रीची कथा तरी वाचली का नाही यात शंका येते, कारण सावित्रीच्या गळ्यात सत्यवान बांधला नव्हता उलट सत्यवान हा दरिद्री व अल्पायुषी आहे, असे नारदानी तिच्या लग्नापूर्वी सांगितले होते . म्हणून कुटुंबातील सर्वांची इच्छा तिने सत्यवानाशी लग्न करू नये ,अशीच होती. शिवाय सत्यवान काही राजा किंवा धनवान ही नव्हता. उलट सावित्री ही अश्वपती राजाची मुलगी म्हणजे राजकन्या होती, असे असूनही '' मनाने मी सत्यवानाला वरले आहे व मी त्याच्याशीच विवाह करणार'' असे तिने स्पष्ट सांगितले. (यावरून पूर्वीच्या काळी स्त्रियांना पतीची निवड करण्याचे स्वातंत्र्य होते असे दिसते.) स्वेच्छेनीच तिने सत्यवानाशी विवाह करण्याचे ठरवले होते. *२) वट सावित्रीच्या व्रताचा बोध* महान पतीव्रतेत सावित्रीची गणना आहे, ती प्रातःस्मरणीय आहे , तिला यमजेत्री असे म्हणले आहे. असे असताना हे व्रत गुलामीचे निदर्शक कसे होते? सत्यवानाशी विवाह केल्याने जी सुख दुःखे पदरी येतील ती सोसण्याची तिची तयारी आहे , सावित्री ही एखादी विलासलोलुप , ब्रमर वृत्तीची युवती नव्हती. ती तेजस्वी आणि निश्चयी होती . प्रसंगी ठामपणे व योग्य निर्णय घेण्याचा गुण आपल्या अंगी यावा , हा बोध यातून घेतला पाहिजे. *३) व्रता विषयीचे गैरसमज* सात जन्म हाच पती मिळवा म्हणून हे व्रत करायचे असते , असा समज अनेकांचा आहे, पण तो गैरसमज आहे. पती आळशी , व्यसनि, बाहेरख्याली, कसाही असला तरी हाच पती सात जन्म मिळवा असे कोणत्या स्त्रीला वाटेल का? मग तोच मिळावा म्हणून व्रत करण्या पेक्षा न केलेलं बरे असे वाटून अनेक सुशिक्षित स्त्रिया हे व्रत करीत नाहीत, व्रताच्या आरंभी संकल्प केला जातो . हे व्रत मी का करीत आहे, याचा उद्देश व हेतू काय आहे याचे प्रकटीकरण संकल्पात होत असते. संकल्प म्हणजे हेतूचे प्रकटीकरण आहे. *४) संकल्प* *' मम इहजन्मनी अखंड सौभाग्य पुत्रपौत्र धनधान्य ऐश्वर्य अभिवृध्यर्थम वट मुले ब्रम्हा सावित्री प्रीत्यर्थं '* असा संकल्प आहे, यात सात जन्म हाच पती मिळावा असा उल्लेख नसतांना तसा हेतू आहे असे गृहीत धरून या व्रताला झोडपले जाते. हे योग्य आहे का? हल्ली कोणताही विषय समजून न घेता , त्याचा अभ्यास न करता आपले मत प्रतिपादन करण्याची वृत्ती फार वाढलि आहे. अर्थात ती अयोग्य आहे. हे जाणून प्रत्येक गोष्ट करताना , आपण कारणांचा विचार करतो. पण कुठेतरी निष्ठा ठेवावी लागते व म्हणूनच वट पूजनासारखी व्रत वैकल्ये डोळसपणे एकविसाव्या शतकातही चालू राहिली पाहिजेत. कोणतेही कर्म ज्ञानपूर्वक करावे , असे ऋषींनी सांगितले आहे, ' *यदेव विद्यया करोति तदेव वीर्यवत्तरम भवति '* ज्ञानपूर्वक केलेलं कर्म हे प्रभावी व बलवान होते. असे शास्त्र सांगते. जाणून घेण्याचे काम बुद्धी करत असते, हि बुद्धी जितकी प्रगल्भ असेल तितके ज्ञान अधिक होईल व त्याची कारणमीमांसा हि समजेल . उपवासाच्या दिवशी हलके , पचनाला सोपे असे पदार्थ म्हणजे फळ दूध घेण्यास सांगितले आहे, म्हणून त्याला फलाहार असे म्हणले आहे. याचाच अपभ्रंश फराळ असा झाला आहे . *कमी आहराने शरीर हलके राहते . जास्त खाण्याने अपचनाचे विकार वाढतात , प्रकृती बिघडण्यास मूळ कारण हे अपचनच आहे.* हे जाणून प्रत्येक व्रतात उपोषण सांगितले आहे. हल्ली उपोषण म्हंटले कि शाबूदान्याची खिचडी खाणे असा अर्थ झाला आहे. पण खिचडी पचनास हलकी नसून जडच आहे. म्हणून साबुदाणा खाणे टाळले पाहीजे, *१९७१ साली दिल्ली येथे झालेल्या डॉक्टरांच्या परिषदेत ,' उपोषण हे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींवर उपयुक्त आहे हे रशियन डॉक्टर श्री वाय. यस.* *निकोलायेव यांनी मान्य केले. ते मास्को येथील मेडिकल सायन्स या संस्थेचे प्राध्यापक आहेत . ते म्हणाले आम्ही उपोषणा चा उपचार सुमारे पाच हजार रोग्यांवर करून पहिला , त्याचा चांगला गुण येतो असे आढळून आले आहे .