#

🍽महाशिवरात्री फराळ

*उपवासाची इडली* साहित्य : वरई तांदूळ चार कप हिरव्या मिरच्या ३/४ आले वाटण अर्धा चहाचा चमचा जिरे चहाचा अर्धा चमचा मीठ तूप खाण्याचा सोडा कृती : वरई निवडून आधीच चार तास भिजत ठेवा. पाणी जास्त वापरू नका. भिजवून ठेवलेली वरई. मिरच्यांचे तुकडे, जिरे मिक्सरमध्ये घाला. बारीक झाल्यावर बाहेर काढून त्यात मीठ, आले वाटण, हवे असल्यास थोडे दाण्याचे कूट टाका. कालवा. मग इडली पात्र घेऊन साच्यांना तुपाचा हात चोळा, इडली पिठात थोडासा सोडा टाका. पुन्हा कालवा. हे मिश्रण साच्यात थोडे थोडे ओता. इडली करतो त्याप्रमाणे वाफवून घ्या. थोड्या दह्यात मीठ, जिरेपूड टाकून कालवून याला लावून इडल्या खा. #🍽महाशिवरात्री फराळ
251 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

🍽महाशिवरात्री फराळ

आषाढी एकादशी स्पेशल --उपवासाच्या पदार्थांच्या संपूर्ण रेसिपीज घरातच झटपट बनवा उपवासाचे हे रुचकर पदार्थ, जाणून घ्या पाककृती. @ केळीचा रायता. @ * साहित्य :- 1.पिकलेली केळी:३ 2.वाळलेले बारीक खोबरे:१/२ कप 3.लिंबू:१ 4.वेनिला किंवा साधे दही:१ कप 5.बारीक कापलेले बदाम:१ टेबल स्पून. * कृती :- -वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा. -केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा.त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत. -त्या कापांमधे दही,खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा.झाला तुमचा रायता तयार. -तुम्ही हा रायता गार करून किंवा तसाच खाऊ शकता.तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता. -हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणून तसेच खाऊ शकता. #🍽महाशिवरात्री फराळ
245 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

