माझी शाळा
#

माझी शाळा

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 *सर्व पालकांना नम्र विनंती आता शाळा सुरू होताहेत तर आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवावे .काही मुद्दे खालील प्रमाणे* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *१)त्याच्या केसांची ठेवण त्याकडे लक्ष द्यावे .तो मनुष्य प्राणीच वाटावा* . *२)पायातील बूट दीडशे रुपयांपेक्षा जास्त किमतीचा नसावा* . *३)ड्रेस निवडताना विनाकारण जास्त पैसा घालू नका* *४)शालेय गणवेशा व्यतिरिक्त इतर ड्रेसवर जास्त खर्च करू नये*. *५)नोटबुक्स आणि पुस्तके योग्य तेवढीच खरेदी करावीत* . *६)दादा, भाऊ ,पाटील, पाटलांचा अमुक ,पाटलाचा टमुक इत्यादी सर्व उपाध्या घरीच ठेवून यायला सांगा* . *७)अँड्रॉइड मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा* . *८)मुलांचे चुकीचे लाड किंवा हट्ट पुरवू नका* . *९)तुमची क्षमता असेल तरी सुद्धा त्याला काही गोष्टींची उणीव जाणवून द्या* . *१*०)पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या* . *११)शाळेत पाठवताना मुलाकडे एकही रुपया ठेवू नका .आवश्यकता वाटल्यास शिक्षक तसा निरोप पाठवतील* . *१२)आपल्या मुलाला शिक्षित बनवण्या पेक्षा सुशिक्षित बनविण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा .दिवसातून किमान एक तास तरी आपल्या मुलांसाठी आवर्जून काढा* . *१३)मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करा* . *१४)आपली मुले विकृत विचारसरणीच्या सहवासात राहात असतील तर त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा .तुमची मुलं जास्ती जास्त वेळ तुमच्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा* . *१५)आधुनिक जगामध्ये राहत असतांना वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच कौटुंबिक आाणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्यासाठी मुलांना तयार करा .कुटुंबातील वाडवडिलांचा सर्वांनी आदराने सांभाळ केल्यास मुलांना तेच संस्कार मिळतात* . *१६)महिन्यातून किमान दोन वेळा आपल्या मुलाच्या शिक्षकांना जरूर भेट दया*. *१७)तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये परिवर्तन आणू शकत नाहीत याची नोंद घ्या* . *१८)मुलांना एकदा शाळेत पाठवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असे समजू नका*. *१९)आपल्या मुलाचा शिक्षक मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार देतो किंवा नाही यासाठी सतर्क राहा नसल्यास संबंधित बाब शिक्षकांच्या लक्षात आणून द्या*. *२०)शिक्षक देव नसून त्यालाही मार्गदर्शनाची गरज आहेच* . *२१)शिक्षकांचा योग्य मानसन्मान आपल्या पाल्यांना करायला सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या* *२२) मुलं चुकली असतील तर त्यांना समजावून सांगा* *२३) मुलाच्या बुध्दीमत्ते नुसार प्रगती होईल अवास्तव अपेक्षा ठेवू नका* 24) *इतर मुलांसोबत कधीच तुलना करू नका* 25) *किमान एक वेळच जेवण सोबत करा* *26) तुमच्या चर्चे मध्ये त्यांना सहभागी करून घ्या* *27) त्यांच्या मतांचा आदर करा* *28) तुमच्या कामाचा ताण त्यांच्यावर काढू नका* *29) मुलं तुमच्या सोबत त्यांच्या समस्या बोलतील अस वातावरण तयार करा* *30) नेहमी स्मितहास्य करून बोलत रहा* 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
166 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post