23 नोव्हेंबर '18 न्यूज

23 नोव्हेंबर '18 न्यूज

👩 *मोजलेच नाही...* 👵 🏵🦋आयुष्याच्या तव्यावरती संसाराची पोळी भाजता भाजता हाताला किती बसले चटके मोजलेच नाही... 🖤 नवर्‍यासह लेकराबाळांचे करता करता मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा वाकले , मोजलेच नाही... 💚 जरा चुकले की घरच्यांची, बाहेरच्यांची किती बोलणी खाल्ली, काळजाला किती घरं पडली , मोजलेच नाही... ❤ याच्यासाठी त्याच्यासाठी आणखीही कुणासाठी जगता जगता , माझ्यासाठी मी अशी किती जगले , मोजलेच नाही... 💙 पाखरे गेली फारच दूर डोळा आहे श्रावणपूर पैशाचा हा नुसता धूर निसटून गेले कोणते सूर , मोजलेच नाही...🦋 🏵 *सर्व महिलांना समर्पित...*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#

23 नोव्हेंबर '18 न्यूज

23 नोव्हेंबर '18 न्यूज - भारतरत्न पुरस्काराचे खरे मानकरी सुर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता , जर महात्मा ज्योतिराव फुले जन्मले न सते तर खरंच स्त्रीच्या शिक्षणाचे समजले नसते . - ShareChat
375 views
2 months ago
#

23 नोव्हेंबर '18 न्यूज

आजच्या ठळक घटना :- १९२४: एडविन हबल यांनी देवयानी (ANDROMEDA) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले. १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले. १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला. १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला. १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला. १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान. आज जन्मलेल्या प्रमुख व्यक्ति :- ८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३) १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२) १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३) १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड) १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२) १९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११) १९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२) १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म. १९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म. १९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म. आज मृत्युमुखी झालेल्या प्रमुख व्यक्ति :- १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८) १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१) १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०) १९७९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११) १९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली) १९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन. २०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला  यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)
1.1k views
3 months ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post