Trending
18 सप्टेंबर '18 न्यूज

18 सप्टेंबर '18 न्यूज

#

18 सप्टेंबर '18 न्यूज

🔴👉 'धर्मादाय' रुग्णालयांना "धर्मादाय" शब्दाचे बंधन. ⭕ धर्मादाय आयुक्तांचे आदेश : पुण्यातील '56' रुग्णालया कडून अंमलबजावणी अपेक्षित. पुणे.- शहरातील रुबी, जहाँगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल अशी सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणाकडे बघत घाबरतात. त्यामुळेच धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी पुण्यातील 56 रुग्णालयांना त्यांच्या नावात "धर्मादाय" हा शब्द लावणे बंधनकारक केले आहे. मुळात धर्मादाय रुग्णालये असली तरी कॉर्पोरेट बनलेल्या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण मागे फिरतात. उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना "धर्मादाय" हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे. शहरातील अनेक मोठ्या रुग्णालया सह छोट्या अशा 56 रुग्णालयांचा धर्मादाय मध्ये समावेश आहे. त्यांच्या वर धर्मादाय कार्यालयाचे नियंत्रण आहे. म्हणूनच या बाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे हॉस्पिटल असोसिएशनला डिगे यांनी आदेश दिले आहेत. या 56 पैकी नऱ्हे येथील नवले रुग्णालयाने त्याची अंमलबजावणी केली असल्याची माहिती धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिली. राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू धर्मादाय शब्द लावण्या बाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारा मध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्ण पणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकाल द्वारे केली आहे. राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे "धर्मादाय" हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल. वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल. - शिवकुमार डिगे, आयुक्त, राज्य धर्मादाय विभाग.
584 views
1 months ago
#

18 सप्टेंबर '18 न्यूज

🔴👉 'बस्' एक "सॅरिडॉन".! 18 September 2018. सॅरिडॉन सह तीन गोळ्यांवर केंद्र सरकारने घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने 328 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन अर्थात एफडीसी औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या पैकी सॅरिडॉन, पेंड्रम व अन्य एका औषधा वरील बंदी हटवण्यात आली. केंद्रीय आरोग्य खात्याने काही दिवसा पूर्वीच 328 औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यात व्हिक्स ऍक्शन 500, सुमो, झीरोडॉल, झिंटॅप सह विविध प्रकारचे अँटिबायोटिक्स, पेन किलर्स, डायबेटिस तसेच हृदयरोग वरील औषधांचा समावेश आहे. यात बहुतांश एफडीसी म्हणजेच दोन पेक्षा अधिक औषधांनी मिळून बनवलेले औषध. या कॉम्बिनेशन औषधा वरून प्रदीर्घ काळा पासून वाद चालू आहे. ही औषधे विना परवानगी तसेच अशास्त्रीय पद्धतीने बनवण्यात येत असल्याचा आरोग्य तज्ञांचा दावा आहे. या प्रकरणात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सॅरिडॉन, पेंड्रम तसेच अन्य एका औषधा वरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला. हा आदेश देत असतानाच न्यायालयाने बंदी घालण्यात आलेल्या औषधा संदर्भातही केंद्रा कडून विस्तृत अहवाल मागवला आहे.
415 views
1 months ago
#

18 सप्टेंबर '18 न्यूज

_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांचे विलीनीकरण करून देशातील तिसरी मोठी बँक स्थापन होणार; अर्थ सचिव राजीव कुमार यांची माहिती ● नवी दिल्ली - सेरेडॉन, पिरीडॉन, डार्ट व आणखी एका औषधाच्या विक्रीला सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी ● नवी दिल्ली - सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लवकर कमी केल्या नाहीत तर आगामी निवडणुकीत आपण भाजपला साथ देणार नाही : योगगुरू रामदेव बाबा _*जाहिरातीसाठी संपर्क*_ : 9623388887 ● बर्लिन - जर्मनीतील लोअर सैक्सोनी शहरात जगातील पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी रेल्वे धावली ● आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तान सरकारने त्यांच्या ताफ्यातील 34 आलिशान गाडयांचा केला लिलाव, यात काही बुलेट प्रूफ गाडयांचा समावेश ● मुंबई - हायकोर्टाची पुढील सुनावणी होईपर्यंत प्रतीक्षा करा, मात्र मंडळांची सहमती असेल तर गणेशोत्सवात खुशाल डीजे वाजवा : राज ठाकरे (मनसे, अध्यक्ष) ● जेबीएलने भारतीय ग्राहकांसाठी स्पोर्टस् इयरफोन्सची मालिका केली सादर, यात चार मॉडेल्स उपलब्ध, यांचे मूल्य 1,599 ते 6,999 रूपयांच्या दरम्यान ● आशिया कप 2018, श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात; अफगाणिस्तानने 91 धावांनी उडवला धुव्वा ● भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने दिल्ली क्रिकेट संघटनेच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा, संघटनेच्या हितासाठी आपण राजीनामा देत असल्याचे सेहवागने म्हटले ● मुंबई - अभिनेत्री लीसा रेने जुळ्या मुलींना दिला जन्म, लीसाने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर या गोष्टी केल्या शेअर
1.8k views
2 months ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post