📣मतदान जागृती
#

📣मतदान जागृती

99 जणांनी पाहिले
16 तासांपूर्वी
#

📣मतदान जागृती

🤔 *माझ्या 1 मताने काय फरक पडतो? एकदा वाचाच!* *LetsUp | Special* मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो? हा विचार लोकशाहीसाठी घातकच आहे. थेंबे-थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो हे लक्षात घ्यायला हवे. चला तर जाणून घेऊ अशी काही उदाहरणे ज्यामुळे आपलाल्या एका मताची किंमत कळेल. 1) *हिटलरला पहिला विरोध* : अ‍ॅडॉल्फ हिटलरने नाझी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर जेव्हा पक्षाच्या चेअरमनपदासाठी मतदान झालं तेव्हा पक्षातील 554 सदस्यांपैकी 553 सदस्यांनी हिटलरच्या बाजूने मतदान केलं तर एका सदस्याने हिटलरच्या विरोधात मतदान केले. या एका मताने जर्मनीत हिटलरला पहिला विरोध दर्शवला होता. 2) *सरकार कोसळले* : 1999मध्ये अटल बिहारी वाजपेयींचे 13 महिन्यांचे सरकार 1999मध्ये केवळ मताने कोसळले. त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता. याविरोधात 270 मतं पडली तर त्यांच्या बाजूने 269 मतं पडली. यामुळे त्यांचे सरकार कोसळले. 3) *एका मताने पराभव* : 2004 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ए. आर कृष्णमूर्ती यांना 40,751 मतं पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 40,752 मतं पडली. अशा पद्धतीने 1 मताने निवडणूक हरणारे ते पहिले उमेदवार ठरले. 4) *मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले* : 2009च्या विधानसभा निवडणुकीत सीपी जोशींना 62,215 मतं पडली त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कल्याण सिंंह चौहान यांना 62,216 मतं मिळाली. ते केवळ एका मताने पराभूत झाले. यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगले. 5) *पंतप्रधानपदाचा दावेदार* : 1979 मध्ये मार्गारेट थेचर ब्रिटनच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या. तेव्हाचे पंतप्रधान जेम्स कॅलहेन विरोधात त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या बाजूने 311 मतं पडली तर विरोधात 310 मतं पडली. या एका प्रस्तावामुळे कॅलहेन सरकार पडलं तर मार्गारेट थेचर पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदार झाल्या. 6) *अमेरिकेचे राष्ट्रपती* : 1876 मध्ये रुदरफोर्ड हेस हे अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. इलेक्टोरल मतांची मोजणी झाली तेव्हा रुदरफोर्ड यांना 185 तर टिन्डलरला 184 मत मिळाली होती. अवघ्या या एका मतामुळे रुदरफोर्ड अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. 🌐 *इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा* : https://goo.gl/boJ3U6 #📣मतदान जागृती
704 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post