एका_मुलाची_कथा ७ वी ला असताना ... मी माझ्या #बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो.. ती माझी"बेस्ट फ्रेंड"होती ....♥♥ मला ती खरच खूप #आवडायची I पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत आणि ते मला माहित होत.....♥♥♥ वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या #notes मागितल्या मी तिला दिल्या ती गेली तिला मला #सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही "माहित नाही का.....??"(( कॉलेग ला असताना माझ्या फोन वर #call आला... तिचा चा होता तो ... ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती आणि ती मला सांगत होती तिचा ज्याच्या वर #प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला... तिने मला #भेटायला बोलवलं होत मी तिला भेटायला गेलो....♥♥ मी तिच्या समोरचं बसलो होतो मी तिच्या #डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो... २ तास काही बोललो नाही .. मला तिला #सांगायचा होतं... मी तिच्या साठी आणि माझ्या साठी #चित्रपटाची तिकीट काढली....♥♥ पण तिने मला म्हटलं मी झोपते.. तिने म्हटलं"बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..." खूप वेळा शांत उभे होतो... मग मी निघालो... आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ... माहित नाही का??? . सिनियर वर्षाला आमच्या कॉलेज मध्ये #prom_night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एकाजोडी त जायचं ती माझ्या #locker जवळ आणि म्हणाली....♥♥ माझ्या सोबत कोणी नाही आहे... रु माझ्या सोबत येशील... माझ्या सोबत हि कोणी नव्हत... आम्ही दोघांनी"बेस्ट फ्रेंड्स"ह्या नात्याने जाण्याचा नित्नय घेतला ....♥♥ #PROM निघत ला ...♥♥ prom NIGHT ला सगळ काही नित झाल.. आम्ही दोघे निघालो... मी तिची #वाट पाहत होतो... ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक #smile दिली आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही.. पण मी खुश होतो... कि ती खुश आहे... #GRADUATION दय ला ... दिवसा मागून दिवस गेले... आठवडे लोटले किती तरी महिने गेले तिला काही बोलण्या आधीच #was_graduation दय आला ... मी तिला पाहिलं ... तीनेव #साडी नेसली होती....♥♥♥ खूप #छान दिसत होती.. माझा तिच्या वर एका तर्फी #प्रेम होत पण काय करणार तिचा जमत नव्हत ना आमची शेवरी ची भेट होणार होती... ♥♥♥ ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही... तिने माझ्या चेहर्या वरून हात फिरवला ... आणि म्हटली"आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."♥♥♥ बघाना गंमत आज हि जमल नाही #बोलायला काही वर्षांनी मी #लग्नात आलो होतो... आणि ते #लग्न होत तीच .. तिचा दुसर्या सोबत #लग्न ठरलं होत .. माझं प्रेम कधी व्यक्त चा नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेव्चा निभावल.... "तू आज हि माझ्या सोबत आहेस"असं ती म्हणाली डोळ्यातले #अश्रू लपवत हो म्हटले .. आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे.. खूप वर्षांनी... मी आमच्या शाळेत एकदा गेलो ... तिथे आमच्या वर्गातले सगळे जन आले होते... ती हि... तिथे प्रत्येकाने आपली लहान पाणी लिहिलेली पत्र ठेवली होती....♥♥♥  मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो... 7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... .♥♥♥ किती वेडा आहे हा मुलगा" #college_year:"आज हि मी त्याला खोत सांगितलं कि माझं ब्रेअक उप झालातरी हा वेडा माझ्या साठी आलं" #prom_night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे.... मी वाट बगहातेय,....♥ मला त्याला सांगावस वाटतंय कि माझा हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."♥♥♥ #graduation_year:"किती लाजाळू आहे हा साडीत पाहून नाही काही बोलला नाही" #marriage_day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील....."♥♥♥ . . . हे सगळं वाचल्या #नंतर तो तिथेच रडायला लागला... आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज #रडत होती....♥ कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला.. या मुळे जे काही होईल ते होऊ द्यापण प्रेम व्यक्त... करायला शिका.
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - ShareChat
49 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ( तो हातात गुलाब घेवून , चेहर्यावर क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो ) पुढे ... तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ? ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून जाईन . तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आणि तू मला झिडकारतेस , खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम करतेस ? ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची गरज असते? माझे तूझ्यावर प्रेम असते तर , तूला जायाला सांगीतले नसते तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस , ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत दिसते, तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण येते तो - मग रोज घरी जाताना मागे का वळ्तेस ? सारखं मागे वळुन मला का पहातेस? ती - मला मोकाट सोडलेल्या कुत्र्यांची खूप भिती वाटते म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान मी सहण करणार नाही , आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार नाही ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून आनंद झाला, पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा , आज वेळ कसा वाया गेला? तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते असलेली लिस्ट काढून ) ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार एक -दोघींचा तरी होकार मला नक्की मिळणार ह्या दिवसाचा एक =एक क्शण माझ्यासाठी अनमोल आहे तूझं माझ्यावर प्रेम आहे का? या सर्वांना विचारायचं आहे ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल, जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल ( दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू लागतात . इतक्यात तिला आवाज येतो व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच असतो. खुप राग आला असताना ही ती नकळत तो जवळ येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच तो तिच्या हातावर नावांची यादि असलेला कागद ठेवतो. ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ... ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त माझेच नाव आहे . मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे? तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत आहेस मी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं आहे . (चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू लागतो .. थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो .. व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ? तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने वळुन पाहतो. ती पुन्हा मोठ्याने ओरडत त्याला विचारते ... व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन -- आधी विचार करा, मग कृती करा...