🍽महाशिवरात्री फराळ

*उद्या आषाढी एकादशी* *आजचा विषय उपवासाचे पदार्थ* ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ ही उपवासांबद्दल वापरली जाणारी म्हण अगदी तंतोतंत पटणारी आहे. रोजच्या जेवणापेक्षा कितीतरी अधिक उष्मांक असलेले पदार्थ उपासाला खाल्ले जातात. काय खाल्ले तर चांगले? उपासाच्या दिवशी खाण्यासारखे काही आरोग्याला बरे असलेले पदार्थही आहेत. असे पदार्थ खाल्ल्यास वारंवार केलेले उपास करणाऱ्यांना ते त्रासदायक ठरणार नाहीत. शहाळ्याचे पाणी, दूध, मसाला दूध, मिल्कशेक, फळे, खजूर, अंजीर, बेदाणे, नुसताच एखादा उकडलेला बटाटा किंवा रताळे, राजगिऱ्याचा लाडू वा चिक्की, शेंगदाण्याचा गूळ घालून केलेला लाडू हे पदार्थ चांगले. अळकुडय़ांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व, पोटॅशियम व तंतूमय पदार्थ असतात. या अळकुडय़ा उकडून, कुस्करून त्यात मिरची व जिरे घालून टिक्की करता येतील. सुरण व कच्च्या केळ्याचे काप थोडय़ा तुपावर भाजून त्याला तिखट-मीठ लावून खाता येईल. हे पदार्थ पूर्ण जेवणाची भूक भागवणारे नसले तरी मधल्या वेळेसाठी ते चांगले. उपासाच्या जेवणाच्या थाळीत काय खाता येईल- उपासाच्या जेवणाच्या थाळीत वरीचे तांदूळ, शिंगाडय़ाच्या पिठाची आमटी, राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठ, काकडीची कोशिंबीर वा भोपळ्याचे भरीत जे लोक उपासाला सुरण खात असतील त्यांच्यासाठी सुरणाची भाजी हे पर्याय चांगले ठरतील. गोडात सफरचंद, डाळिंब, केळं, पेर यांचे गाईच्या दुधाच्या दह्य़ात केलेले रायते घेता येईल. साजुक तुपात केळ्यांचे काप, साखर, खोबरे आणि वेलची घालून केलेला हलवादेखील चविष्ट. *आषाढी एकादशीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ* *राजगिरा बटाटा थालीपीठ* साहित्य:- 2 बटाटे उकडून, राजगिरा पीठ 1 वाटी, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, साखर चवीप्रमाणे, तूप. कृती :- बटाटे सोलून, कुस्करून घ्यावेत. त्यात राजगिऱ्याचे पीठ, हिरवी मिरची, मीठ, साखर घालून पाणी घालावे व पीठ मळून घ्यावे. बटर पेपरला तूप लावून मध्यम आकाराचे थालीपीठ लावावे. मध्ये छिद्र पाडावे. तापल्या तव्यावर टाकावे. कडेने व मध्ये तूप घालून मंद गॅसवर थालीपीठ खमंग भाजावे व दह्यात कालवलेल्या दाण्याच्या चटणीबरोबर गरमागरम थालीपीठ द्यावे. *भरवा पराठा* साहित्य:- वाटीभर राजगिरा पीठ, 2 बटाटे उकडून, 2 चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, लिंबाचा रस, तूप, बेदाणे. कृती;- बटाटे सोलून किसावेत. त्यात राजगिरा पीठ व चिमूट मीठ घालून मळून ठेवावे. तुपाचा हात आवश्यपक तर मळताना लावावा व गोळा करावा. नारळ चव, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबाचा रस व बेदाण्याचे तुकडे घालून सारण बनवावे. भिजवलेल्या पिठातला गोळा घेऊन राजगिरा पिठावर पारी लाटावी. त्यात सारणाचा गोळा ठेवून बंद करावी. राजगिरा पिठावरच हलका पराठा लाटावा. हाताने हलके थापत मोठा करावा. चिरा पडतील त्या नीट करून घ्याव्यात. तापल्या तव्यावर दोन्हीकडून तूप सोडून खमंग भाजावा. दही, चटणीबरोबर सर्व्ह करावा. *इंदुरी उपवासाचे चॅट* साहित्य:- वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ एकत्र करावे. त्यात पाणी घालून शेवेच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात 2 चमचे गरम तूप घालावे. तूप लावून मळून घ्यावे. तापल्या तुपात मंद गॅसवर सोऱ्याने कढईत शेव पाडून खमंग तळावी. भिजलेला साबुदाणा दीड वाटी, मीठ, साखर, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर. कृती:- कढईत तूप घालून साबुदाणा टाकावा. मीठ, साखर, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मंद गॅसवर परतावे. कोथिंबीर घालावी. प्रथम शिंगाड्याची