श्रीपाद श्रीवल्लभांचे बोल व आशिर्वाद... *श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहिसा झाला पाहिजे. ज्या वेळेस आपले ह्दय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही.* *सृष्टी मधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ति-व्यक्ति मध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते. पुण्य कर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते.* *तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केले असते तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही. तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही.* *ब्राम्हण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबध्द असावा. वैशांनी व्यवसाय, व्यापार, गाईचे रक्षण, क्रय विक्रय आदि व्यवहार करावे. शूद्रानी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तिसाठी मात्र वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरूष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्तांचा केवळ प्रेमभाव, श्रध्दा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्माला आला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे.* *श्रीदत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. थोडया सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. श्रीदत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते. इच्छित वस्तूची समृध्दी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष.* *श्री पीठीकापूर सुध्दा माझे अत्यंत प्रिय स्थान होईल. माझा जन्म, कर्म अत्यंत दिव्य आहे, ते एक गोपनीय रहस्य आहे.* *श्रीपादप्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलाप्रमाणे भक्तांचे पालन करतात. दुसरी सगळी चिंता सोडून निरंतन माझेच ध्यान करणा-यांचा मी दास असतो.* *कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिर्वाय असते. सगळी सृष्टि शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो. दानाचे फलस्वरूप मुलेबाळे होतात. सर्वदा दान सतपात्री करावे. दान घेणारे सतपात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते. दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे. तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल.* *सा-या जगाला धर्म कर्माला अनुसरून त्या विषयी आसक्तिरहित करीन. स्मरण, अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते.* *खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच. ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्मकिरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र, तंत्र, यंत्राने काही फळ न दिल्यास, जप, तप, होमाचा आश्रय घ्यावा. या उपायाने सुध्दा उपशमन न झाल्यास श्रीगुरू पादुकांना शरण जावे. श्रीचरण सर्वशक्ति संपन्न असतात.* *कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रितीने काम करीत असतो. ह्या सत्याची जाणिव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्मच कधीही करू नये. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्म प्रवाहात वाहत जात असतो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते.* *ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, किर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे. भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टिकर्त्याचे शक्तिसामर्थ्य आहे.* *मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्वमीच आहे. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरणशुध्दीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंहसरस्वती दिगंबरा म्हणून भजन, कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने असतो.* *सत्पुरूषांस, योगीयास दान-धर्म केल्याने, दैवी कृपेमुळे पाप कर्मांचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करूणा असल्या कारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्याकडे ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात.* *अवतारी पुरूष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऎंशी पिढ्यांनी पुण्य संचय केलेला असतो. तसेच अवतारी पुरूषाचे गुरू होणा-या व्यक्तिचा वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो. या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्ती फळ प्रदान करतो. परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे कमी फळ देतो.* *ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत. परंतु श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्रीदत्त ब्रम्हदेवाला आदेश देऊ शकतात.* *!! श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये !!* #श्री गुरुदेव दत्त
#

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुदेव दत्त - अलख निरंजन । जय गिरनारी ! | | | अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त । । - ShareChat
149 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post