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - Breakup Diary मेरी ज़िन्दगी मे रहोगे तुम उम्र भर अब चाहे प्यार बनके रहो या दर्द बनके । - ShareChat
147 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
आज प्रसेन वाफाळलेला चहा आणि कागद पेन घेऊन खूप दिवसांनी बसला होता. घरच्यांसाठी तो त्याच्या खोलीत काही तरी लिहित बसला होता, पण त्याच्यासाठी ते फक्त लिखाणं नव्हतं. मनात चाललेला कोलाहल शांत करण्याचं त्याच्याकडे असलेलं ते एकमेव माध्यम होतं. वेगवेगळ्या विषयांवरच्या डॉक्युमेंट्री पाहणं, मित्रांना एकत्र घेऊन शॉर्ट फिल्म्स करणं यात तो रमायचा. एकदा का शॉर्ट फिल्म करण्याचे विचार त्याच्या मनात सुरू झाले की मग बाकीच्या विचारांना त्याच्या मनात फारसं स्थान नसायचं. नोकरी ही फक्त पैसा कमवण्याचं एक माध्यम आहे त्याचा खरा आनंद लिखाण, डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म्स यातच दडलेला होता. प्रसेनच्या बहिणी त्याला अनेकदा विचारायच्याही की या सगळ्या गोष्टींचा तुला फायदा काय होतो. यावर त्याच्याकडे ठराविक असं उत्तर कधीच नसायचं. पण त्याला याची पूर्ण जाणीव होती की काही गोष्टी या जगण्यासाठी करायच्या असतात, तर काही गोष्टी जगणं सुकर करतात. तो करत असलेली नोकरी त्याचं आयुष्य सुकर करत होती. मात्र त्याच्या या छंदामुळे तो खरा जगत होता. नेहमीच हॅपी गो लकी असणारा प्रसेन आज मात्र थोडा खिन्न होता. नकोसा वाटणारा भूतकाळ अचानक समोर आल्यावर माणूस जसा बैचेन होतो तसंच काहीसं प्रसेनच्याबाबतीत आज घडलं होतं. आज ऑफिसमधून घरी येताना त्याला खूप वर्षांनी शाळेतला एक मित्र सौरभ भेटला होता. शाळेत असताना प्रसेन आणि सौरभ अगदी जिगरी दोस्त… इतक्या वर्षांनी सौरभला पाहून प्रसेन सुरूवातीला थोडा सुखावला. पण जसजशा त्यांच्या गप्पा रंगू लागल्या तसा प्रसेनला सौरभला भेटल्याचा आनंद ओसरू लागला. प्रसेनचं शिक्षण बॉईज स्कूलमधलं. त्यामुळे अर्थातच तिथल्या प्रत्येक मुलाला मुलींबद्दलचं कुतूहल होतंच. त्याला प्रसेनही काही वेगळा नव्हता. आपल्या शाळेतल्या जुन्या आठवणींना सौरभ उजाळा देत होता. ‘तेव्हा आपण कसे होतो यार…किती अफलातून गोष्टी केल्या आपण…’ आजही आपले शिक्षक आपल्या नावाने धसका घेत असतील. प्रसेननेही तोवर आपल्या शाळेतल्या दोन तीन आठवणींना उजाळा दिला होता. काहीही बोल पण प्रसेन तू तेव्हा फारच अबोल होतास आणि घाबरटही.. प्रसेनला सौरभचं दुसरं वाक्य फारसं पटलं नाही. मी मान्य करतो की मी अबोल होतो पण प्लीज मी काही घाबरट वगैरे नव्हतो. घाबरट होतास म्हणून तर तुला त्या क्लासमधल्या मुलीला प्रपोज करायला सांगितलं होतं. आठवतंय ना… आपली तशी पैजही लागली होती. हो आठवतंय ना चांगलंच आठवतंय… तीन मुलींपैकी जी त्यातल्या त्यात सामान्य मुलगी असेल आणि जी सहज मला हो बोलेल अशाच मुलीला आपण हेरलं होतं. ‘तिचं नाव काय होतं रे?’ सौरभने अगदी सहज प्रश्न विचारला. प्रसेनने मोठा उसासा टाकत रुपाली असं उत्तर दिलं. प्रसेनच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सौरभच्या नजरेतून काही सुटले नाहीत. कदाचित आपण प्रसेनच्या दुखत्या जखमेवर मीठ चोळलं असं त्याला थोडा वेळ वाटलं पण प्रसेनने लगेच विषय बदलत ते जाऊ दे बाकी बोल.. जॉब कसा सुरू आहे? काय करतोस सध्या? लग्न वैगेरे काही केलंस की नाही? अशा भूतकाळातून वास्तवाकडे आणणाऱ्या प्रश्नांचा भडीमार केला. प्रसेनचा स्वभाव तसा समजायला कठीण होता. वरकरणी उत्साही, आनंदी वाटणारा प्रसेन आतून समजायला तेवढाच कठीण होता. असं असलं तरी व्यक्तिमत्वाचे दोन मुखवटे घेऊन तो कधी फिरला नाही. जे आहे ते समोर आहे याच मताने त्याला त्या त्या वेळी जे योग्य वाटलं त्याने ते केलं. काहीवेळा यशस्वी झाला तर काही वेळा अयशस्वी. पण आपल्या प्रत्येक चुकांमधून तो शिकत गेला. रुपालीसोबत केलेली चूकही त्याला फार वर्षांनंतर कळली. सौरभशी वरकरणी गप्पा मारुन झाल्यावर पुन्हा कधीतरी निवांत भेटू या प्रॉमिसवर दोघंही आपआपल्या घरी जायला निघाले. प्रसेन घरी आला आणि त्याने सरळ आईला चहा द्यायला सांगितला. आईचा चहा होईपर्यंत तो स्वतःचं आवरून बसला होता. हातात खूप दिवसांनी कागद- पेन घेतलं होतं. आज त्याच्या मनात पुन्हा एकदा खूप काही भरुन आलं होतं जे त्याला कागदावर उतरवायचं होतं. रुपालीचा विषय अगदी सहज निघाला खरा, पण त्यामुळे भूतकाळातल्या अनेक व्यक्ती, परिस्थिती आणि जीवघेणे विचार मनात फेर धरू लागले होते. रुपाली आणि प्रसेन दोघंही समवयस्कर. शाळेतल्या मित्रांसोबत लागलेल्या पैजेमुळे त्याने जोशात येऊन रुपालीला प्रपोज केलं होतं. रुपालीसाठी मात्र ते पहिलं प्रेम होतं. आपल्याला कोणीतरी प्रपोज केलं या भावनेनेच ती सुखावली होती. त्या अल्लड वयात काय चूक काय बरोबर याची फारशी माहिती नसते आणि माहिती असले तरी त्याची पर्वा कोणीही करत नाही. प्रसेनच्या बाबतीतही काहीसं असंच झालं. मित्रासोबत लावलेल्या पैजेची झिंग इतकी होती की त्याने दुसरा काही विचार केलाच नाही. रुपालीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार त्याचक्षणी केला होता. पण प्रसेनच्या आयुष्यातली अडचण त्यामुळे वाढली होती. मुलीला प्रपोज करेपर्यंतचीच पैज लागल्यामुळे आता पुढे काय करायचं असा प्रश्न त्याला पडला. त्याचे रुपालीवर प्रेम नव्हतेच. पण तिला हा सगळा प्रकार सांगितला तर वाईट वाटेल या विचाराने त्याने काही दिवस जाऊ दिले. या दिवसांमध्ये तो तिला कधी फोन करायचा तर कधी रुपालीच त्याला फोन करायची. रुपाली जेव्हा प्रसेनला भेटण्यासाठी बोलवायची तेव्हा तो काही ना काही कारण सांगून भेटणं टाळायचा. काही दिवस रुपालीला तो खरंच अभ्यासात बिझी असेल असे वाटले पण नंतर मात्र तो तिला टाळत असल्याचे तिच्या लक्षात आले. एक दिवस रुपालीने त्याला भेटून तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना? असा थेट प्रश्न विचारला. यावेळी मात्र प्रसेनने खरे सांगायचे ठरवले आणि त्याने रुपालीला जे आतापर्यंत घडले ते सर्व सांगितले. प्रसेनकडून त्या सर्व गोष्टी ऐकताना रुपालीच्या पायाखालची जमीन हलत होती. आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम केले, त्याचे आपल्यावर कधीच प्रेम नव्हते. या विचारानेच तिला घेरी आली. प्रसेनने घडल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागितली आणि तिथून निघून गेला. त्यानंतर आजतागायत ते दोघं एकमेकांना कधीच भेटले नाही. शाळेतले दिवस संपून कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. बी.