शेव, त्यावर उकडलेल्या बटाट्याचा कीस, दाण्याचे कूट, चिमूट मीठ, तयार साबुदाणा, बटाटा सली, ओले खोबरे, काजू, बेदाणे, 2 चमचे दही घालावे. वरून कोथिंबीर व चाट मसाला भुरभुरून इंदुरी उपवासाचे चॅट सर्व्ह करावे. *बटाटापूरी* साहित्य:- २ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, चिरून, १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप), चवीपुरते मिठ, तळण्यासाठी तेल कृती:- १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे. मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये. शिजवलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवावा. चव पाहुन, लागल्यास मिठ घालावे. मध्यम दिड इंचाचे गोळे करावे. तेल तापत ठेवावे. तेल तापले कि आच मिडीयम हायवर ठेवावी. एक प्लास्टिकचा जाड तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा हात लावावा. प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापावा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडावे. पातळ थापू नये, नाहीतर तेलात टाकल्यावर पुरी तुटते आणि विरघळते. पुरी तेलात टाकल्यावर ती झार्यााने अजिबात पलटू नये. पुरी पलटली ती हमखास तुटते. त्यावेळी झार्याटने अलगद तेलात बुडवावी म्हणजे वरच्या बाजूलाही छान ब्राऊन रंग येईल. तळलेल्या पुर्यात चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात. *वरी आणि अळिवाची खांडवी* साहित्य :- एक वाटी वरी तांदूळ, पाव वाटी तूप, चवीला मीठ, पाव वाटी अळीव, अर्धी वाटी ओले खोबरे, दीड वाटी गूळ, दोन वाट्या गरम पाणी, अर्धी वाटी गरम दूध, अर्धा चमचा जायफळपूड, 10-12 काजू. कृती :- अळीव दुधात दोन तास भिजत घालावेत. वरी तांदूळ धुवून घ्यावेत. एक मोठा चमचा तूप गरम करून त्यात तांदूळ परतावेत. मीठ आणि पाणी घालून शिजवावे. उरलेले तूप गरम करून त्यात काजू परतावेत. खोबरे, अळीव तसेच गूळ घालून शिजवावे. मिश्रण थोडे चिकट झाले, की शिजलेले वरी तांदूळ घालून ढवळावे. तांदूळ मोकळे होईपर्यंत ढवळावे, जायफळपूड घालावी. एका थाळीला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण घालून थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. *रताळी-साबूदाणा पुडिंग* साहित्य :- रताळ्याचा कीस दोन वाट्या, एक वाटी भिजलेला साबूदाणा, दीड वाटी दूध, एक वाटी साखर, एक मोठा चमचा तूप, अर्धा चमचा जायफळपूड, पाव वाटी काजूचे तुकडे. कृती :- तूप गरम करून त्यात रताळ्याचा कीस परतावा. त्यात दूध आणि साबूदाणा घालून शिजवावे, साखर घालावी. मिश्रण घट्ट झाले, की त्यात जायफळपूड घालून तुपाचा हात लावलेल्या भांड्यात ओतावे. काजूने सजवावे, फ्रीजमध्ये थंड करावे. *वरीच्या तांदळाचा पुलाव* साहित्य:- एक कप वरीचा तांदूळ, दोन टेबलस्पून तूप, दोन लवंगा, जिरे, दोन- तीन मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आले, साखर व मीठ चवीनुसार, अर्धा कप दाण्याचा कूट, दहा-बारा बेदाणे, अर्धा कप रताळ्याच्या फोडी, कोथिंबीर, दहा-बारा काजूचे तुकडे कृती- वऱ्याचे तांदूळ धुवून ठेवावेत. एका मोठय़ा भांडय़ात तूप गरम करून त्यात जिरे, लवंग, मिरचीचे तुकडे घालावेत. वरी तांदूळ घालून अंदाजे पाणी घालावे. त्यात बटाटय़ाच्या फोडी आणि रताळ्याच्या फोडी घालाव्यात. दाण्याचा कूट, मीठ आणि साखर घालून शिजवून घ्यावे. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू आणि बेदाणे परतून घ्यावेत. हे त्या वरीवर घालून छान मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालून छान वाफ द्यावी. टीप- सुरणाच्या फोडी, रताळ्याच्या फोडी वेगळ्या शिजवून तुपात थोडय़ा परतून शेवटी वऱ्याच्या तांदळात मिसळल्या तरी चालतात. *उपवासाचे गुलाबजाम* साहित्य- सव्वाशे ग्रॅम खवा, एक टेबलस्पून अरारूटचे पीठ, एक कप साखर, एक कप पाणी, चिमूटभर खायचा सोडा (उपवासाला चालत असेल तर), तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल घेतले तरीही चालेल. कृती- माव्यात अरारूटचे पीठ घालून चिमूटभर खायचा सोडा घाला. थोडे दूध घालून मळून घ्या. २०-३० मिनिटं गोळा तसाच ठेवा. नंतर पुन्हा मळून घ्या. छोटे गोळे करून तळून घ्या. साखरेच्या गरम एकतारी पाकात गार गुलाबजाम टाकावेत. *उपवासाचा बटाटावडा* साहित्य:- तीन बटाटे, शेंगदाणे तेल किंवा साजूक तूप, एक टीस्पून जिरे, एक टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा किंवा केळ्याचे पीठ अर्धा कप. कृती:- बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात जिऱ्याची फोडणी करावी. त्यात आलं मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाटा परतून घ्यावा. वर दिलेले कोणतेही पीठ घेऊन नेहमीसारखे बटाटेवडे तळावेत *उपवासाची कंदमुळांची टिक्की* साहित्य:- करांदे, अळ्कुड्या, सुरण / रताळे, , शिंगाडा, वरी तांदूळ, तेल, खिसलेलं खोबरं, जिरं, कापलेली मिरची, आल्याची पेस्ट, मीठ कृती:- सारी कंदमुळं कुकरमध्ये किंवा मोदक पात्रात शिजवून घ्यावीत. नंतर ती सारी कुस्ककरून त्यात आल्याची पेस्ट व मीरपूड मिसळावे. यामुळे पिष्टमय पदार्थामुळे पोटफुगीचा होणारा त्रास कमी होतो. त्यानंतर हळूहळू त्यात मिरची, खोबर, जिरं मिसळून त्याच्या लहान लहान टिक्की बनवाव्यात. वरीच्या तांदूळामध्ये ही टिक्की घोळवून तेलामध्ये शॅलोफ्राय करावीत. *उपवासाचा केक* साहित्यः- शिंगाड्याचे पीठ २०० ग्रॅम. साजूक तूप १०० मिली. पिठी साखर १०० ग्रॅम खजूर २० बिया बेकिंग पावडर एक टीस्पून खायचा सोडा अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून वेलची पावडर नेसकॉफी चार पाकिटे १ रू. वाली दीड वाटी दूध साधी साखर तीन टीस्पून बदाम सजावटीसाठी कृती:- अर्धी वाटी दूध गरम करावे. खजूराच्या बिया काढून या दुधात भिजत घालावे. शिंगाड्याचे पीठ, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, सोडा. वेलची पावडर एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे. खजूर दुधासकट मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावा. ओव्हन १८० डिग्रीवर पाच मिनिटे प्रिहीट करून घ्यावा. तूप, पिठी साखर, वाटलेला खजूर एकत्र परातीत घेऊन फेसावे. चाळलेले पीठ फेसलेल्या तुपात मिसळून फेसावे. लागेल तसे दूध मिसळावे. त्या मिश्रणात साधी साखर घालून नीट मिसळावी. यामुळे साखर असलेल्या ठिकाणी साखर विरघळून छान जाळी पडते. सजावटीसाठी बदामाचे काप घालावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओतावे. १८० डिग्रीवर पस्तीस मिनिटे ठेवावे. झाकण काढून सुरी घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पहावे. दहा मिनिटे गार करून जाळीवर केक काढावा. *उपवासाचा दहीवडा* साहित्य:- बटाटे-400 ग्राम शिंगाड्याचे पीठ-50 ग्राम काळे मीठ-स्वादानुसार काळी मिरी पावडर-1 छोटा चमचा कोथिंबीर दही-400 ग्राम तूप-दहीवडे तळण्यासाठी कृती- बटाटे उकडून,गार करून सालं काढून घ्या.बटाटे कुस्करून त्यात शिंगाड्याचे पीठ,काळे मीठ,काळी मिरी पावडर,कोथिंबीर घालून चांगले कालवून घ्या.दही चांगले फेटून त्यात काळे मीठ,चिमूट साखर घालून कालवा.कढईत तूप तापत ठेवा.सारण चिकट असल्यामुळे पाण्याने हात ओला करून वड्याचा आकार देऊन वडे कढईत तळायला टाका.सोनेरी होईपर्यंत चांगले तळून घ्या.वडे थोडे गार झाल्यावर दह्यात बुडवा.खायला देताना कोथिंबीर घाला. टीप-वरील पाककृती उत्तरेकडची.आपण त्यामध्ये बदल करू शकता,जसे काळ्या मिरीऐव💐जी हिरवी मिरची वाटून वा काळ्या मिठाऐवजी साधे मीठ वापरावे. #🍽महाशिवरात्री फराळ
238 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

