शुभेच्छा
अक्षता टाकत होता घाम पुसायच्या निमित्ताने डोळे पुसत होता //1// काळजाच्या तुकड्याला पाहुन आतुन तुटत होता " पोरीचं चांगलं झालं " हसुन म्हणत होता //2// अश्रुंचा बांध त्यानं अडवुन धरला होता डोळयासमोरुन लेकिचा चेहरा दुर होत नव्हता //3// लग्न लागल्यावर सारेच टाळ्या वाजवत होते एक तोच मात्र आसवांमध्ये भिजत होता //4// लहानमोठ्यांना तो हात जोडत होत " लेकिला जीव लावा माझ्या " डोळे भरून सांगत होता //5// सायंकाळी सारे पाहुणे खिचडीभात खात होते बापाचा हात न वाजणार्या फोनकडे जात होता //6// लेकिचा फोन येताच " मिरची तिखट आहे " म्हणत तांब्यानं पाणी पित होता अन डोळयातलं आसव मागं सारत होता.... सुगी संपल्यावर पाखरांसारखा एकेक पाहुणा परतत होता शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन " मला भुक नाही "असं बाप म्हणत होता //8// बेडरूममधील लेकीचं कपाट हळुच बाप उघडत होता तिने ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवत होता //9// तिथच बेडवर बसुन ओंजळीत तोंड धरून बाप आवाज न करणार्या धबधब्यासारखा फुटत होता //10// मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको " आई " होत होती वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरून काळजाच्या तुकड्याला आठवुन आसवांमध्ये भिजत होती.. //11// हे अस नात वडील आणि मुलगी.. म्हणून म्हणतो एक तरी लेक असावी. डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी.. ✍🏻✍🏻✍🏻 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 आज जागतिक कन्या दिन. ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
#

शुभेच्छा

शुभेच्छा - ShareChat
259 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post