कॉमच्या फर्स्ट इयरला असताना उनाड मुलांच्या यादीत प्रसेनचं नाव अग्रणी होतं. कॉलेजच्या कॅण्टिनमध्ये सुतळी बॉम्ब ठेवणे, एकाचवेळी दोन- तीन ठिकाणी सुतळी बॉम्ब लावणे, रस्त्यावर स्टंट करणे, कॉलेज कॅम्पसमध्ये मारामारी करणे यासाठीच प्रसेन ओळखला जायचा. या सगळ्या गोष्टींसाठीच त्याला वेळ पुरायचा नाही तर मुलींकडे पाहणंच सोडा. पण या सगळ्यात त्याला एक खूप साधी सरळ आणि अभ्यासू मुलगी आवडू लागली होती. स्नेहाच्या प्रेमात तो कसा पडला हे त्याचं तोही सांगू शकत नव्हता. पण त्याला स्नेहा आवडू लागली होती हे मात्र नक्की. स्नेहा आणि प्रसेन एकाच वर्गात होते. तिच्याशी मैत्री करावी म्हणून कित्येक महिन्यांनी प्रसेनने वर्गाचं तोंड पाहिलं होतं. आता तो तिच्यासाठी का होईना वर्गात बसू लागला होता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. तिच्या सांगण्यावरुन तो अभ्यासही करु लागला होता. त्याचं कट्ट्यावर बसणं कमी झालं असलं तरी पूर्णपणे बंद झालं नव्हतं. स्नेहालाही त्याचा तो रावडी स्वभावच आवडला होता. चांगल्या मुलींना नेहमी रावडी मुलं का पसंत पडतात हा प्रश्न त्यांच्या आजूबाजूच्यांनाही पडला होता. पण या दोघांना त्याची काही पर्वा नव्हती. हे दोघंही एकमेकांची कंपनी चांगली एन्जॉय करत होते. बघता बघता फायनल इयरची परीक्षाही जवळ येऊन ठेपली होती. परीक्षेला काही महिनेच राहिले असताना प्रसेनला काविळ आणि टायफॉईड झाला. या आजारात प्रसेन फारच कृष झाला होता. डॉक्टरांनी त्याला अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. १५-२० दिवस रुग्णालयात गेल्यामुळे तो फार थकला होता. घरी आल्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे त्याने ठरवले. या दरम्यान त्याने स्नेहाला अनेक फोन करण्याचा आणि तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण स्नेहाने त्याच्या कोणत्याच कॉलचे उत्तर दिले नाही. आपण असे नेमके काय केले की स्नेहा रागवली? या प्रश्नाचे उत्तर तो आपल्यापरिने शोधत होता. पण तरीही त्याला त्याचे उत्तर मिळाले नव्हते. प्रिलिमदरम्यान त्याने स्नेहाला कॉलेज बाहेर गाठले आणि थेट विचारले, ‘नक्की झालंय काय स्नेहा? तू अशी का वागतेस?… किमान मला तरी कळू दे…’ यावर स्नेहाने ‘मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. प्लीज मला कॉल करु नकोस मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करु दे…’ अभ्यासाच्या ताणामुळे कदाचित स्नेहा अशी वागत असेल असे प्रसेनला सुरूवातीला वाटले. परीक्षेनंतर सगळे नीट होईल या आशेवर त्याने प्रिलीमचा तो वेळ जाऊ दिला. प्रिलीमनंतर त्याने पुन्हा तिला तेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याकडून कोणतंच उत्तर आलं नाही. प्रिलिमनंतर कॉलेजमध्ये जाणं बंद होत असल्यामुळे त्यांचं भेटणंही बंद झालं होतं. प्रसेनच्या मनातून तिचा विचार काही केल्या जात नव्हता. असं काय झालं असेल की ती माझा एवढा राग करायला लागली या प्रश्नाचं उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हतं. आधीच आजारपणामुळे तब्येत खराब झाली असताना त्याच्या डोक्यात सतत हेच विचार असल्यामुळे त्याची तब्येत जास्तीच खराब होत चालली होती. पर्यायाने त्याला बी.कॉमच्या फायनल एक्झामला मुकावे लागले होते. प्रिलिमच्या परीक्षेनंतर स्नेहा त्याला कधीच भेटली नाही आणि तिने अचानक बोलणं का टाकलं? तिने काहीही कारण न देता नातं का तोडलं? या प्रश्नांची उत्तरं त्याला शेवटपर्यंत मिळाली नाहीत. स्नेहाच्या त्या धक्यातून सावरायला प्रसेनला बरीच वर्षे लागली. या मधल्या काळात त्याच्या आणखीही गर्लफ्रेण्ड झाल्या पण आजही स्नेहा तसं का वागली हा प्रश्न त्याला सतावतो. प्रसेन आजही स्नेहामध्येच गुंतला आहे असं नाही. तो केव्हाच पुढे निघून गेला पण निरुत्तर राहिलेले प्रश्न जास्त सतावतात. प्रसेनच्या बाबतीतही तेच झाले. रुपालीचे मन दुखावले तेव्हा प्रसेनला त्या गोष्टीची जाणीव नव्हती. पण जेव्हा स्वतःचेच मन दुखले गेले तेव्हा त्याला रुपालीचं दुःख सर्वार्थाने कळलं. त्यामुळेच जेव्हा जेव्हा रुपालीचा विषय निघतो तेव्हा प्रसेनला स्नेहा आठवते आणि स्नेहाची आठवण झाली की रुपालीचं ते दुःख त्याच्या समोर येतं. –
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - ShareChat
161 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
का स्त्रीचं स्त्रीला समजून घेत नाही? प्रत्येक महिलेने दोन मिनिट काढून हा लेख वाचा का नाही समजू शकत एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला..? मी प्रमिला लग्न होऊन जवळ जवळ सहा महिनेच झाले होते. पण खरं सांगू हे सहा महिने सहा वर्ष झाल्यासारखे वाटतात. खरं तर माझा नवरा देवमाणूस माझ्यासाठी ही आणि घरातल्यांसाठी ही पण कधी कधी वाटतं इतकं देवपण नसावं माणसाच्या अंगी, स्वतःच्या बायकोला त्रास होत असताना कोणता नवरा गप्प बसेल ? त्यांना माहीत आहे मी खुश नाही पण तरीही कधीही काहीच बोलत नाहीत. प्रेमाने वागायला म्हणायला कसलीच कमतरता नाही सतत समजून घेतात. नवरा मी, सासरा, सासू आणि नणंद असे पाच माणसे आम्ही घरात. सासरे ही कधी काहीच बोलत नसायचे माझ्याशी चांगले वागायचे पन सासू आणि नणंद नेहमी माझ्यावर टोमणे मारायचे, भांडण उकरून काढायचे, आयत मिळणाऱया जेवणाला ही नेहमी नाव ठेवत असत. मिठच कमी झालंय