🍽महाशिवरात्री फराळ

येणाऱ्या आषाढी एकादशी साठी !! उपासा साठी टिप्स /short cuts १-उपाशी राहा ! फक्त कोमट पाणी प्या ! चहा /कॉफी / दुध प्या /फळांचा ज्यूस प्या /उसाचा रस प्या २- फळे खा ३- वरीचा तांदूळ शिजवून -तूप मीठ घालून उपासाच्या लोणच्या बरोबर खा ( आज जेवा नाही म्हणत ) ४- वरीच्या तांदुळाचा काकडी /लालभोपळा घालून उपासाचा उपमा करून खा /गोडाचा शिरा करून खा ५-बटाटे /रताळी /कंद / फणसाच्या आठिळा-/भुईमुगाच्या शेंगा (मक्याची कणसे चालत असतील तुमच्या उपासाला तर )--शिजवून खा मीठ घालून शिजवालेत तर चव वाढेल ) ६- शेंगदाणे शिजवून ,भाजून खा --किवा दाणा कुट करून खा --दाणा कुट करताना मिक्सर मध्ये थोडे/किंचित मीठ आणि दोन चमचे साखर घालून कूट केलेत तर बकाणे पण मारता येतील आणि ते उपासाच्या पदार्थात पण वापरता येईल --या सोबत गुळ खाल्लात तर चीकीची आठवण येईल (वेलची पावडर स्वादा साठी घालून ) ७- वरीचे तांदूळ ३/४ तास भिजवून ,सोबत २/४ तास भिजवलेला साबुदाणा घालून मिक्सर वर दळून घ्या त्या मध्ये शिजवलेला बटाटा किसून घालून ते पण या भिजवलेल्या पीठान बरोबर परत मिक्सर मध्ये दळून घ्या -त्या मध्ये धिरडी/ डोसे घालण्या इतपत पाणी ,हिरव्या मिरच्यांचे तुकडे ,मीठ ,आले घालून मिक्सर मध्ये ब्लेंड करून घ्या --चव बघून तुपावर किवा शेंगदाण्याच्या तेला वर पातळ धिरडी घाला --आणि तूप /लोणी आणि किवा शेंगदाणा चटणी बरोबर गरम गरम खा ८- बटाटे किसून( न पिळता ) त्या मध्ये शेंगदाणा कुट ,आले मिरची पेस्ट ,जीरा पावडर , मीठ घालून तव्यावर तूप /शे.तेलावर थालीपीठ घाला दोन्ही बाजूने खरपूस भाजा आणि तूप /लोणी /उपासाची चटणी-लोणच्या बरोबर खा ९-बटाटे /रताळी सोलून , किसून त्याचा तूप/तेलावर कीस करा --जीरे घालून तूप/तेलाची हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करा -(चमचा भर साखर घाला--ऐच्छिक ) , त्या मध्ये बटाटा /रताळे चा कीस न पिळता या फोडणी मध्ये घाला , आणि परता --त्या मध्ये दाणा कुट घालून ,मीठ घालून ( आणि मिरची घातली नसेल तर लाल तिखट घालून ) झाकण ठेवून वाफ आणून शिजवा --नंतर ढवळा--खालचा वर करा --खाली खरपूस झाला (थोडा करपला ) कि उलटा /ढवळा -बटाटा /रताळी शिजली की प्लेट मध्ये घेऊन त्या वर नारळ कोथिंबीर घालून गरम गरम खा --साखर घातली असेल तर लिंबू पिळून घ्या १०- शिजलेला बटाटा /रताळी ( आडले दिवशी शिजवून फ्रीज मध्ये ठेवले असतील तर किसणे सोपे पडते वेळ पण वाचतो )-किसून स्मश करा त्या मध्ये भिजलेला साबुदाणा , मीठ ,जीरा पावडर /जिरे ,आले+हि.