जागतिक हास्य दिन: हसा आणि हसवत राहा! ---------------------------- आज जागतिक हास्य दिन... सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला गेलाय. ताणतणाव आणि दगदग जगण्याचा हिस्सा झालाय. त्याचा परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्त्व समजून देण्यासाठीच जगभर हा दिवस साजरा केला जातो. जाणून घेवूया आरोग्याच्या दृष्टीनं हसण्याचे फायदे १. चेहरा टवटवीत ठेवण्‍यासाठी मदत चेहऱ्यावरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो. २. मिळून -मिसळून राहा एकटे राहण्यापेक्षा जे लोक मिळून- मिसळून राहतात. ते तीस टक्के जास्त हसतात. यासाठी सदैव मित्रांसोबत राहा. नवे मित्र तयार करा. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा. ३. प्रतिकार क्षमता आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकार क्षमता आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होण्‍यास मदत होते. याच्यामुळे विविध संसर्ग यापासून बचाव होतो. त्याचप्रमाणे अनेक आजारांना दूर ठेवण्याची शक्ती मिळते. ४. हृदयासाठी फायदेशीर एका संशोधनानुसार १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयगती तीव्र होते. तेवढ्या हृदयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे ठरते. ५. ऊर्जा वाढते हसत राहिल्याने शरीरातील ऊर्जेच्या स्तरावर चांगला परिणाम होतो. या ऊर्जेमुळे तुम्ही कामवार लक्ष केंद्रित करू शकता. तसेच या पद्धतीने कामाची गुणवत्तासुद्धा वाढवता येते. ६. सकारात्मक राहण्यास उपयुक्त हसतमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते. क्लोज रिलेशनशिप असणाऱ्यांमध्ये हास्य संबंध वृद्धिंगत करणारा घटक ठरतो. ७. तणावापासून मुक्ती हसल्यामुळे स्टड्ढेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात असतो. परिस्थिती कितीही तणावपूर्ण असू द्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते. ८. वजन नियंत्रणात वजन वाढण्यासाठी जास्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात. आनंदी राहिल्याने तणाव वाढत नाही. त्याप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहते. ९. दुखण्यावर नियंत्रण हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा घटक क्रियाशील झाल्याने विविध भागात होत असलेले दुखणे कमी होण्‍यास मदत होते. हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करत असतो. #🗞5 मे '19 न्यूज
#

🗞5 मे '19 न्यूज

🗞5 मे '19 न्यूज - हा आणि हवत हा . . . जागतिक 16स्य दिवस नवी यात f / NaviArthkranti - ShareChat
909 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

🗞5 मे '19 न्यूज

454 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

🗞5 मे '19 न्यूज

*न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *5 May 2019* 💁🏻‍♀सर्जिकल स्ट्राईक 'हिरो' लेफ्टनंट जनरल म्हणतात : 'मोदी सरकार येण्यापूर्वी सुद्धा सर्जिकल स्ट्राईक केले' 💁🏻‍♂सत्तेसाठी काँग्रेस, बसप, सपाकडून तत्त्वांना मुरड : मोदींकडून टीका 💁🏻‍♀चप्पल, बूट, अंडी, शाई, तिखट आणि थप्पड असा दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तब्बल 12 वेळा हल्ला झाला आहे. 💁🏻‍♂राफेल प्रकरणी गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केल्यास सुरक्षा दले, आण्विक कार्यक्रम, दहशतवादविरोधी उपायांशी संबंधित गुप्त माहिती सार्वजनिक होऊन, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेस धोका पोहोचू शकतो, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने शनिवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. 💁🏻‍♀मोदींना क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयोगात मतभेद 💁🏻‍♂J&K : दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची हत्या 💁🏻‍♀लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज, शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. या टप्प्यात सात राज्यांतील ५१ जागांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यासाठी ६ मे रोजी मतदान होणार आहे. 💁🏻‍♂बुरखा बंदीच्या वादानंतर संजय राऊत यांनी माघार घेतली. सामना अग्रलेखात बुरखा बंदीवर केवळ विश्लेषण मांडले असल्याचा खुलासा राऊत यांनी केला. 💁🏻‍♀रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वांद्रेस्थित पादचारी पुलाचे गर्डर पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेने अप जलद मार्ग आणि अप-डाऊन हार्बर मार्गावर ६ तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. 💁🏻‍♂ कोल्हापूर पाऊस लांबण्याची चिन्हे असल्याने, राधानगरी धरणातील पाणीसाठा राखीव ठेवण्याचा जलसंपदा विभागाचा विचार आहे. शेतीसाठी 25 मेनंतर आणखी एक आवर्तन देता येेईल, तसेच पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल, यादृष्टीने पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. 🏏हेटमायरची हिटिंग, करकीर मानची सेन्सेबल खेळी आणि उमेश यादवचा अखेरच्या षटकातला बदला या सर्व नाट्यामुळे हैदराबादच्या विजयाचा तोंडचा घास आरसीबीने हिरावून घेतला. 👉🏻 *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2019*👉🏻 http://bit.ly/2KPJpj5 *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहितीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzK #🗞5 मे '19 न्यूज
4.6k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post