#

🗞20 फेब्रुवारी 19' न्यूज

🔴👉 'केरळ मध्ये पहिला रोबो' पोलीस कार्यरत, "उपनिरीक्षकाचा दर्जा" दिला. 20 February 2019...थिरुवनंतपूरम. देशभरातील अनेक क्षेत्रा मध्ये आज आपण रोबो कार्यरत असल्याचे पाहतो. आता हा रोबो आपले कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झाला असून केरळ मध्ये मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी बुधवारी पहिला मानवी रोबो पोलीस ‘केपी-बॉट’चे उद्घाटन केले. हा रोबो पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालया समोर उभा राहून आपले कर्तव्य बजावणार आहे. देशातील पहिला मानवी रोबो केपी-बॉट याला पोलीस उप निरीक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे. हिंदुस्थानातील हापहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे. माहिती गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे ही कामे हा रोबो पोलीस करणार आहे. तसेच तो मुख्यालयात आलेल्या लोकांचे स्वागतही करेल आणि त्यांच्या गरजे नुसार त्यांना निश्चित कार्यालयात जाण्याचे मार्गही सांगेल. या रोबोचे उद्घाटन केल्या नंतर मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, ‘पोलिसांच्या कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात हिंदुस्थानी राज्यांचे नेतृत्त्व करणारे केरळ पोलीस मानवी रोबोच्या वापराने ऐतिहासिक कामगिरी करत आहेत.’
1.5k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🗞20 फेब्रुवारी 19' न्यूज

🔴👉 'अरबी समुद्रातील' वाऱ्यांनी अडवली थंडी, गारव्यासाठी आणखी "तीन दिवस वाट" पाहावी लागणार. 20 February 2019...मुंबई. मुंबईतून थंडीने अजून काढता पाय घेतलेला नाही. आज मुंबईचा पारा 29 डिग्री सेल्सियस पर्यंत खाली आला, पण ही थंडी मुंबईकरांना जाणवलीच नाही. गेल्या तीन ते चार दिवसा पासून असेच वातावरण आहे. थंडी आहे तरीही तब्बल 94 टक्के आर्द्रतेमुळे मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्प युक्त वाऱ्यांनी उत्तरे कडून येणारी थंडी कवेत घेतल्यामुळे पारा घसरूनही वातावरण मात्र गरमच असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रातून वारे वाहत असल्यामुळे मुंबई सह कोकणचा पारा घसरल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के. श्रीवास्तव यांनी सांगितले, परंतु आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे थंडी जाणवत नसल्याचे ते म्हणाले. पुढच्या 48 तासांत मुंबईचा पारा आणखी घसरेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षरशः हुडहुडी भरेल इतकी थंडी सगळीकडे होती. अवघा महाराष्ट्र गारठला होता. हिमाचल मध्ये मोठया प्रमाणावर बर्फ वृष्टी झाल्यामुळे उत्तरे कडून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वाहत असल्यामुळे राज्यात गारठा वाढला होता, परंतु या वाऱ्यांना अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्प युक्त वाऱ्यांनी अडवली आहे. ♦राज्यातले तापमान. मुंबई - 29, डहाणू - 29, गोंदीया - 29, नागपूर - 30, संभाजी नगर - 33, नाशिक - 33, नांदेड - 35, परभणी - 35, पुणे - 36, बीड - 36. मध्य महाराष्ट्र, मराठ वाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. गोव्या सह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहाणार व मुंबईत आकाश निरभ्र राहणार.
1.2k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
#

🗞20 फेब्रुवारी 19' न्यूज

*न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *20 Feb 2019* 💁🏻‍♀सिरियात कारवाईदरम्यान पकडलेल्या इसिसच्या 800 दहशतवाद्यांना युरोपीय देशांनी घेऊन जावे आणि खटला चालवावा, अन्यथा त्यांना सिरियात सोडून देण्यात येईल, अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिला आहे. 💁🏻‍♂भारताने आत्मपरीक्षण करावे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहोम्मद फैझल यांनी म्हटले आहे. 💁🏻‍♀पुलवामात स्फोट घडवून जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा लष्कराने 100 तासांत खातमा केल्याचे लष्कराने आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. 💁🏻‍♂लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार फायनल; पुणे, नागपूरचा निर्णय दिल्लीत. 💁🏻‍♀भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची आज अभद्र युती झाली. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार अफजलखान उर्फ अमित शहा व अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार उंदीर ऊर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि लाचाराची युती आहे,'' अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी केली. 💁🏻‍♂नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात विस्थापित झालेल्या ग्रामस्थांनी पूर्ण मोबदला मिळेपर्यंत आपल्या जमिनी न सोडण्याचे आवाहन आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि उल्का महाजन यांनी केले. 💁🏻‍♀ठाणे-मुंबईसह परराज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस फार्मासिष्ट प्रमाणपत्र घोटाळ्यात पुन्हा काही औषध दुकानदारांना पोलिसांनी अटक केली आहे. महिन्याभरापूर्वी ठाणे पोलिसांनी या टोळीचा छडा लावून सहा जणांना अटक केली होती. 💁🏻‍♂शिवसेना-भाजपा युती झाल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'एकला चलो रे'ची सुरुवातीला घेतलेली भूमिका आता हवेतच विरली. 🚌 *महाराष्ट्र एसटी मध्ये 3606 जागांसाठी भरती पाहण्यासाठी* 👉🏻 https://bit.ly/2ULskam 💁🏻‍♂महाराष्ट्रातील आधार सुविधा केंद्र येत्या एक मार्चपर्यंत बंद ठेवण्याची सूचना "युनिक आयडेंटीफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडिया'कडून "आधार' केंद्र संचालकांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. 💁🏻‍♀कोल्हापूर - राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार आहे. 💁🏻‍♂कोल्हापूर - प्रवासी महिलेच्या पर्समधील चार तोळे दागिन्यांसह रोकड असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. आज भरदुपारी मध्यवर्ती बस स्थानकात ही घटना घडली. सविता शिवाजी कुंभार (वय ३६, तारदाळ ता. हातकणंगले) यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. 🏏दहा लाखांची बक्षीस रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना इराणी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या खेळाडूंनी मिळणारी पुरस्काराची संपूर्ण रक्कम पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कुटुंबीयांना देण्याची घोषणा केली. ही रक्कम दहा लाख रुपये आहे. हा निर्णय जाहीर करून विदर्भाच्या खेळाडूंनी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. 🧐 *या लोकांच्या मुले बद्दलले जग*👉🏻 https://bit.ly/2BBSX9y *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहितीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzK
1.7k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post