मिरची पेस्ट घालून एकत्र मळा-चव बघा -आणि तव्यावर तूप /शे.तेल घालून छोटी थालीपीठे करून दोन्ही बाजूने खमंग /खरपूस भाजा/परता किवा तेलात तुपात तळून साबुदाणे वडे बनवा ( जर थालीपिठाचे मिक्स फ्रीज मध्ये एक दोन तास ठेवलेत तर थालीपीठ किवा साबुदाणा वडे करताना बाहेरून लगेच चांगले तांबूस -ब्राउन -होतात--सगळे शिजलेले असल्या मुळे जास्त वेळ तळण्याची /परतण्याची जरुरी नाही पडत ) --नारळाची चटणी /शेंगदाणा चटणी /तूप /लोणी बरोबर खा ११- हिरव्या मिरच्याचा ठेचा -बहुउपयोगी --तिखट मिरच्या +कोथिम्बिर दांड्यान सह +आले + शेंगदाणे कच्चे /भाजलेले /कुट +मीठ +लिम्बुरस +जिरे /जीरा पावडर --असे एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक दळून घ्या थोडे पाणी घालून --ही चटणी /ठेचा --चटणी म्हणून दही /तूप//तेल /लोणी मिसळून किवा नुसती पण चांगली लागतेच पण उपासाचे पदार्थ (थालीपीठ,वडे,खिचडी,वरीचा उपमा ,शेंगदाण्याची उसळ ,भोपळ्याचे भरीत ,उपासाचे धिरडे ,बटाटा भाजी वगैरे अनके पदार्थ बनविताना उपयोगी पडते १२- साबुदाणा खिचडी --साबुदाणा धुवून भिजवा -वर अर्धा सेमी पाणी ठेवून --अर्ध्या तासाने एकदा नीट ढवळा आणि एकूण कमीत कमी ४/५ तास भिजवा --भिजवलेल्या साबुदाण्या मध्ये मीठ ,साखर ,जीरा पूड ,शेंगदाणा कुट ,थोडी लाल मिरची पावडर ,किसलेले आले घालून चांगले मिक्स करा -चव बघा -- शेंगदाणे तेल /तूप घालून जिरे घालून फोडणी करा ,मिरची चे तुकडे घाला --आणि वरचे साबुदाणा मिक्स घाला -ढवळा-आता दोन पर्याय --१)-झाकण ठेऊन त्याच भांड्यात एक वाफ आणून ढवळून s शिजवा --किवा --२) त्या भांड्यात न शिजवता ग्यास बंद करा --आणि ते फोडणी सह तयार ( रेडीमिक्स ) मिक्स थंड होऊ द्या आणि फ्रीज मध्ये बंद डब्यात /प्लास्टिक पिशवीत ठेवा --५/६ दिवस टिकते --आणि जेव्हा आणि जशी लागेल तशी मायक्रोवेव मध्ये दोन/तीन मिनिटे योग्य झाकण ठेऊन शिजवा --दर एक मिनिटाने माय्क्रोवेव माधुन्बाहेर काढून ढवळा आणि झाका - खिचडी वर नारळ कोथिम्बिर ,लीम्बुरस (ऐच्छिक ) घालून खा १३-शिजवलेल्या बटाटा /रताळे /किवा दोन्ही मिक्स --फोडी करून भाजी करा--तेल/तूप जिर्याची हिरवी मिरची /लाल तिखट ,मीठ , साखर ,शेंगदाणा कुट ,लिम्बुरस,कोथिम्बिर , खवलेला नारळ ---सगळे मिक्स करा -चव बघा- एक वाफ शिजवा -भांड्याच्या तळात खरपूस तांबडी झालेली चांगली लागते १४- फोडणी ची उपासाची मिरची --हिरव्या मिरच्यांचे अर्धा-पाउण सेमी तुकडे करा त्या मध्ये किसलेले आले ,शेंगदाणा कुट, मीठ ,लिम्बुरस,थोडी जीरा पावडर घालून अर्धा ते एक दिवस मुरवा --आणि त्या वर तेल /तुपाची जीरा फोडणी थंड करून घाला --मिक्स करा --फोडणीची उपासाची मिरची तयार --मिरच्या तिखट नसल्या तर लाल तिखट पावडर घाला १५-भिजवलेला साबुदाणा /भिजलेले अळीव/ शिजलेला बटाटा /शिजलेले रताळे /शिजलेला लाल भोपळा --या पैकी एक घेऊन दुध घालून साखर घालून उकळी आणा ,सुंठ / वेलची /जायफळ पावडर /केशर सिरप /बदाम काप वगैरे ऐच्छिक सजावट करा १६- शेंगदाणा +बटाटा उसळ --उसळ म्हणून किवा मिसळी साठी --कच्चे शेंगदाणे आणि सोललेले बटाटे मीठ घालून कुकर मध्ये चांगले शिजवा --त्याचे पाणी वेगळे करून ठेवा --तेल/तुपाच्या जीरा फोडणी मध्ये हिरवी मिरची तुकडे करून फोडणी करा आणि त्या मध्ये बटाटे फोडी आणि शेंगदाणे घालून परत ,वर वेगळे ठेवलेले पाणी घाला , साखर ,चव बघून मीठ ,आमसूल घालून एक उकळी आणा --जर उसळी ला घट्ट पणा हवा असेल तर वरील थोडे बटाटा +शेंगदाणे मिक्सर मध्ये पेस्ट करून घाला १७-फराळी मिसळ--वर लिहिलेले साबुदाणा रेडीमिक्स प्लेट मध्ये घ्या , त्यावर शेंगदाणा उसळ घाला ( पाणीदार ), त्या वर बटाटा शेव ,बारीक चिरलेली काकडी , वर चिंच गुळाची आंबट गोड चटणी आणि खवलेला नारळ आणि कोथिम्बिर आणि सोबत लिंबू फोड आणि वर लिहिलेली हिरवी चटणी किवा फोडणीची मिरची द्या ज्यांना तिखट पणा वाढवायचा असेल त्यांच्या साठी --सोबत आलू पापड /वेफर ,आलू शेव द्या सजावटी साठी १८- आलू पापड . शेंगदाणा चिक्की , खरे शेंगदाणे ,वेफर ,खरे काजूगर, बदाम ,खरे पिस्ते --याचा ऐपती प्रमाणे आणि तब्येती प्रमाणे मधे मधे खायला /चकणा (?) हवाच १९- बदाम मिल्क/खीर , कोकम सरबत ,लिंबू सरबत , उपासाची सोलकढी ( लसुन ,कढीपत्ता वगळून जिरे पावडर ,आले वापरून उपसा साठी खास ) --आणि महत्वाचे --शेवटी आले लिंबू रस मीठ किवा काळे मीठ घालून जीरा पावडर सह ---अजीर्णाची ढेकर आली नाही तर कसला उपास तुम्ही केलता --मग आले लीम्बुरस नको ???? 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐😊 अजित गद्रे यांची पोस्ट --संकलित #🍽महाशिवरात्री फराळ

