Failed to fetch language order
मनुष्य जन्म शाप की वरदान
1 Post • 150 views
मनुष्य जन्म शाप की वरदान...! #मनुष्य जन्म शाप की वरदान #✍️ विचार #मृत्यु एक अटळ सत्य #सत्य आणि अनुभव #सत्य कलयुगाचे भारतीय संस्कार... समाजामध्ये लहान मुलांवर होणारे अन्याय अत्याचाराचे प्रमाण हे झपाट्याने वाढते आहे आणि लहान मुलांमध्ये ही नीच, निर्लज्यपनाचे प्रमाण ही झपाट्याने वाढते आहे. आणि याला जबाबदार आहे मोबाईल, इंटरनेट आणि नेट वर असणाऱ्या घाणेरड्या वेबसाईड. आपली मुले काय करतात, कुठे जातात, कोणाशी मैत्री करतात यावर लक्ष ठेवणे हे मुलांच्या आई वडिलांचे कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये नीच, निर्लज्य पणा हा वाढतो आहे आणि याला जबाबदार मुलांचे आई वडील सुद्धा आहेत. आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे हे पालकाचे कर्तव्य आहे. मुलांवर चांगले संस्कार झाले तर समाजात आपोआपच नीच, निर्लज्य पानाचे प्रमाण आणि अन्याय अत्याचाराचे प्रमाण हे नक्कीच कमी होईल. नवीन पिढीला माझी कळकळीची विनंती आहे की आपली भारतीय संस्कृती जपा, संस्कार जपा, आपले चारित्र्य ही जपा. या शिवाय राम राज्य शक्य नाही... खर बोलल तर सख्या आईला सुद्धा राग येतो पण आजच्या घोर कलयुगात नवरा बायकोचे समंध, त्यांचे चारित्र्य, त्यांचे संस्कार ही शुद्ध असणे गरजेचे आहे. नवरा बायकाचे नाते जेव्हा निस्वार्थ, निष्पाप, आणि पवित्र असेल तेव्हाच त्यांच्या ही पोटी राम आणि सीता नक्कीच जन्म घेतील. नवरा बायकोचे नाते, प्रेम जेव्हडे निस्वार्थ, निष्पाप, आणि पवित्र असेल तेव्हडीच नवीन येणारी पिढी सुद्धा निर्मळच असेल. नवरा बायकोच्या नात्यालाही माझी विनंती आहे लग्न केले तर ते शेवटपरियंत निस्वार्थ, निष्पाप, आणि पवित्र पणे जपा. भारतीय संस्कृती नुसार नवरा बायकोचे 7 जन्माचे पवित्र नाते हे एव्हड्या सहजा सहजी तोडू नका.
10 likes
8 shares