#

🗞20 मार्च '19 न्यूज

🔴👉 'सामुद्रिक' शास्त्र : "केसांवरून" कळते व्यक्तिमत्त्व. 20 Feb 2019. फॅशनेबल दिसण्यासाठी आजची तरुणाई केसांचा छान वापर करू लागली आहे. केसांचे वेगवेगळे प्रकार करून ते आपले वेगळेपण दर्शवतात. पण सामुद्रिक शास्त्र नुसार केसांवरून व्यक्तिमत्त्व कळू शकते. ⭕ लांब केस. लांब केस असलेले तरुण विनम्र असतात. कल्पनेच्या विश्वात ते कमी रमतात. कल्पना सत्यात उतरणार असेल तरच ते त्यात गुंग होतात. ‘बडबड कमी आणि काम जास्त’ हा या तरुणांचा फंडा असतो. कोणत्याही बाबतीत विचार करूनच ते बोलतात. म्हणूनच पैशाची किंमत त्यांना खूप जास्त कळलेली असते. ⭕ कुरळे केस. कुरळे केस असलेले तरुण - तरुणी बहुतांश कला सक्त असतात असं म्हटलं जातं. त्यांना साहित्य आणि संगीत यात रस असतो. मात्र त्यांना पाहुणचार करायला खूप आवडतो. नशीब त्यांना बरेचदा साथ देते. इतरांच्या तुलनेत त्यांच्यात दूरदर्शीपणा जरा कमी असतो, पण ते ‘जगा आणि जगू द्या’ या विचारांचे असतात. ⭕ छोटे केस. छोटे केस असलेले तरुण मेहनती असतात. या लोकांमध्ये प्रेम आणि द्वेष हे दोन्ही दिसून येतं. आवश्यक तेथे खर्च करताना ते सढळ हाताने करतात, पण ज्या गोष्टी त्यांना पटत नाहीत तेथे ते खर्च करत नाहीत. ही माणसं विश्वासू असतात. ते स्वार्थी वाटले तरी ते महत्त्वाकांक्षी असतात. आपले हित पाहूनच ते पुढचे पाऊल टाकतात. ⭕ केसांविषयी आणखी… 👉 काळेभोर केस मानसिक स्वस्थतेचे आणि उच्च जीवन शैलीचे प्रतीक मानले जाते. 👉 पातळ केस उत्तम स्वभाव, उदारता, प्रेम, दया, मृदुता आणि संवेदनशीलता दर्शवतात. 👉 कुरळे केस असलेल्या तरुणांचे स्वास्थ्य आणि जीवन शैली चांगली असते. 👉 सरळ केस असणारे तरुण स्वाभिमानी, सरळ स्वभावाचे, सरळ मार्गी आणि स्पष्ट वक्ते असतात. 👉 सिल्की केस असणारे तरुण विनम्रता, सभ्यता, प्रेमळ, मित्रता आणि दयाळूपणा दर्शवतात.
1.1k जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post