💪जागतिक आरोग्य दिवस
#

💪जागतिक आरोग्य दिवस

🙏🌹ज्वारीची भाकरी🙏🌹 🙏🌹फिटनेस आणि योगा🙏🌹 ग्रामीण भागातील महत्वाचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी खाण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अॅमिनो अॅसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या असून यावर मात करण्यासाठी ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. ज्वारी शरीरातील इन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते. किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा. तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा नक्की समावेश करा #हेलो फिटनेस #बॉडी बिल्डिंग #योगज्ञान #हेल्थ टिप
111 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post