* *भूकेने जवढे लोक मारतात त्यापेक्षा अती खाण्याने जास्त मारतात असा अनेक डॉक्टरांचा अनुभव आहे , हे सर्व जाणूनंच प्रत्येक व्रतात ऋषिनी उपोषण करण्यास सांगितले असावे. केवळ आहार बदल म्हणून उपोषण कारन्यापेक्षा व्रताचे ते अंग आहे म्हणून केले तर शारीरिक, मानसिक, लाभ होऊन पुण्यासंचय हि गाठी पडेल, लठ्ठपणा कमी करण्या करिता लिक्विड डाइट करण्यापेक्षा उपोषण करणे चांगले नाही का?? उपोषनाणे बुद्धी हि तल्लख राहते, असा अनेकांचा अनुभव आहे..* *५) वट पूजन* *वड , पिंपळ, औदुंबर, शमी, हे पवित्र वृक्ष म्हणून सांगितले आहेत. यांच्या पूजनाने आपण निसर्गाच्या जवळ जात असतो, झाड लावणे जितके महत्वाचं आहे तितकंच त्याची जोपासना करणे महत्वाचे आहे, झाड लावण्याचे महत्व आपल्या पुराण ग्रंथात खूप सुंदर सांगितलं आहे .* *संदर्भ:- अश्वत्थमेकं पिचुन्मंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम्!* *कपित्थबिल्वामलकीत्रयं च पंचाम्ररोपी नरकं न पश्येत्!!* जो माणुस एक पिंपळ, एक निंब, एक वड, दहा चिंचवृक्ष, तीन कवठ, तीन बेल, तीन आवळीची व पाच आंब्याची झाडे लावतो, तो नरक कधीही पाहात नाही. भविष्योत्तरपुराण, १२८/२/१० झाडे लावणे व त्याची जोपासना करणे हा सध्याच्या काळाच्या दृष्टीने संदेश या व्रतातून मिळतो.सौभाग्य नको असे म्हणणारी स्त्री भूतकाळात झाली नाही व भविष्यातही होणार नाही. उलट आहेव (सौभाग्यपणी) मरण यावे ,हीच स्त्रियांची इच्छा असते. ६)गुलामी नव्हे समर्पण - जीवनातील खऱ्या यशासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा तेजस्वी आदर्श सावित्री आपल्यापुढे ठेवते. स्वेच्छेनीच जाणीवपूर्वक निवडलेल्या पतीच्या सुख दुःखात भागीदारी होणे , त्याला संकटातून वाचविण्यासाठी काळालाहि आव्हान देण्याची तयारी ठेवणे, त्याची साथ न सोडणे आणि उभयतांनी जीवने श्रेयोन्मुख करणे हे स्त्रीचे फार मोठे सद्गुण आहेत, यात स्त्रीची लाचारी नाही. वट सावित्रीचा नुसता उपहास करण्यापेक्षा श्रद्धेने व निष्ठेने ते व्रत आचरण करून काय आत्मिक समाधान लाभते ते पहावे, सर्व वृक्षात वट वृक्षाचे आयुष्य जास्त आहे , परंब्यांनी त्याचा विस्तार हि खूप होतो. करण्यात बावळट पणा काय आहे? आता आपण व्रताचे विधान थोडक्यात समजून घेऊयात " वट पौर्णिमा" वास्तविक हे व्रत 3 दिवसांचे आहे, 3 दिवस करणे होत नाही म्हणून स्त्रिया हे व्रत1 दिवस करतात . ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेच्या वेळी हे व्रत करायचे असते . या व्रता करीता चतुर्दशी युक्त पौर्णिमा घ्यावी . चतुर्दशीस सूर्यास्तापूर्वी 3 मुहूर्त ( सुमारे 1तास 36 मिनिटं) पौर्णिमा सुरु होत असेल तर ती दिवस योग्य आहे, तसे नसेल तर दुसऱ्या दिवशी हे व्रत करावे . याप्रमाणे चतुर्दशीस पौर्णिमा आली तर ती दुपारी केव्हातरी सुरु होते व पोर्णिमा सुरु झाल्याशिवाय पूजा कशी करावी आशी शंका येते. काही स्त्रिया तर पोर्णिमा सुरु झाल्या नंतर ( दुपारी2 नंतरही ) पूजा करतात. तसे करणे योग्य नाही . सूर्योदयापासून मध्यान पर्यंत हाच पूजा काळ सांगितला असल्याने , त्या काली पोर्णिमा नसली तरी पूजा करणे सशास्त्र आहे , म्हणून अशा वेळी पोर्णिमा सुरु होण्याची वाट न पाहता सकाळी वट पूजन करावे . *।। ब्रह्मानं सह सावित्रि सवित्रीम सत्यवतप्रियाम । धर्मराजं मुनिइंद्रच ध्यायामीच महातारुम ।। वट मूले ब्रह्मसवित्रे नमः।। या नाम मंत्राने पूजा करावी .* सांगितलेल्या संकल्पा प्रमाणे प्रपंचात आवश्यक असणारे सौभाग्य , मुले , नातवंड , धनधान्य ,आणि उभयतांना उत्तम आरोग्य मिळावे हा या व्रताचा हेतू आहे , *व्रत वैकल्ये केल्यामुळे आत्मिक आनंद व संयम निर्माण होतो, तरी मन इप्सित सर्व कामना पूर्ण होण्यासाठी धर्म शास्त्रावर डोळस श्रद्धा ठेऊन या व्रताचे आचरण स्त्रियांनी करावे .*
1.2k जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post