Trending
📹औरंगाबाद LIVE

📹औरंगाबाद LIVE

*कोरडा डोळा ,कोरडी विहीर* *कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो* *"चाल दोस्ता तुला "महाराष्ट्र" दाखवतो " ।।2।।* *वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,* *विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,* *पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो* *"चाल दोस्ता तुला "महाराष्ट्र" दाखवतो " ।।3।।* *या वर्षी वावरात, पिकांची शाळाच* *नाही डवरली,* *कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,* *अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो* *"चाल दोस्ता तुला "महाराष्ट्र" दाखवतो " ।।4।।* *बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी* *पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी* *दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो* *"चाल दोस्ता तुला "महाराष्ट्र" दाखवतो " ।।5।।* *असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,* *एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,* *जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो* *चाल दोस्ता तुला "महाराष्ट्र" दाखवतो ।।6।।* *योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस* *देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस* *माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो* *"चाल दोस्ता तुला "महाराष्ट्र" दाखवतो "* 🙏🙏
#

📹औरंगाबाद LIVE

📹औरंगाबाद LIVE - love OV  - ShareChat
548 views
9 hours ago
No more posts
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post