ते तिखटच जास्त झालंय, तुझ्या आईने काही शिकवलं नाही वाटत? हे आणि असे बरेच काही रोजच्या रोज नको ते शब्द ऐकायला खूप त्रास होतो. पण खरं तर माझ्या माहेरची नेहमी बोलायचे प्रमिला खरंच ग सुगरण आहेस आणि खरं होत ते माझ्या हाताला खूप चव, मात्र माझ्या सासू आणि नंदेला घालून पाडून बोल्याशीवाय राहावतच नसे तरीही मी ते सगळं सहन करत..! कारण मला संसार सुरळीत करायचा होता. वाटायचं होईल कधीतरी सगळ ठीक, कोणाच्या घरात नसतात भांडणं ? होतात ना संसार, मग माझही होईल पण आता पाणी डोक्यावरून जायला लागले आहे घरातल्या साठी इतकं मरमर मरते पण त्याची त्यांना काहीच किंमत नाही नवऱ्याला सांगून काही उपयोग नाही आणि किती वेळा सांगायचे माहेरच्यांना सांगून त्यांना त्रास द्यायचा नाही. आई-बाबांनी खूप केले माझ्यासाठी आणि त्यांना अजून त्रास देणे मला पटत नाही. हो माझा रंग थोडा सावळा आहे पण माझ्या नवऱ्याला याच काहीच वाटत नाही पण नंदन सासू मात्र यावरून रोज टोमणे देत असतात काळ्या पायाची अवदसा…! खरंतर मी या घरात पाऊल ठेवले तेव्हा माझ्या नवऱ्याच प्रमोशन झालं होतं. आमच्या गावा कडील प्रॉपर्टीची केस कोर्टात जिंकलो होतो पण तरीही तेव्हाही माझ्या सासूने आणि नंदेने माझ्यावर नाकच मुरडले होते..! पीरियड आल्यावर माहेरची खुप आठवण येते रडायला येतं, खूप त्रास होतो पण माझ्या त्रासाशी यांना काहीच घेणंदेणं नसतं..! पण नंदन कधी आजारी पडली की, तिच्यासाठी मात्र सासुबाई माझ्यावर खेकसत असतात हे कर ते कर माझ्या पोरीसाठी… मुलीची सरबराई चालू असते मात्र सुनेला दुश्मना सारखी वागवतात, पण का ? यांची मुलगी नाही का दुसऱ्या घराची सून होणार माझ्या सारखी वागणूक तुमच्या मुलीला मिळाली तर तुमच्या काळजाला चरे नाही का पडणार?.. आणि हेच खरे झाले नंदेच लग्न झालं आणि महिन्याभरातच सामान घेऊन घरी परत आली खूप दिवस झाले परत जायच नाव नाही..सासरच्यांनी कित्तेक समजूत घातली पण ही हट्टाला पेटली, माहेरी लाडाने वाढलेली. तिचे लाड सासरी मात्र चालत नव्हते कसे चालतील शेवटी ते सासर होते पण खरंतर भांडनाला जबाबदार होती तिचं.. पण तरीही तिला तिची चुकी वाटत नव्हती..! नणंद इथूनच गळायला तयार नव्हती आणि तशी तिने इथे राहायला माझी नाय नव्हती पण बसल्या ठिकाणाहून फक्त ऑर्डर सोडतात या मायलेकी मी ही दिवसभर दमते ना? मग तरी किती सहन करनार चार महिन्यांची गरोदर होती दिवसभर यांची उठाठेव करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून अगदी थकायला व्हायचं खूप अशक्तपणा आला होता. एक दिवस हॉस्पिटलमध्ये मैत्रीण भेटली जवळची माझ्या मनातल्या भावना तिला मी सांगितल्या ती मला म्हणाली प्रमिला तू आता एकटी नाहीस तुझ्या पोटात बाळ आहे. त्याच्यासाठी तुला खंबीर व्हायला हव तुला भांडण करायला नाही सांगत? पण जे चुकीचा आहे ते चुकीचे आहे तू या सगळ्याचा विरोध करायचा ऐकून घ्यायच नाही स्वतःच्या करिता आणि तुझ्या बाळा करिता तुला खंबीर व्हायला हवा बोलायला, प्रत्युत्तर द्यायला हवं. हिम्मत दाखव सगळ ठीक होईल. त्या संध्याकाळी हॉस्पिटलमधून घरी आले नंदन आणि सासूबाई हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या होत्या काहीबाही खात टीव्ही बघत होत्या. इतक्यात नदेने चहाची मागणी केली. मलाही खूप थकल्यासारखे झाले होते शेवटी मीही म्हटले मी चहा ठेवणार नाही मला आराम करायचा आहे. इतक्यात सासूबाईंनी कांगावा केला खूप वाईट साईट बोलल्या मीही प्रत्युत्तर केलं ऐकून घेतले नाही म्हटलं मी काही घरातली मोलकरीण नाही सगळे काम करायला मलाही जीव आहे माझ्या पोटात ही एक जीव आहे.. आणि हो भरपूर दिवस झाले आता मुलीला पाठवा सासरी सासरची लोक चांगले आहेत दहा वेळा न्यायला येऊन सुद्धा तुम्ही पाठवत नाही पुढे जाऊन तुमच्याच मुली चा संसार उध्वस्त होईल आणि त्याला तुम्ही जबाबदार ठरणार. त्यासाठी तुम्ही तिला मनात वाईट साईट भरण्यापेक्षा चांगला सल्ला द्या आणि सासरी पाठवा. हे ऐकून नंदेचा तीळ पापड झाला रागात उठली बॅग भरली आणि सासरची वाट धरली. सासूबाईंनी हे सगळं माझ्या नवऱ्याला सांगितलं पण नेहमीप्रमाणे ते काहीच बोलले नाहीत. आता मात्र मला कळले बोलायला हवं बोलल्याशिवाय समोरच्याला आपली किंमत कळत नाही आता भांडणं होत नाहीत ननंद सासरी असते, तिलाही समजले असेल कदाचित सासर काय असते..!सासुबाई बऱ्यापैकी वागतात. मुलगा झाला आता मात्र घरात आणखीनच आनंदाचं वातावरन पसरलंय आता नणंद येते पण चार दिवस पाहुनी म्हणून हक्काने राहते आणि निघून जाते. मी ही सगळ्यांचं आता आनंदाने करते कारण आता करताना आपलेपणा वाटतो. खरं तर मला तेव्हा वाटतं होत मी उलट उत्तर नको करायला पण जर का आपण प्रतिउत्तर नाही केलं तर आपण चुकीचे आहोत असाच सगळ्याचा भ्रम होतो आणि मी चुकीचे नव्हते हे मला दाखऊन द्यायचे होते माझा संसार मोडायचा नव्हता तर खुळवायचा होता कदाचित मी सहन करत राहिले असते तर माझा संसार मोडला असता , प्रत्येक स्त्री मध्ये संसार सावरून ठेवायची तेवढीच हिम्मत असली पाहिजे जेवढी आपली बाजू मांडण्याची आपल अस्तित्व दाखऊन देण्याची. 🙏✒️✍️
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - ShareChat
139 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
