#

timepaas jok

निबंध :- माझा आवडता पक्षी : --- " कोंबडी " मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खूप चविष्ट लागतात. कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझा अत्यंत आवडता पक्षी आहे. कोंबडीच्या नवऱ्याला कोंबडा असे म्हणतात. " कोंबडी " पासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला मात्र ते बनवता येत नाहीत, पण खाता मात्र येतात. " कोंबडी " शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्दा शाकाहारी होते. म्हणून मला त्यांचा सुध्दा आदर वाटतो. " कोंबडी"ला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेताच खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला " बर्ड फ्ल्यू " का, असेच काहीतरी इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खूप ताप यायचा. " कोंबडी "ला दगड मारल्यावर ती " पकाक " असा आवाज काढते. मला तो आवाज खूप आवडतो. नाना पाटेकरचा " पक् पक् पकाक् " असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण " जत्रा " नावाचा " कोंबडी " वर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते, असे मोठी माणसे सांगतात. पण मला मात्र सिनेमा पाहणे खुपच आवडते. पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना " कोंबडीचोर " म्हणत. चोरी करणे चूक व पाप आहे. चोरी केल्यावर आजकाल जेलमध्ये टाकतात. पुर्वी जेलमध्ये जाणे वाईट मानत व लोक त्यांचा तिरस्कार करत, पण आज जेलमध्ये जाणार्‍याला लोक नेता म्हणून निवडून देऊन " लोकसभा " नावाच्या ठिकाणी पाठवतात. तिथे गेल्याने माणूस खूप श्रीमंत होतो, असे माझे बाबा नेहमी सांगतात. " कोंबडी "चे अंडे बहूपयोगी आहे. " आओ, सिखाऊ तुम्हे अण्डे का फण्डा ", या गाण्यात त्याचे वर्णन आहे. त्या गाण्यात मोनिका बेदी आहे. तिला जेलमध्ये अंडी देत होते. अंडे संडे वा मंडेला खाल्ले पाहीजे. मंडेला काही लोकांचा उपास असतो. नेल्सन मंडेला उपास करायचे का हे मला माहित नाही. असो. देवीला " कोंबडी " चा बळी देतात. बळी देणे वाईट प्रथा आहे, असे परवा आमचे पवार मास्तर " कोंबडीवडे " खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भिंगांचा चष्मा लागला आहे. वाह्यात मुले त्यांना '" कोंबडी पकड " असे म्हणतात. " कोंबडी " ला पळत जाऊन पकडणे माणसाला हुशार बनवते. पुर्वी पहाटे " कोंबडा " आरवायचा. " कोंबडी " मात्र झोपून राहायची, आजकाल मात्र पहाटे " दोघेही " झोपलेली असतात, म्हणून मोबाईलच आरवतो ! 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓(forwardrd) #timepaas jok
118 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post