17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

#

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

- : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन :- १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामाची परिणती १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासना विरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतदेशात सामावून घेण्यात झाली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. तो दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांची राजवट संपली आणि भारतास स्वातंत्र्य मिळाले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला.१ मे १९६० पासून नविन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला. स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तीसंग्राम देखील लढला गेला. स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्तीसंग्राम चे अर्ध्वयू होते. स्वामी रामानंदतीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे मराठी चळवळकर्ते होते. स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक गोविंदभाई श्रॉफ यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत मोलाचे कार्य केले. मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा.... 🙏 #17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
1.3k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post