लपंडाव.... त्याचा मेसेज आल्यापासून अवंती अस्वस्थ होती. आज असा अचानक मेसेज का केला त्याने ? इतक्या दिवसांनंतर ? सगळं घडून गेल्यावर ?...आणि बोलायचं तरी काय ?...'अवंती......' धस्सं होणारी हाक ऐकून तिच्या हातून मोबाईल खाली पडला. "काय झालं ?" तिने घाबरतच विचारलं. ''तुला साध्या माझ्या वस्तू शोधून नाही ठेवता येत ? किती वेळा सांगितलंय तुला की माझं सगळं आटपायच्या आत मला सगळ्या वस्तू समोर लागतात. कधी अक्कल येणार आहे तुला? की तुझा बाप आणून देणार आहे सगळं ? केदार तिच्यावर ओरडत होता. ' माझ्या वडिलांबद्दल बोलायची तुला काहीच गरज नाही. मी कितीही, काहीही केलं तरी तुला ते नाहीच आवडत.' ती अडखळत म्हणाली. तिच्याकडे जळजळीत नजरेने बघत बॅग उचलून तो निघून गेला. मेसेज चा विचार करत अवंती बसून होती. 'okay . send me the address and time ' तिने टाईप केलं, क्षणभर थांबून send चं बटन दाबलं. लगेच निखिलचा मेसेज आला. मेसेज मधून त्याचा आनंद चांगलाच कळत होता. त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी त्याने तिला बोलावलं होतं. इतक्या दिवसांत याला सुचलं नाही भेटायचं ?...की आता कोणी उरलं नाही ?.. नाही नाही .. काय विचार करतेय मी हा ? त्याचं आणि माझं दृष्ट लागेल असंच नातं होतं . कितीही दुरावे आले , भांडणं झाली तरी एकमेकांपासून विलग होणं केवळ अशक्य..! तरीही त्या विशिष्ट दिवसांची आठवण झाली की मनात चर्र्रर्र्र्र होतं . कालचक्र फिरवून त्या गोष्टी थोड्या बदलत्या आल्या असत्या तर.? विचार झटकून अवंतीने कामे आटपायला सुरुवात केली. आज तिने तिची ठेवणीतली साडी नेसायला काढली होती. त्याचा आवडता रंग ! मोकळे सोडलेले केस आणि मध्येच कानामागून डोकावणारी नाजुकशी बट ! का त्याला आवडेल अशी तयार होतेय मी ? असा बालिशपणा का सुचतोय मला ?.. त्यालाही असंच काहीसं सुचत असेल का आज ? छे.. शक्य नाही ते . निघताना सवयीप्रमाणे निखिलने फोन केला, तशी स्वतःला एकवार आरशात निरखून अवंती निघाली. रस्ता पळत होता तसे असंख्य विचार तिच्या मनात पिंगा घालत होते . आज बोलणार तरी काय आपण ? कितीही वाटलं तरी त्याला काही कळू द्यायचं नाही आपल्याबद्दल , ती स्वतःलाच बजावत होती. पण ते तितकं सोप्पंही नाही . माझ्या नुसत्या हो -नाही वरून सुद्धा त्याला अचूक अंदाज येतो . विचार करता -करता ती भूतकाळात पोचली.आजही तिला तो दिवस स्मरणात होता. कोणाच्यातरी मार्फत ओळख होऊन नंतर दोघांची घट्ट मैत्री झालेली आणि हळू हळू या मैत्रीचं रूपांतर अजून कशात तरी होऊ लागलेलं . परस्परांचे विचार, सामंजस्य इतके जुळायचे की ते वेगळेपणानं व्यक्त करावंच लागलं नाही. तरीही त्याचा काहीसा लहरी स्वभाव तिला बऱ्याचदा अस्वस्थ करायचा . काही गोष्टी कळून सुद्धा स्वतःलाच फसवायला त्याला फार आवडायचं .आपल्या प्रेमाची कबुली देऊनही तो काहीसा दूर-दूर च राहत होता. " आपली वेव्हलेंग्थ इतकी जुळते निखिल, तू का मान्य नाही करत आहेस हे ?" अवंतीने गंभीरपणे विचारलं. " आहेत काही गोष्टी , नाही सांगू शकत मी तुला. " " आपल्यांत असं कधीपासून झालं की आपण काही सांगू शकत नाही ? आपल्यात किती आणि कसा फ्रॅंकनेस आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. " " उगाच नको. त्यामुळे काही गोष्टी कायमच्या बिघडतील. माझ्या घरीसुद्धा....." " तुझ्या घरी मैत्रिणी चालत नाहीत असे तुझ्या घरचे अजिबात नाही आहेत हे मला पक्कं माहीत आहे आणि आपण एकत्र आलो तर काय बिघडणार आहे ? कितीही काहीही झालं तरी आपण त्यातून मार्ग काढू शकतो, त्याचा आपल्यावर कधी परिणाम होत नाही हे माहित आहे ना तुला ? मग हा कसला भलता हट्ट घेऊन बसला आहेस ? तुझ्या घरी सगळ्यांना माहित आहे मी. माझ्याजवळ मनातल्या सगळ्या गोष्टी बोलला आहेस तू. म्हणजे माझ्यासमोर एक वागणं आणि घरी दुसरंच. हा कुठला विचित्र हट्ट धरून बसला आहेस ?" अवंती भरभरून बोलत होती. " नाही गं. ते शक्य नाही आहे कधीच. काय असेल ते मनातून काढून टाक. मूर्खासारखं वागते आहेस तू. " " लग्नासाठी एकमेकांमधलं बॉण्डिंग जास्त महत्वाचं असतं आणि ते आपल्यात किती भक्कम आहे हे मी तुला सांगायची गरज नाही. जे मला माझ्या जोडीदाराकडून अपेक्षित आहे तेच तुलाही अपेक्षित आहे. अजून कसला विचार करतोयस तू ? " " हे बघ , या बाबतीत आपले मार्ग वेगळे आहेत. यापुढे कमीच बोलूया आपण एकमेकांशी. लांब राहिलो की विसरशील सगळं." " सगळं तू का ठरवतोयस ? का असा हट्टीपणा करतोयस तू ? " " लग्नाला बोलव हं तुझ्या. नक्की येईन मी." ऐकूनही न ऐकल्या सारखं करत तिला तिथेच सोडून निखिल निघून गेला. स्वतःचं रडू आवरत अवंती जागीच उभी होती. पुढे सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे बदलत गेल्या होत्या... 'मॅडम, ६० रुपये झाले .' रिक्षावाल्याच्या आवाजाने ती भानावर आली. पैसे देऊन ती रेस्टोरंटच्या दिशेने चालू लागली. तिची वाट बघत निखिल उभा होता. आजही त्याची वेळ पाळायची सवय गेली नव्हती, तिला किंचित हसू आलं. ' Hi अवंती ! long time . कशी आहेस तू ?' असं विचारत त्याने हलकेच तिला मिठी मारली. ' मी बरी आहे. तू कसा आहेस?' किंचित दूर जात अवंतीने विचारलं. ' मी मजेत गं. मी टेबल बुक केलंय. आपण आत बसुया, चल.' त्याच्याबरोबर चालताना तिने रेस्टोरंट न्याहाळलं. काहीच बदललं नव्हतं. अगदी सगळं तसंच, काल पाहिल्यासारखं !... आम्हीही दोघे पूर्वीसारखे झालो तर..? पुन्हा एकदा एक बोचणारा विचार तिच्या मनात येऊन गेला. अवंती काहीशी अवघडली होती, कशी सुरुवात करावी याचा विचार करत बसली होती. तेवढ्यात निखिलने बोलायला सुरुवात केली. मग ? कसं चाललंय तुझं ? छान दिसते आहेस आज !.. प्रतिसादापुरतं अवंती नुसतंच हसली. ' इतकी सहज तयार होशील भेटायला असं वाटलं नव्हतं मला. याचा अर्थ सगळे संभ्रम, सगळ्या मूर्ख कल्पना गेल्या म्हणायच्या.' स्वतःच्याच वाक्यावर खुश होऊन निखिल हसत होता. ' हो. मी मूर्ख होते आणि आता उत्तम चाललंय माझं. तुझ्यासारखीच मजेत आहे मी.' ' मग, सांगत होतो तुला. वेडी नुसती. नंतर काही संपर्कच ठेवला नाहीस, एवढा राग ?. आपल्यात कधीपासून एवढा राग, द्वेष निर्माण झाला गं.?' ' छे रे. तुझ्यावर कसला राग ? गैरसमज तुझा सगळा... तुझी बायको कशी आहे ?' विषय टाळायला अवंतीने विचारलं. ' ती पण मजेत. अगं खूप open minded आहे ती आणि माझ्या खवैय्येगिरीची हौस सुद्धा उत्तम भागवते! पुढच्याच आठवड्यात आम्ही सगळी मित्र-मंडळी मिळून टूर वर जाणार आहोत. फिरायला खूप आवडतं तिला '....... हे सगळे गुण माझ्यात नव्हते ? कितीवेळा याला आवडतं म्हणून मी हौसेने डबा करून नेत होते , हे कधी दिसलं नाही याला ? माझ्याजवळ वाट्टेल त्या गप्पा मारू शकत होता