#

गणपती सजावट

गणपती बाप्पा कडे मागणे - साकडे गणेश चतुर्थी ला गणपती बाप्पा मखरात विराजले, पण आरती झाल्यानंतर जरा कंटाळले. हळूच म्हणाले उंदीर मामाला ..... भक्तांचे मागणे - साकडे एकून किटले कान, ह्याच साठी हे करतात का माझा मान? मी नवसाला पावतो असे ह्यांना वाटते, पण ह्यांच्याच प्रयत्नाने यश त्यांना मिळते. क्रेडीट मात्र मला देतात, आपल्याच प्रयत्नांना कमी लेखतात. सगळेच मागितलेले मी देत नाही, तरी मिळालेल्याची किमत ह्यांना नाही. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही पण मिळालेल्या गोष्टी वर प्रेम करावे हे ह्यांना कळत नाही. मागण्या एकूण बाप्पा लागले सांगू .... कि भक्तानो प्रामाणिक प्रयत्न करत राहा. मिळेल ते फळ स्वीकारत राहा. वयाच्या आधी आणि लायकी पेक्षा जास्त काही मिळत नसत..... पण आरती च्या आवाजात बाप्पा चे शब्द जात होते विरून, भक्त आपल्या गायकीत गेले होते रमून. बाप्पा दर वर्षी येत राहतील, भक्त मागणे - साकडे घालत राहतील, आरतीच्या आवाजात बाप्पाचे बोलणे विरून जाईल, नवस मात्र बोलले जातील, दर्शनच्या रांगा वाढत जातील, कर्म कांडात भक्त अडकत जातील, पण बाप्पा प्रतेयक माणसात लपला आहे हे मात्र विसरून जातील.
1.4k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

गणपती सजावट

🙏 _*अशी करा बाप्पाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त !*_ 💁‍♂ *पूजेचा शुभ मुहूर्त* बाप्पाच्या प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 08 मिनिटांनी सुरू होणार. त्यानंतर दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत तुम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करू शकता. 💁‍♂ *पूजेचे साहित्य -* हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी 10, खारीक 5, बदाम 5, हळकुंड 5, अक्रोड 5, ब्लाउज पीस 1, कापसाची वस्त्र, जानवी जोड 2, पंचा 1, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार 1, आंब्याच्या डहाळे, नारळ 2, फळे 5, विड्याची पाने 25, पंचामृत, कलश 2, ताम्हण 1, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर. 💁‍♂ *पूजेसाठी आवश्यक तयारी -* ▪ बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य ती आरास आदल्या दिवशीच करून घ्या. ▪ मूर्ती मखरात ठेवून पूजेचं सर्व साहित्य तयार ठेवा. ▪ प्रतिष्ठापना करताना देवाला सर्व गोष्टी उजव्या हातानेच अर्पण कराव्यात. 💁‍♂ *अशी करा मूर्तीची प्रतिष्ठापना -* ▪ पहिल्यांदा कपाळी टिळा लावावा. ▪ देवापुढे पान-सुपारी विडा ठेवावा. ▪ देवाला नमस्कार करून वडिलधाऱ्यांचे आशिर्वाद घेऊन पुजा सुरू करावी. ▪ पूजेसाठी बसताना आसनावर बसावे. ▪ हातात अक्षता घेऊन मनोभावे गणेशाचे नाव घेऊन अक्षता गणेशाच्या चरणी अर्पण कराव्यात. ▪ श्रीगणेशाचे नाव घेऊन कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी. त्याचबरोबर गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावी. ▪ गणपतीच्या नावावर दुर्वा किंवा फुलांनी पाणी शिंपडावे. ▪ गणपतीच्या चरणांवर गंध, फूल, अक्षता आणि पाणी अर्पण करावे. ▪ गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात. ▪ गणपतीच्या मूर्तीला गंध लावावे, हळद, शेंदूर, फुलं, हार, कंठ्या, दुर्वा वाहाव्यात. ▪ धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे. ▪ गणपतीला नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. ▪ देवासमोर पानाचा विडा ठेवून त्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावं आणि त्यावर फूल वाहावं. ▪ देवाच्या आरतीला सुरूवात करावी. #
2.5k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

गणपती सजावट

🙏 _*अशी करा बाप्पाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त !*_ 💁‍♂ *पूजेचा शुभ मुहूर्त* बाप्पाच्या प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 08 मिनिटांनी सुरू होणार. त्यानंतर दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत तुम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करू शकता. 💁‍♂ *पूजेचे साहित्य -* हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी 10, खारीक 5, बदाम 5, हळकुंड 5, अक्रोड 5, ब्लाउज पीस 1, कापसाची वस्त्र, जानवी जोड 2, पंचा 1, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार 1, आंब्याच्या डहाळे, नारळ 2, फळे 5, विड्याची पाने 25, पंचामृत, कलश 2, ताम्हण 1, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर. 💁‍♂ *पूजेसाठी आवश्यक तयारी -* ▪ बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य ती आरास आदल्या दिवशीच करून घ्या. ▪ मूर्ती मखरात ठेवून पूजेचं सर्व साहित्य तयार ठेवा. ▪ प्रतिष्ठापना करताना देवाला सर्व गोष्टी उजव्या हातानेच अर्पण कराव्यात. 💁‍♂ *अशी करा मूर्तीची प्रतिष्ठापना -* ▪ पहिल्यांदा कपाळी टिळा लावावा. ▪ देवापुढे पान-सुपारी विडा ठेवावा. ▪ देवाला नमस्कार करून वडिलधाऱ्यांचे आशिर्वाद घेऊन पुजा सुरू करावी. ▪ पूजेसाठी बसताना आसनावर बसावे. ▪ हातात अक्षता घेऊन मनोभावे गणेशाचे नाव घेऊन अक्षता गणेशाच्या चरणी अर्पण कराव्यात. ▪ श्रीगणेशाचे नाव घेऊन कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी. त्याचबरोबर गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावी. ▪ गणपतीच्या नावावर दुर्वा किंवा फुलांनी पाणी शिंपडावे. ▪ गणपतीच्या चरणांवर गंध, फूल, अक्षता आणि पाणी अर्पण करावे. ▪ गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात. ▪ गणपतीच्या मूर्तीला गंध लावावे, हळद, शेंदूर, फुलं, हार, कंठ्या, दुर्वा वाहाव्यात. ▪ धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे. ▪ गणपतीला नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. ▪ देवासमोर पानाचा विडा ठेवून त्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावं आणि त्यावर फूल वाहावं. ▪ देवाच्या आरतीला सुरूवात करा
8k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post