232 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

🍽महाशिवरात्री फराळ

आषाढी एकादशी स्पेशल ---५ उपवासाच्या पदार्थांच्या संपूर्ण रेसिपीज घरातच झटपट बनवा उपवासाचे हे रुचकर पदार्थ, जाणून घ्या पाककृती. @ उपवासाचे घावन.@ * साहित्य :- १) १ वाटी वरी तांदूळ २) १ वाटी साबुदाणे ३) २ हिरव्या मिरच्या ४) २ चमचे नारळाचा चव ५) २ चमचे दाण्याचे कूट ६) १ चमचा जिरे ७) चवीपुरते मिठ ८) साजूक तूप. * कृती :- १) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे. २) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे. ३) नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी. गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे. #🍽महाशिवरात्री फराळ
205 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

🍽महाशिवरात्री फराळ

आषाढी एकादशी स्पेशल --उपवासाच्या पदार्थांच्या संपूर्ण रेसिपीज घरातच झटपट बनवा उपवासाचे हे रुचकर पदार्थ, जाणून घ्या पाककृती. @ वऱ्याचे तांदूळ व दाण्याची आमटी. / Varyache tandul wa danyachi amti. @ * वऱ्याचे तांदूळ व दाण्याचीआमटी :- ( सर्व सामग्री रेखांकित केली आहे. ) * तांदुळासाठी :- १. एक वाटी वऱ्याचे तांदूळ धुऊन घ्यावेत व त्यात ४ वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर उकळायला ठेवावेत. २. पाणी उकळून तांदुळापर्यंत आल्यावर गॅस बारीक करावा व झाकण ठेऊन पूर्ण पाणी अटेपर्यंत शिजवावे. * आमटी साठी :- १.) एक वाटी दाण्याचे कूट घेऊन त्यात लागेल तसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. २.) त्यात ३ वाट्या पाणी घालून थोड्यावेळ बाजूला ठेवावे. ३.) एका पातेल्यात २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून जिरे घालावेत. जिरे चुरचुरल्यावर त्यात ३/४ वाटी पाणी घालावे. ४.) त्यातच ४-५ वाळलेली आमसुले घालून उकळी आणावी व ३-४ मिनिटे उकळू द्यावे. ५.) आता वर तयार केलेली दाण्याच्या कुटाची पेस्ट त्यात घालावी व गॅस बारीक करावा. ६.) चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे व मधे मधे हलवत आमटीला उकळी आणावी. * वाढण्यासाठी :- गरम गरम वऱ्याचे तांदूळ दाण्याच्या आमटी बरोबर वाढावेत. सोबत उपासाचे गोड लोणचे, बटाट्याचे किंव्हा साबूदाण्याचे पापड, व बटाट्याची उपासाची भाजी ही वाढावी. #🍽महाशिवरात्री फराळ
213 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

🍽महाशिवरात्री फराळ

उपवासाची पाणीपुरी साहित्य: ३/४ कप वरीचा तांदूळ २ टेस्पून शाबुदाना पीठ चवीपुरते मिठ क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा) तळण्यासाठी तेल कृती: १) वरीचे तांदूळ, शाबुदाना पीठ आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट पिळून घ्यावा. भिजवलेला गोळा या कपड्याने १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावे. २) नंतर भिजवलेल्या पिठाचे करवंदाएवढे छोटे गोळे करावे आणि ते गोळे कोरडे पडू नयेत म्हणून ओल्या फडक्याखाली ठेवून द्यावे. ३) तेल मध्यम आचेवर तापवावे. गोळे लाटून पुर्‍या तळाव्यात. तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. मध्यम आचेवर तेल तापवावे. ४) पुर्‍या तळल्यावर जाळीच्या रॅकवर तेल निथळण्यास ठेवाव्यात. या रॅकच्या खाली एकादे ताट ठेवावे म्हणजे निथळलेले तेल ताटात जमा होईल. ५) पुर्‍या शक्यतो कुरकूरीत राहातील. पण जर राहिल्या नाहीत तर बेकिंग ट्रे मध्ये पुर्‍या पसरवाव्यात. ओव्हन २०० F (९३ C) वर प्रिहीट करावा, बेकिंग ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा आणि साधारण १० मिनीटे पुर्‍या बेक कराव्यात. बेक केल्यावर पुर्‍या नक्की कुरकूरीत राहतील. स्टफिंग साठी उकडलेला बटाटा त्यात मीठ हिरवी मिरची जिरे पेस्ट घालून कालवून घालावे. खारे शेंगादाणे. उपासाची शेव. पाणी पुराचे पाणी साहित्य: अर्धा कप चिंच ४-५ टेस्पून किसलेला गूळ १०-१२ खजुर ६-७ हिरव्या मिरच्या २ टिस्पून जिरेपूड मीठ कृती: १) चिंच पाण्यात भिजत घालून चिंचेचा कोळ करावा. खजूर ४-५ तास कोमट पाण्यात भिजवावे. बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावे. २) हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक कराव्या. ३) ४-५ भांडी पाण्यात चिंचेचा कोळ, गूळ, खजूराची पेस्ट, मिठ, मिरचीची चटणी, जिरेपूड सर्व मिक्स करावे. #🍽महाशिवरात्री फराळ
171 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post