म्हणजे मी सुद्धा open minded होते हे जाणवलं नाही ?... निखिल, तुला कधीच कळलं नाही का रे ?..... तिच्या मनातल्या विचारांना ती सावरत होती. ' काय घेशील ?' त्याच्या प्रश्नाने ती भानावर आली. ' कॉफी फक्त.' ' चूप. कॉफी काय ? तुझा चॉईस मला माहित आहे. थांब, मी देतो ऑर्डर.' माझा चॉईस जर तुला खरंच माहित असता तर असा वागलाच नसतास, ती मनातल्या मनात त्याच्याशी संवाद साधत होती. ' तुझी खूप आठवण आली म्हणून म्हंटलं आपणच पुढाकार घेऊया तुझ्याशी बोलायला. अगं बोल ना, अशी गप्प-गप्प का आहेस ?' ' नाही रे. गप्प कुठे आहे मी? ऐकतेय तुझं सगळं.' ते दोघं बोलत असताना अचानक केदार त्यांच्या टेबलापाशी येऊन उभा राहिला. त्याच्या ऑफिस मधल्या मित्रांबरोबर नेमकी त्याच रेस्टोरंटमध्ये त्याची पार्टी होती आणि अर्थातच ही गोष्ट अवंतीला माहित नव्हती. आपल्या बायकोला एका पुरुषाबरोबर पाहून रागानेच तो तिकडे आला होता. 'केदार तू?' अवंतीने दचकून विचारलं, कारण तिच्या नवऱ्याला ती चांगलीच ओळखून होती. ' एवढं दचकायला काय झालं? चोरी पकडल्यासारखं.' केदारने तिच्याकडे रोखून पाहिलं. ' नाही तसं नाही... थांब, तुझी ओळख करून देते, हा माझा मित्र निखिल.' केदारच्या आवाजतला खवचटपणा तिला कळला होता. 'तुला लाज नाही वाटत ? माझ्या अपरोक्ष एका परपुरुषाला भेटतेस तू ? कधीपासून चाललंय तुमचं हे ? मला तरी सांगायचंस ना मग, तुम्हाला मोकळीक मिळावी म्हणून मीच घराबाहेर गेलो असतो.' तिच्या बोलण्याकडे लक्षही न देता केदार संतापाने तिच्याशी बोलत होता. ' काय बोलतोयस तू हे ? शुद्धीत आहेस का ? हा माझा सगळ्यात जुना मित्र आहे आणि आज बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलो आहोत. या व्यतिरिक्त , तुला वाटतंय तसं काहीही नाही आहे.' ' गप्प बस. नवऱ्याच्या मागे हे धंदे बरे सुचतात गं तुला.' इतका वेळ नवरा-बायकोच्या मध्ये बोलायचं नाही म्हणून गप्प उभ्या असलेल्या निखिलने अखेर मौन सोडलं. ' ऐक केदार , तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे....' ' ए, तू तर काहीच बोलू नकोस. माझ्या बायकोशी कसं वागायचं हे मी ठरवेन, तुला मध्ये बोलायची गरज नाही.' त्याचं वाक्यही पुरं होऊ न देता , त्याला मध्येच तोडत केदार त्याच्यावर खेकसला. ' काय तमाशा चालवलायस तू केदार? निदान आपण कुठे उभे आहोत हे तरी बघ.' अवंती समजुतीच्या स्वरात म्हणाली. 'त्याची बाजू घेऊन मला सांगते आहेस ?....थोबाड बंद कर आधी...' तिच्या ध्यानी-मनी नसतानाच केदारने तिच्यावर हात उगारला. क्षणात ती खाली बसली. फणकाऱ्यात केदार तिथून निघून गेला. आसपासची बघत असलेली लोकं पाहून लगेच अवंती उठून बाहेर निघाली. धावत जाऊन निखिलने तिला अडवलं. ' का खोटं बोललीस माझ्याशी की तू मजेत आहेस म्हणून ? का एकदाही कळवलं नाहीस मला तू हे सगळं? चल. आत्ता अशी चल माझ्याबरोबर, तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो मी . या माणसाबरोबर तू आता राहायचं नाहीस.' झालेल्या प्रकाराने धक्का बसलेल्या निखिलच्या आवाजात एकीकडे संताप आणि दुसरीकडे काळजी स्पष्ट दिसत होती. अवंतीला दाटून आलं होतं. 'नाही , नवऱ्याला सोडून आलेली मुलगी म्हणून आई बाबा मला कधीच घरात घेणार नाहीत आणि स्वतःची जागा घेण्याइतपत माझ्याकडे पैसे नाही आहेत निखिल. तुला हे सगळं कळलं तर त्रास होईल म्हणूनच खोटं बोलले मी तुझ्याशी...माझं भविष्य मी छान रंगवलं होतं रे , पण ते तुला आवडलं नाही. ते तू हिरावून घेतलंस माझ्याकडून. म्हणून मला हे नशीब स्वीकारावं लागलं आणि या सगळ्याची तक्रार तुझ्याचकडे करू मी ? शेवटी आपल्यापैकी एक तरी आपल्या जोडीदाराबरोबर हसत जगतोय यात मला आनंद आहे. माझा आनंद तुझ्या हातात होता, तुला तो कळला नाही किंबहुना तुला तो तितका महत्वाचा वाटला नाही कधी. तुझ्या संसाराकडे पाहून समाधान मानणं हेच माझ्या नशिबी आहे निखिल. आनंदात राहा नेहमी.' निमूटपणे घराची वाट धरत, डोळे टिपत अवंती रस्ता चालत होती... स्वतःचं रडू आवरण्याचा प्रयत्न करत, तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे निखिल अस्वस्थपणे पाहत होता. त्याचं खंतावणारं मन त्याला आता कधीच स्वस्थपणे जगू देणार नव्हतं....🙏✒️✍️
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - Såd Shayari fliSad Shayari - ShareChat
148 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
दही खा आणि वजन घटवा.... दह्याशिवाय कोणताच डाएट प्लॅन पूर्ण होत नाही. दह्यामुळे पचन सुधारते तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशनच्या मते, दही वजन घटवण्यास तसेच आटोक्यात ठेवण्यास मदत करते.दह्यातील कॅलशियम घटक पेशींमध्ये कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती करण्यास प्रतिबंध करतात. घातक कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती वाढली तर लठ्ठपणा आणि उच्चरक्तदाबाची समस्या वाढण्याची शक्यता बळावते. आरोग्यदायी दही – पचनासोबतच दह्यामुळे आहारातील पोषणद्रव्यांचे शोषण होणे सुलभ होते. तसेच प्रोटीन घटकचा शरीराला पुरवठा झाल्याने मसल्स मजबूत होण्यास मदत होते. तसेच पोटाजवळ फॅट्स साचून राहण्याची समस्या आटोक्यात राहते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. लो फॅट दही हे वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे. त्यातील फॅट्स फारसे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरत नाहीत. पण तरीही प्रमाणात दही खाणे हेच योग्य आहे. कसे घ्याल आहारात दही ? जेवणात किंवा जेवल्यानंतर तुम्ही वाटीभर दही खाणे हितकारी आहे. किंवा जेवण बनवतानाही त्याचा वापर केला जाऊ शकतो. फळांचे किंवा भाज्यांचे सॅलड करून त्यात दही मिसळता येऊ शकते. यामधून कॅलरी वाढण्याची भीती तुम्हांला वाटतेय ? तर मग घाबरायची काहीच गरज नाही. हेल्दीफायमी कॅलरी काऊंटच्या मते, वाटीभर दह्यातून केवळ 57 कॅलरीज मिळतात. त्यामुळे घरीच विरजण लावा.
