नवरात्री माहिती
🚩नवदुर्गेचे सातवे रूप 🚩  🚩 श्री कालरात्री माता  🚩 अस्त्र-शस्त्र : तलवार  🚩वाहन : गाढव 🚩मंत्र :या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।🙏🏻 दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते.यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारा पासून मिळणार्या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्यलोकांची प्राप्ती होते.🙏🏻🚩 🚩या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केसविस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात.🙏🏻 गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे. 🙏🏻 परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. 🙏🏻 देवीकालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारीआहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात.कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचेपूर्ण पालन केले पाहिजे. मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्या शुभ कामांची गणना केली जाऊशकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे 🙏🏻 🚩 श्री कालरात्री प्रसन्न 🙏🏻
#

नवरात्री माहिती

नवरात्री माहिती - Talhi माँ कालरात्रि - ShareChat
685 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
कॉपी पेस्ट पोस्ट श्री दुर्गा सप्तशती पठन क्लास पुणे नंदादीप / अखंड दीप: नवरात्री मध्ये अखंड दीप का प्रज्ज्वलित करतात? अखंड दीप म्हणजे सतत जळणारा दिवा. तेलाचा / तुपाचा दिवा तेज तत्त्वाचा प्रतिनिधित्व करते. नवरात्री काळात आणि इतर सणाच्या काळात वातावरणात तेज तत्त्वाचे प्रमाण अधिक आढळते. म्हणून च तेज तत्त्वाचे तरंग/ लहरी अखंड दिव्याकडे आकर्षित होतात. अखंड दिपामुळे या लहरी आपल्या घरात सतत प्रक्षेपित होतात. तसेच ब्रम्हांडात प्रक्षेपित झालेले शक्ती तत्त्व (आदिशक्ती चे तत्त्व) या दिव्याकडे खेचले जातात. या कारणाने घरातील/ मंदिरातील सात्त्विकता वाढते व अनिष्ट / नकारात्मक / वाईट शक्तींचा नायनाट होतो. म्हणून च 'अखंड दीप' याला नवरात्रीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीत तेज तत्त्वाचे / तेज लहरींचे आधिक्य वातावरणात असते, तेलाचा / तुपाचा दिवा तेज तत्त्वाचा प्रतिनिधित्त्व करत असल्याकारणाने, या लहरी अखंड दीप ज्या घरात असेल तिकडे तेज तत्त्व सतत प्रक्षेपित करून वलय निर्माण करतात. नंदादीप शक्यतो माती च्या दिव्या मध्येच लावावा. कारण मातीच्या दिव्यात सात्त्विक तरंग प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. या नंदादिपामुळे घरातील नकारात्मक उर्जेचा नायनाट होतो व घरात चैतन्य, उल्हास निर्माण होते. नंदादीप किंवा देवापुढे रोज लावला जाणारा दिवा हा तेलाचा किंवा तुपाचा असावा.गाईचे तूप हे सर्वात जास्त सात्त्विक असते , तिळाच्या तेल पण सात्त्विक असते. तेल रजोगुणी असते. यामध्ये गायीचे तूप सर्वात जास्त सात्त्विक व श्रेष्ठ असते.ज्यांना शक्य असेल त्यांनी तुपाचा दिवा नक्की लावावा. निदान तिळाच्या तेलाचा तरी लावावा. जर शक्य च नसेल तर साध्या तेलाचा दिवा लावावा.गायीच्या तुपाचा दिवा का लावावा हे आपण पुढच्या post मध्ये पाहू. अखंड दीप हा धार्मिक पूजेचा एक भाग आहे. जर वारा, दिव्याची काजळी किंवा दिव्यातील तेल संपून गेल्या कारणाने दिवा विझला तर देवी ची क्षमा मागून पुन्हा दीप प्रज्वलित करून शकता. या नंदादिपासमोर बसून देवी स्तुती/ सार्थ दुर्गा सप्तशती चे वाचन करणे/ देवी नामजप करणे इष्ट मानले जाते.
#

नवरात्री माहिती

नवरात्री माहिती - ShareChat
5.1k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post