6 ऑगस्ट'18 न्यूज

6 ऑगस्ट'18 न्यूज

#

6 ऑगस्ट'18 न्यूज

_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - 16 ऑगस्टला लष्कर- ए- तोयबा आणि जैश- ए- मुहम्मदचे दहशतवादी भारतीय सैन्याच्या तळांवर हल्ला करण्याची शक्यता ● नवी दिल्ली - मेहूल चोकशीच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अँटिग्वाच्या प्रशासनाला केली औपचारिक विनंती ● इंडोनेशिया - भूकंपानंतर इंडोनेशिया आणि आसपासच्या भागात त्सुनामी येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा _*जाहिरातीसाठी संपर्क*_ : 7875190190 ● गोवा - गोव्यामध्ये तब्बल 1 हजार 345 किलोचा केक बनवून नवीन विश्व विक्रम करण्यात आला, गोव्याच्या ट्रिनिटी ग्रुपने हा केक बनवत रेकॉर्ड केला ● मुंबई - मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार असून, तोपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात येईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ● नागपूर - 92 वे साहित्य संमेलन यंदा यवतमाळ येथे होणार हे आता स्पष्ट झाले, घोषणेची औपचारिकता बाकी ● टाटा टेलीसर्व्हीसेस कंपनीच्या भारती एयरटेलमध्ये विलयास मंजुरी, यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले ● दुबई - आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये विराट कोहली 934 गुणांसह पहिल्या स्थानी, विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला टाकले (929) मागे ● वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप; अंतिम फेरीत पी व्ही सिंधू पराभूत; स्पेनच्या कॅरोलिना मरीनने पटकावले विजेतेपद ● मुंबई - काजोलच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी 'हेलीकॉप्टर इला' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च #
2.4k views
6 months ago
#

6 ऑगस्ट'18 न्यूज

🗣 *न्युज कॅफे - DAILY UPDATE* 6 August 2018 JOIN LINK - https://bit.ly/2twWbYI 👇🏻 *मॉर्निग हेडलाईन्स* 👇🏻 ⛰इंडोनेशिया रविवारी (दिनांक ५) रात्री भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले. इंडोनेशियातील लोम्बोक बेटाला 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा दिला होता. 📲व्हॉट्स अ‍ॅपने भारतातील आपली टीम कार्यरत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्या परदेशातून असणारे नियंत्रण भारतीय टीमच्या हाती येणार आहे. तसेच चुकीच्या संदेशांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली. 💁🏻‍♀पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी विरोधकांनी ऐक्याचा कितीही आव आणला, तरी ते भाजपाला सत्तेपासून रोखू शकत नाहीत, असा दावा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केला. 💁🏼‍♂रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी त्यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हील कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्‍तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला न दिल्याने हे अटक वॉरंट जारी केले आहे. 🤷🏻‍♂एकनाथ खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार त्यांना मुख्यमंत्री बनण्याची मनीषा असेल. उद्या त्यांना पंतप्रधान व्हावे, असेही वाटेल, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला. 🚩मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जी सकारात्मक भूमिका घेतली, तिचे आम्ही स्वागत करतो. मात्र त्यांनी मराठा आरक्षण, मेगाभरतीला स्थगिती आदी मागण्यांबाबत लेखी निवेदन द्यावे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिली. 🚗सिंहगड रस्त्यावर 8 तासांत तब्बल 42 हजार वाहनांचे पार्किंगची संख्या नोंदविली गेली आहे. जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर दररोज 20 ते 25 हजार वाहने पार्किंग होत असल्याचे या सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. 🏏कर्णधार शाकीब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने अमेरिकेच्या लुडेरहील येथे झालेल्या दुसर्‍या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिज संघावर 12 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 🎯18 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या आशियाई स्पर्धेत यंदापासून तीन नव्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कुराश, जुजित्सू आणि पेनचाक सिलाट यांचा समावेश आहे. 𼀠 *पैसे काढताना एटीएम मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे? वाचा.. समजून घ्या.जाणून घ्या येथे क्लिक करून* https://bit.ly/2M9Ck9c *आता ताज्या बातम्या तसेच जॉब अपडेट्स, माहिती आणि मनोरंजन मिळवा तुमच्या WhatsApp वर,जॉईन होण्यासाठी आपल्या मोबाइलमधें हा 8669831818 हा नंबर सेव करून आपल्या व्हाट्सअँप नंबर वरून ह्या नंबर वरती आपले नाव , तालुका व जिल्ह्याचे नाव ह्या नंबर वरती पाठवा.*
2.8k views
6 months ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post