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - ShareChat
139 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
@ कॉलेजचे दिवस....@ $मुलगी तुझात अस काय आहे , किमि तुझावर प्रेम करु ? $मुलगा......एकदाप्रेम करुन बघ , मग कळेल. $मुलगि......तु माझा लेवलचा नाहिस. $मुलगा......म्हणजे ? $मुलगि......माझारोजचा खर्च ,2000रु,आहे. $मुलगा...... मि तुला खुप सुःखात ठेवल.. $मुलगि......शक्यनाहि, माझा विचार सोडुन दे.आणि ति तिथुन निघुन जाते....खुप दिवसांनि .....ते परत भेटतात.त्या मुलिच लग्न झालेल असत.एका , मोठ्या..बिल्डिंगच्या गेट पुढेतो उभा असतो.मुलगि..एथेकाय करतोयस..दुसरि श्रिमंतमुलगि शोधतोयस का.... शोध शोधह्या समोरच्या मोठ्या बिल्डंग मधेमाझा पतिनेफ्लॅट घेतलाय , त्याचे पैसे द्यायला आलोयआम्हि.चल गुड बाय.....best of luck..श्रिंमंत मुलगि पटेलतुला.मुलाला ......तिच्या गळ्यातल मंगळसुञ पाहुनआश्रु अनावरहोतात.मुलिचा पति......कोण होता ग तो ,मुलगि .....कोण नाहि ...कॉलेज मधे श्रिमंतमुलिच्या मगे.फिरनारा , गरिब मजनु....पति आणि मुलगि..दोघे.... .......हा हा हा.पैसे देण्यासाठिबिल्डरच्या ओफिस मधेपोहचतात.तिथेबिल्डरचा , P .A... असतो. $मुलगि....पैसे ( कॅश ) कोणाकडे द्यायचि.pA ...साहेब खालि गेलेत ,येतिलत इतक्यात...तेव्हड्यात तो मुलगा ओफिस मधे येतो. $मुलगि....अरे माझ आता लग्न झालय ,माझा पिछा सोडआता. नाहितर. पोलिसात जाईल मि.pA....ओ मॅडम तोंड सांभाळाहे , आमचे साहेब आहेत. $मुलिला आणि तिच्यापतिला शॉकच बसतो. $मुलगा...... तुम्हि जो फ्लॅट घेण्यासाठि, आलात.तो माझा कडुन तुम्हाला, लग्नाचि भेट..म्हणुनठेवा.मुलिचा पति......आहो पण इतकि महागडि भेट. $मुलगा.....एका मुलिने मला, खुप दिवसापुर्वि ,विचारल होत . तुझात प्रेम करण्या सारख कायआहे.तिला ...तिच उत्तर मिळाल......
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - h । । STS TIS DP तुला पाहण्यासाठी मि तुझ्या घराजवळून जातो | आणि तुला चोरून पाहतो पण मि किती वेय आहे तू माझ्या हल्यात आहेस आणि मि बाहेर शोधतो @ ilovedlo Stadio ya - ShareChat
140 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
"सुजाता...." सुजाता, एक सुंदर पण खूप अबोल मुलगी. वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे दर ३-४ वर्षांमध्ये बदल्या होत असायच्या त्यामुळे ह्या शाळेत ४ वर्ष मग दुसर्या शाळेत ३ वर्ष असे करत करत तीच बीकॉम पर्यंतच शिक्षण झाले. त्यामुळे तिचे मित्र- मैत्रिणी कधीच होवू शकल्या नाहीत. आणि मुल स्वभावाच अबोल असल्यामुळे स्वताहून तिनेही मैत्रीसाठी कुठे हाथ पुढे केला नाही. तिच्या वडलांची शेवट... च्या १० वर्षासाठी मुंबई मध्ये बदली झाली. इथे आल्यावर घरात बसूनबसून ती खूप कंटाळत असायची म्हणून तिच्या वडलांनी तिला Computer कोर्स करायला सांगितला म्हणजे तिचा वेळ पण जाईल आणि थोड शिक्षण पण मिळेल. त्याप्रमाणे त्या एरिया मधेच तिला क्लास लावून दिला. ती नियमित क्लासला जायला लागली. तिथेच तिची ओळख समीरशी झाली. तोही तिथे क्लासला येत होता. समवयस्कर होता त्याने बी.ए.पूर्ण करून तो क्लास लावला होता. तो राहायला पण तिच्या अगदी घराजवळच होता. समीरने तिच्याशी मैत्री केली. दोघेही एकत्र क्लासलायायला जायला लागले. असे करत करत ६ महिने उलटून गेले. आतापर्यंत मैत्री खूप घनिष्ट झाली होती. वेळ साधून समीरने तिलाप्रपोज केले. पण वडिलांबद्दलखूप आदर असल्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध काही करायची तिची हिम्मत नव्हती, कारण तिच्या वडिलांना तीच लग्न उच्चशिक्षित, आणि भरपूर पगार असलेल्या मुलाशी करून द्यायचं होत. आणि समीर जेमतेम बीए होता आणि नोकरीचा तर अजून थांगपत्ता नव्हता. त्यामुळेतिने समीरला आपला निर्णय त्यावेळी दिला नाही. असाच महिना लोटला, आणि अचानक समीरचा फोन आला कि मला नोकरी मिळाली आहे एका आठवड्यात मला बंगलोरला जायचय. आणि मला २५००० पगार मिळणार आहे. आता मी तुझ्यावडीलांशी लग्नाबद्दल बोलूशकतो, सुजाताला खूप आनंद होतो, आणि ती त्याला आपला होकार देवून टाकते. दोन दिवसांनी समीर तिच्या घरी येतो, तिचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. समीर खूप खुश होवून तिच्याशी बोलत होता, नोकरी बद्दल सर्व काही सांगत होता, मी तुझ्या वडिलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो कि मी सहा महिन्यांनी सुट्टी घेवून परत येईन मग मी सुजाताशी लग्न करेन. तिलाहि खूप आनंद होतो, पण त्या आनंदात काही भलतच घडत, जे घडू नये असे बरेच काही, कारणघरात त्यावेळी ते दोघेच असतात, सुजाता त्यातून भानावर येते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, ती खूप घाबरतेआणि रडायला सुरवात करते पणसमीर तिची समजूत काढतो तिला समजावतो, काही होणार नाही आपण डॉक्टर कडे जावूया काही होणार नाही, तू काळजीकरू नकोस असेही आपले सहा महिन्यातच लग्न होणार आहे. तोतिला मेडिकल मध्ये घेवून जातो, कुठलीतरी एक गोळी देतो तू आता काळजी करू नकोस काही होणार नाही. आणि तो तिला घरात आणून सोडतो आणि आपल्या घरी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कॉल येतो तो बोलतो कि मला काळ रात्रीचबंगलोरसा ­ ठी निघावं लागलाय पण तू तुझ्या वडिलांना संग कि सहा महिन्यात येतो आणि आपणलग्न करणार आहोत असे. ती आधीतर खूप घाबरते पण सर्व धीर एकटवून वडिलांशी बोलते. ते म्हणतात कि ठीक आहे मी त्याची वाटबघतोय, सहा महिन्यांनी त्याला त्याच्या आई-वडिलांना घेवून आपल्या घरी यायला सांग. तिला खूप बर वाटत. ती हि बातमी समीर कॉल करून लगेच देते. पण पुढच्याच महिन्यात सर्व काही बदलून जात, तिला समजून येत कि ती Pregnant आहे, तिला काय कराव काहीच काळात नसत, आणि नेमके गेले ८ दिवसापासून समीरचा आणि तिचा संपर्क होवू शकला नव्हता. तिने तेसांगण्यासाठी परत त्याला कॉल केला. पण समीरशी काहीकेल्या संपर्क होत नव्हता. ती सारखी रडतचहोती, तिने ठरवले कि समीर ज्या ठिकाणी राहत होता तिथे जावून चौकशी करावी. तिथे गेल्यावर पण तिला काहीच माहिती नाही मिळाली. ती तिथेच त्याच्या घराबाहेर रडत बसली. तेवड्यात एक मुलगा तिच्या जवळ आला त्याने तिला विचारले, तिने त्याला समीरबद्दल काही माहिती आहे का असे विचारले. त्याने सांगितले कि तो एक नंबरचा फ्रॉड होता त्याने असेच तुझ्यासारख्या २-३ मुलींना फसवूनइथून पळून गेला आहे. तो बंगलोरला नाही तो दिल्लीला असतो.माझ्या एका दुसऱ्या मित्राकडे त्याचा नंबर आहे मी त्याच्याकडून घेवून तुला देतो. आणि त्यामुलाने त्याचा नंबर मिळवून तिला दिला. तीने समीरला कॉल केला, आणि सर्व सांगितले त्याने तीला सांगितले कि जावून abortion कर मला त्याच्याशी काही घेण-देन नाही. आणि परत मला संपर्क करण्याच्या भानगडीत पडू नकोस...कारण हा नंबर यापुढे कधीच चालू नसेल. त्याच्या या उत्तरामुळे ती खूप shock होते आणि तशीच तिथून धावत आपल्या घरी जाते एकदा विचार करते कि घरी सर्वसांगायचं पण वडिलांच्या इज्जतीचा विचार तिच्या मनात येतोआणि ती सरळ आपल्या रूम मध्ये जावून काहीकुणाशी न बोलता गळफास लावून घेते.....आणि हे सर्व संपवून टाकते.
