🤝थँक्यू २०१८
#

🤝थँक्यू २०१८

निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे वजा अन बर्‍याच आठवणी जमा वयाचा पक्षी आभाळी दूर उडतो आहे .. हलकी हलकी उन्हे अन आक्रसलेल्या रात्री गेलेल्या क्षणांवर पडदा हळूहळू पडतो आहे मातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी हर मुद्द्यावर इतका का आडतो आहे अनुभवण्या पूर्वीच सुटून जात आहे आयुष्य एक एक क्षण जणू ढग बनून उडतो आहे.. तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. *माणसं भेटत गेली,मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!* *चला..* *या वर्षाचा हा अखेरचा आठवडा माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* *तुमच्या या मैत्रीची साथ* *यापुढे ही अशीच कायम असू द्या...* *नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...*
2.1k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post