#😭जगप्रसिद्ध न्यायाधीश यांचे निधन💐
कोर्ट म्हटले की, सामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर तणाव, काळ्या कोटातील वकील आणि न्यायदानासाठी बसलेले न्यायाधीश आठवतात. न्यायाधीश म्हटले की, गंभीर भावमुद्रा असलेली व्यक्ती सामान्यपणे डोळ्यासमोर उभी राहते. पण या सर्व ठोकताळ्यांना तडा देत अमेरिकेतील रोड आयलंड या बेटावरील न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांनी जगभरात किर्ती मिळवली. न्यायदान करणे हे फक्त दंड देण्याचे काम नसून त्यातून करुणा, सहानुभूती दाखवली जाऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच ८८ व्या वर्षी निधन झालेल्या कॅप्रियो यांच्यासाठी जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे 💐
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🌐 देश- विदेश अपडेट्स #📢21 ऑगस्ट अपडेट्स🆕 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