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - मराठी STATUS DP Google Play त का घेत गं तुला काही समजत नाही साधी सरळ आणि सोपी गोष्ट आहे , | Sयाशिवाय मला राहवत नाही | @ Naradhi Status DP - ShareChat
159 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
एक निश्चल प्रेमकहाणी: एक तीस पस्तीशीतली तरुण स्त्री शॉपिँग मॉलमध्ये खरेदी करत होती.एक चाळीशीतला गृहस्थ तिच्याकडे सारखा सारखा पाहत होता.आणि हे तिला माहीती होतं.ती सेल्समनकडे पर्सची चौकशी करत होती,पण तिला कळतंच नव्हतं की तिने निवडलेल्या चार पाच पर्समधुन कोणती एखादी घ्यावी?मग तिची ही द्विधा मन:स्थिती त्या गृहस्थाला कळली.तसा तो जवळ आला,त्याच्या जवळ येण्यानी ती बावरली.तो म्हणाला,xeuse me madam मला वाटत ं तुम्ही ही चिँतामणी कलरची पर्स घ्यावी,खुपच शोभेल तुम्हाला. त्याचं असं direct समोर येऊन बोलणं तिला आवडलं नाही.ती म्हणाली,xeuse me mistar मी मघापासुन पाहतेय तुम्हाला,माझ्याकडेच एकटक पाहताय,माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करताय,आणि आता तर कहरच केला तुम्ही,ओळख पाळख नसताना देखील तुम्हाला सल्ला देण्याचा अधिकार दिलाच कोणी? तिच्या बोलण्याने तो म्हणाला,माफ करा मॅडम जर तुम्हाला माझं वागणं खटकलं असेल तर... its ok पण इथुन पुढे जरा स्वतःच्या भावनांना आवर घाला,आणि स्त्रियांशी सभ्यतेने वागा,असं म्हणुन ती पुढे निघुन गेली. यांवर तो सेल्समन त्या गृहस्थाला म्हणाला xeuse me sir जर तुम्हाला महीलांशी flirtingच करायचं असेल तर शेजारीच शिनॉय क्लब आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. यांवर तो गृहस्थ म्हणाला,नाही मित्रा मी शादीशुदा आहे आणि असले प्रकार मी करत नाही. मग हा प्रकार कशासाठी सर.. ती माझी बायकोच आहे,तो गृहस्थ म्हणाला. मग त्या अनोळखी असल्या सारखं का वागत होत्या? कारण मी तिच्यासाठी अनोळखीच आहे. म्हणजे?मला कळलं नाही जरा सविस्तर सांगाल का सर? हो सांगतो,माझ्या बायकोला अल्झायमर(स्मृती विसरण्याचा एक आजार) आहे.क्षणोक्षणी ती मला विसरते आमच्या लग्नाची गेली अकरा वर्षे मी तिला माझ्या प्रेमाची जाणीव करुन देतोय,कधीकधी तेच प्रेम तिला कळेल,आणि मी तिचा नवरा आहे हे कळेल नक्की..... त्यांच्या या स्पष्टीकरणाने तो आश्चर्यचकीत झाला आणि स्वतःला सावरुन पुढे म्हणाला,पण तुमचा तुमच्या प्रेमावर विश्वास आहे?अल्झायमरसार ख्या असाध्य आजारावर खरंच तुमचं प्रेम मात करेल? तो गृहस्थ हसुन म्हणाला,तो विश्वास तु स्वतःच अनुभव,आता माझी बायको पुन्हा इथे परत येईल आणि हीच पर्स ती खरेदी करेल.. असं म्हणुन तो गृहस्थ लपुन बसला,थोड्या वेळात ती महीला परत आली आणि तिने तिच चिँतामणी रंगाची पर्स खरेदी केली जी तिला तिच्या नवर्याने पसंत केली होती... त्याचं तिच्यावरचं हे अपार प्रेम आणि त्यावरचा विश्वास बघुन तो सेल्समन अवाक झाला.आणि तिच्या जाण्यानंतर सेल्समन त्याला म्हणाला,सर खरंच तुम्ही महान आहात.मला आता विश्वास पटलाय कि तुमच्या प्रेमाची ताकद एक ना एक दिवस त्यांना तुमच्या प्रेमाची जाणीव नक्कीच करुन देईल,आणि त्यामध्ये असे काही रंग भरले जातील की,एक दिवस त्याच प्रेमारंगाचा इंद्रधनु तुमच्या आयुष्यात उजळुन जाईल...
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - प्रेम मराठी STATUS DP Google Play करण सोप आहे , पण त्याला पार पाडण सोप नाही सात जन्म सात देणारी पाहीजे আনা फिरवणारीदा । @ MARATHI STATUS DP - ShareChat
137 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
ऐक सुंदर प्रेम कथा जरूर वाचा ... ऐके दिवशी देव पृथ्वीवरच्या प्रेम करणाऱ्या दोन जीवांसाठी ऐक खुर्ची पाठवतो . ती खुर्ची खूप खास असते . कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खर बोलला तर ... त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो आणि जर त्या खुर्चीवर बसून माणूस जर खोट बोलला तर त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणार असतो मुलगा त्या खुर्ची वर बसतो मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ? मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच लाल दिवा पेटतो ) मुलगा घाबरतो मुलगी : घाबरू नकोस . देवाची काहीतरी चूक झाली असेल हि खुर्ची बनवताना आपण परत एकदा प्रयत्न करून बघू मुलगा परत एकदा त्या खुर्ची वर जावून बसतो . मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ? मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच हिरवा दिवा पेटतो ) काही कळल का तुम्हाला ? जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा त्या खुर्चीवर बसला तोपर्यंत तरी त्या मुलाच त्या मुलीवर खर प्रेम नव्हत . पण जेव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर असेलला विश्वास पाहिला आणि तो तिच्यावर खर खुर प्रेम करू लागला यालाच म्हणतात प्रेम ............... .. म्हणून लक्ष्यात ठेवा मित्रानो ऐक तर्फी प्रेम सुद्धा यशस्वी होऊ शकत फक्त तुमचा तिच्यावर / त्याच्यावर असेलला विश्वास कुठेही कमी झाला नाही पाहिज...
#

✍शनायाच्या लेखनातून ✍

✍शनायाच्या लेखनातून ✍ - मराठी STATUS DP ► Google Play मला दी । पाहिज विषय संपला @ MARATHI STATUS DP - ShareChat
135 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post