आजची तरुण पिढी
60 Posts • 31K views
म्हातारे मस्त, *चाळीशीतले त्रस्त*.... आजचा लेख ज्यांना पटणार नाही त्यांची आधीच मी माफी मागून मोकळा होतो. हा लेख माझ्या वैयक्तिक निरीक्षणातून आहे. तुम्ही त्यास सहमत नसाल तर मला तुमचीही बाजू मान्य आहे. ही गोष्ट आहे बहुतांश मध्यमवर्गीय घरातील जिथे आता आई बाबा 60-70 वयाचे व मुलं 40-50 वयाची आहेत. ही अगदी खरी गोष्ट आहे की आपल्या आई - बाबांनी खूप कष्टात दिवस काढून आपल्याला वाढवलं पण हे ही तितकंच खरं की ते आता 'समोरचं ताट द्यावं पण पाट देऊ नये' ह्या जाणीवेतून काहीसा पैसा गाठीशी बांधून आहेत. खरी समस्या आहे चाळीशीतल्या पिढीची. त्यांचं बालपण compromised होतं शिवाय ते आज्ञाधारक, पालकांना घाबरणारे होते आणि आता.... आताही ते तसेच आहेत. आता पालकांबरोबर मुलांच्याही तालावर ते नाचतात. सो कॉल्ड child psychology चे पाठ सोशल मीडिया त्यांना सारखे वाचून दाखवत असल्यामुळे ते त्यांनाही खूप दबून असतात. आई -वडिलांची सेवा करावी की नाही, त्यांना सांभाळावं की नाही हा चर्चेचा मुद्दा असूच शकत नाही, ते मस्ट आहे पण.... पण म्हातारे झालेले आई वडील आता इतके दिवस न अनुभवलेलं सुखासीन आयुष्य जगण्यासाठी उत्सुक तर आहेतच पण शिवाय त्यांच्या ह्या हक्काची जाणीव त्यांना झाली आहे. ह्याची परिणीती बऱ्याच घरात अशी दिसून येते की मुलगा आणि सुनेवर 'टाकूनी भार' ते अगदी एन्जॉय करतात. त्यांनी एन्जॉय करू नये असं मुळीच नाही पण त्यांच्या जमान्यातील आव्हाने आणि आताच्या जमान्यातील ह्यातला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं तर.... पूर्वी शाळेतून आलेला मुलगा शेजारच्या घरी, गल्लीत बिनबोभाट खेळू शकत होता तसं आता त्यांची नातवंड करू शकत नाहीत त्यामुळे ती घरी मोबाईल घेऊन बसतात पण आजी आजोबांना त्यांचा 'मी टाईम' हवा असतो त्यामुळे त्यांना फारसा फरक पडत नाही. पूर्वी एवढी महागाई नव्हती, ओढाताण असली तरी शाळेची फी वैगेरे कमी असल्यामुळे दिवस धकत होते पण आता मध्यमवर्गीय माणसाचा तोंड दाबून बुक्क्याचा मार झालाय. पैसे नाहीत हे सांगताही येत नाही आणि आवश्यक ते खर्च करावेच लागतात. अशावेळी पैसा गाठीला असला तरीही ही जुनी पिढी परिस्थितीकडे कानाडोळा करते असं दिसून येतं. घरातील खर्च स्वतःहून उचलणारे खूप कमी आई वडील मी बघतो सध्या. आधी म्हंटल्याप्रमाणे आज्ञाधारक, आई वडिलांचा मान ठेवणारी मधली पिढी त्यांना मान वर करून काही बोलू शकत नाही. आमची संपत्ती तुमचीच आहे असा त्यांचा दावा असतो पण ती वेळेला नाही कामी आली तर काय उपयोगाची? पूर्वी नोकरीच्या ठिकाणी जायला यायला इतका वेळ जात नसे, आता शिंगरू मेलं हेलपाट्यानं अशी मुलांची अवस्था आहे पण जाऊन खरेदी करायला वेळ नसला तरी किराण्यापासून सोन्यापर्यंत सगळं ऑनलाईन मिळतं हे ज्येष्ठ लोकांना माहित असल्यामुळे वेळ नाही ही सबबसुद्धा ह्या मुलांना देता येत नाही आणि म्हणूनच घरातली एकही वस्तू ते आणत नाहीत . भाजीपाल्याची, मुलांना खेळवण्याची, त्यांच्याकडून श्लोक पाठ करून घेण्याची सुद्धा जबाबदारी त्यांना जास्तीचं काम वाटतं. त्याउलट आंम्ही असं केलं, तसं केलं ह्या गप्पा आणि सूचना ह्यात मात्र ते अग्रेसर असतात. हट्टीपणा तर वयानुसार बाय डिफौल्ट येतोच पण त्याला थोडं मुरड घालायलाही जमलं पाहिजे. मला ह्या पिढीबद्दल राग मुळीच नाही कारण त्यांनी त्यांच्या तरुणपणात खरंच एन्जॉय केलं नाही आणि आता निवांत क्षण मिळाल्यावर त्यांना ते जगावेसे वाटणं साहजिक आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जशी त्यांची बाजू समजून घेतली जाते तशी त्यांनीही मुलांची समजून घ्यावी. घरात (पे न करणारे )गेस्ट म्हणून न रहाता शक्य तितकं सांभाळून घ्यावं. सगळीच मुलं आई वडिलांना फसवणारी नसतात ( तसे सगळे आई वडिलही असे नसतात हे ही मी मान्य करतो) हे समजून वेळप्रसंगाला तुम्हीच त्यांच्या पाठीशी उभं रहावं. आगंतूक सल्ले देऊन खच्चीकरण करण्यापेक्षा थोडी मदत केली तर बरं होईल. आपलं घर, आपले नात नातू ह्यांच्याबरोबर आपण रहातो तेव्हा आनंद अनुभवतो ना मग त्यांच्यासाठी काही करायची वेळ आली की तुम्ही कसं केविलवाणं आयुष्य जगलात हे पाढे प्लिज नका वाचू. सगळेच आई वडील असे नाहीत आणि समजून घेणारेही बरेच आहेत ह्याचीही मला कल्पना आहे. पण असेही आई वडील असतात आणि त्यांच्याबद्दल कुणी मुलाने तक्रार केली तर तो देशद्रोही असल्यासारखं त्याला वागवू नका. आणि हो, असे आई वडील माहित असल्यास त्यांना समजून सांगण्याचा नक्की प्रयत्न करा किंवा हा लेख फॉरवर्ड करा. कधी कधी एक छोटीशी कृती जुन्या नात्याला नवा रंग देऊ शकते, हो ना? #आजची पिढी #आजची तरुण पिढी #आजची परिस्थिती 🙏 #आजची खरी परिस्थिती #आजची परिस्थिती
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
16 likes
12 shares