💥💫Mrs. Jyoti💫💥
3K views •
#🍟एकादशीचा फराळ🍠 #🚩आषाढी एकादशीच्या शुभेच्छा💐 #🚩आषाढी वारी 2025 #🌺विठुमाऊली #🙏ध्यानी मनी विठ्ठल
आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ.
उपवासाच्या दिवशी चविष्ट कुरकुरीत मेदू वडा कसा करायचा पाहूया रेसिपी.
साहित्य
भगर - १ कप
साबुदाणा - २ चमचे
पाणी - २ कप
मीठ - चवीनुसार
आले - हवे असल्यास
उकडलेला बटाटा - १
शेंगदाण्याचा कूट - ४ चमचे
दही - ३ चमचे
मिरची पेस्ट
कृती
1. सगळ्यात आधी मिक्सरमध्ये कपभर भगर आणि २ चमचे साबुदाणा घालून त्याचा पावडर तयार करा. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात दोन कप पाणी घाला.
2. कढईमध्ये मीठ आणि हवे असल्यास आले किसून घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर मिक्सरमध्ये वाटलेला पावडरची भरड घाला. ५ ते ६ मिनिटे शिजवून घ्या.
3. आता एका ताटात उकडलेला बटाटा किसून घ्या. त्यामध्ये दाण्याचा कूट, मिरचीची पेस्ट आणि दही घाला. आणि शिजवलेले पीठ घालून एकजीव करा. या मिश्रणाचे पीठ तयार करा.
4. हाताला तेल लावून त्याचे वडे तयार करा. मध्यभागी खड्डा करुन घ्या. जसे मेदू वडा तयार करताना करतो अगदी तसेच. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मेदू वडा तळा. तयार होईल कुरकुरीत क्रिस्पी उपवासाचा मेदू वडा.
23 likes
24 shares